आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले
आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले(राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन.! त्यानिमित्ताने हा लेख 'भारताचे महानायक महानायिका' पुस्तकातून देत आहे.- लेखक:रामेश्वर तिरमुखे,जालना 9420705653.- संपादक)महात्मा जोतीराव फुले हे महान क्रांतिकारक होते.जी क्रांती त्यांनी मानवाच्या स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि न्याय यावर आधारित राष्ट्रनिर्माण,जी क्रांती सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, साहित्यिक सह मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी होती.जोतीराव फुले यांचा जन्म 11एप्रिल 1827 ला पुणे येथे झाला.त्यांच्या आई चिमनाबाई तर वडील गोविंदराव होत. जोतीराव रांगत असतांनाच त्यांच्या आईचे निधन झाले होते.सगुणाबाई क्षीरसागर या मावस बहिणीने जोतीराव यांचा सांभाळ करण्यासाठी मदत केली होती.गोविंदराव शेती आणि फुलांचा व्यवसाय करत होते. वयाच्या 7व्या वर्षी जोतीराव यांना...






