Thursday, November 13

Tag: #दंगलकार

शाहिरी अभंग गाते.!
Article

शाहिरी अभंग गाते.!

शाहिरी अभंग गाते.!        छाया नागजकरांच्या तमाशात नाचणारी पुष्पां लोंढे ही एकदा पुण्यात आली आणि आवर्जून मला भेटली. स्वारगेटला आमची भेट झाली तेव्हा पुष्पाने रमेशबद्दल सांगितलं आणि मी हादरून गेलो.रमेश गेल्या सहा महिन्यांपासून झोपून आहे. त्याची बायको त्याला सोडून गेली आहे.तुझी सारखी आठवण काढत असतो.सात आठ पत्रं त्याने तुला लिहली आहेत पण पाठवली नाहीत."रमेश कधी जाईल याचा नेम नाही तू त्याला भेटून यायला हवं".रमेशची आठवण गहरी झाली.डोळ्यात कृष्णा दाटून आली आणि तो काळ जसाच्या तसा आठवला.                रमेश वाघमारे उर्फ रमेश खलाटीकर. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात खलाटी म्हणून शंभर दीडशे उंबऱ्याचं हे गाव हा तिथलाच.संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात तमाशाचे फड जिंकणारा हा विनोदाचा बादशहा.सोंगाड्या ते शाहीर आणि ढोलकीपटू अशी रमेशची ओळख.छाया माया नागजकर यांच्या तमाशात त्याने काम केलं.मंगला बनसोडे यांच्या तमाशा...
दिवस आपल्यासाठी उगवतोच.!
Article

दिवस आपल्यासाठी उगवतोच.!

दिवस आपल्यासाठी उगवतोच.!     मी सातवीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या सहा वर्षांपासून नापास होणारा एकजण होता.आम्ही त्याला सगळेजण नाना म्हणायचो.तो आमच्याच गल्लीत राहायला होता.आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा.मिशासुद्धा चांगल्याच वर आलेल्या होत्या.आणि हा नाना अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड होता.जणू पैलवानच.म्हणजे आमचं मास्तर त्याच्या खांद्याला लागायचं.आणि पोरं त्याच्या गुडघ्याला.अंगाने दणकट असणारा नाना.पण अभ्यासात पार दरिंद्री.नानाला काहीच येत नव्हतं.आणि दरवर्षी नाना नापास व्हायचा.     त्यात आमच्या मास्तरने एक नियम असा केला होता,वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल त्याने वर्गातल्या सगळ्या पोरांच्या मुस्काडीत मारायची.त्यावेळचे मास्तर असा नियम करायचे.आणि यात काय व्हायचं त्या भितीने सगळी पोरं मन लावून अभ्यास करायची.पण नानाच्या डोक्यात काहीच राहत नव्हतं.आणि त्याचा परिणा...
यशोगाथा तिच्या संघर्षाची
Story

यशोगाथा तिच्या संघर्षाची

यशोगाथा तिच्या संघर्षाचीपाचवीला असल्यापासून ती कष्टाशी भिडत राहिलेली.तिच्या आजी आजोबांसोबत भाजीपाला विकता विकता एम. कॉम. पर्यंत शिक्षण तिने घेतलं.आयुष्याच्या त्याच वळणावर तिचं लग्न माझ्यासारख्या फाटक्या माणसासोबत झालं.त्यावेळी मी वॉचमन होतो.आमचं लग्न झालं खरं परंतु एकमेकांच्या संघर्षाला सोबत घेऊनच आम्ही बोहल्यावर उभे राहिलो. आमच्या दोघांच्या मध्ये असणारा अंतरपाट आजही आठवतो मला.त्या पांढऱ्या वस्त्रावर त्याक्षणाला कदाचित आमच्या दोघांच्या आयुष्याचं ध्येय एकत्र येऊन नटलेलं असावं.लग्नानंतर तिचं शिक्षण पाहता मी तिला अगदी दुसऱ्या दिवशी म्हणालो सुध्दा, “ दिपाली एम. कॉम.झालेलं आहे. घरात बसून चालणार नाही.पुढं ही शिक आणि नोकरी ही कर.मी सोबत राहीन.” त्यावेळी तिने मला उत्तर दिलेलं. ती म्हणाली होती, “ आयुष्यात नोकरी करायला मला कधीच जमणार नाही.घर, संसार या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून मला ते शक्य ही ह...
ताशा, वेश्या आणि कविता
Story

ताशा, वेश्या आणि कविता

ताशा, वेश्या आणि कविता(सत्य कथा.)शेवटची लोकल नुकतीच निघून गेली आणि फ्लॅटफार्म रिकामं झालं.मुसळधार पाऊस कोसळून ओसरता झाला होता.रिमझिम बऱ्यापैकी सुरूच होती.बाकड्यावर पोतं टाकलं आणि अंगावर एक चादर घेऊन मी आडवा झालो.मला आठवतंय त्या दिवशी नगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला होता. बाहेर रस्त्यावर विजयी उमेदवारांची मिरवणूक चालू होती.पाऊस थांबल्यामुळे तिला आणखी जोर चढला होता.फटाक्यांचा माळा वाजत होत्या.ढोल ताश्यांचा आवाज आणखीन वाढला होता.तासभर धिंगाणा सुरूच होता.त्या आवाजाच्या गर्दीत बच्चनच्या ताशाचा आवाज मी बरोबर हेरला आणि बच्चनला यायला उशीर होणार याची खात्री झाली.झोप लागत नव्हती.भूक लागली होती.उठून बसलो आणि तंबाखूचा विडा मळायला सुरवात केली.विडा मळत असताना मागून मंगलचा आवाज आला "क्या कालू झोपला नाहीस अजून". “अगं बच्चन अजून आला नाही”... असे म्हणत, मी बाकड्यावर पुन्हा बसकण मारली.ओठावर दोन ब...