वऱ्हाडातील पारंपरिक “जेवणार पाटी” आणि लग्नसंस्कार | जुनी लग्न संस्कृती आणि न्हानोरा परंपरा
वऱ्हाडातील पारंपरिक “जेवणार पाटी” आणि लग्नसंस्कार | जुनी लग्न संस्कृती आणि न्हानोरा परंपरा'जेवणार पाटी' हा वऱ्हाडातील लग्नसमारंभातील एक पारंपरिक विधी होय, पूर्वी वऱ्हाडाला सोन्याची कऱ्हाड असे म्हणत असत. लग्नसमारंभ म्हटला म्हणजे लगनघरी दणदणाट रहायचा. वेगवेगळ्या पाच झाडाच्या फांद्या आणून हिरवागार ताटव दरवाज्याच्या वरच्या बाजूला बांधून शुभ कार्याची मंगलमय सुरुवात करतात. आंब्याची पाने बांधून त्यावर नैवेद्य व पाणी शिंपडून कुलदैवतेची आराधना करतात. यामध्ये मामाचा सहभाग महत्वाचा असतो. हा ताटव मंगलतेचं प्रतिक समजला जातो. लगनघरी बंबाट मज्जा पावणे रावणे कुरोळीणा नटून थटून धमाल उडवून देतात. पूर्वीच्या काळी आठ आठ दिवस पावणे रावणे अगोदरच लगनघरी यायचे.एकमेकांना धान्य निवडण्यापासून तर लग्न वारासार होईपर्यंत मदत करू लागायचे. प्रसंगी आजूबाजूच्या घरून कोटया मागवून त्या पाण्याने स्वच्छ धुवून धोतर...
