दुनिया फक्त विश्वासावर चालते.!
दुनिया फक्त विश्वासावर चालते.!आळेफाटा ते करमाळा प्रवास करत असताना माझ्या बाजूला एक मॅडम बसल्या होत्या.चार तासांचा प्रवास होता.
लेडीज बाजूला असल्यानंतर जरा अवघडल्यागत होतंच.दोन तास होऊन गेले.छोट्या छोट्या स्टँडवर गाडी थांबत होती.प्रवासी उतरत होते,चढत होते.आणि मला तहान लागली होती.गाडी मिरजगाव स्टँडला थांबली.एक वडापाव विकणारा माणूस खिडकीजवळ येऊन ओरडायला लागला..”गरमा गरम वडापाव.” मला पाणी हवं होतं पण त्याच्याकडे फक्त वडापाव होते.मी त्याला म्हणलं “पाण्याची बाटली नाहीय का दादा?” त्यावर तो बोलला “नाहीय भाऊ.पैसे द्या मी आणून देतो लगेच.” मी पटकन त्याला वीस रुपये दिले.आणि तो वीस रुपये घेऊन गर्दीतून वाट काढत बाटली आणायला निघून गेला.माझ्या बाजूला बसलेल्या त्या मॅडम मोठ्याने हसल्या आणि म्हणाल्या, “गेले तुमचे वीस रुपये.” आणि त्या पुन्हा हसायला लागल्या.मी म्हणलं, “तो पाणी घेऊन येईल.” त्या पुन्हा हसत ...

