नोकरी आणि कुटुंबाची जडणघडण
नोकरी आणि कुटुंबाची जडणघडणसध्याचे युग हे संगणकाचे युग आहे. आज वाढलेली भस्मासूर महागाई पती-पत्नी दोघांनाही संसार सुखाचा करण्यासाठी नोकरी करण्यास प्रवृत्त करते. मानवी गरजा वाढल्या आहेत. जीवन सुखी समाधानी असावे या आशेने नोकरी करणे आज काळाची गरज आहे. नोकरी करणारा पुरुष घर सोडून जाताना त्याच्या जबाबदाऱ्या बऱ्याच अंशी घर सोडल्यानंतर संपतात पण, एका स्त्रीला घरात असताना व घरात नसताना दोन्ही ठिकाणी आपल्या जबाबदाऱ्या अगदी सावधगिरीने पूर्ण कराव्या लागतात.घरात वडीलधारी मंडळी सासू-सासरे असले तर त्यांच्या गरजा काय आहेत? त्या पूर्ण केल्याशिवाय, स्वयंपाक केल्याशिवाय तिला घर सोडता येत नाही. त्यावेळी तिच्या संयमाची फार मोठी परीक्षा सुरू असते. तिने कितीही मोठा पगार जरी घरात दिला तरी त्या पगाराबरोबर, तिची त्यागी वृत्ती तिला द्यावी लागते. तिला प्रत्येकाच्या गरजांसाठी थोडा वेळ द्यावा लागतो. तरच कुटुंब आ...


