Wednesday, April 29

Tag: #आठवडीबाजार #बालपणाच्या_आठवणी #गावजीवन #मराठीलेख #nostalgia #villageLife #MarathiStory #emotionalStory #ruralIndia #childhoodMemories

“गावचा आठवडी बाजार आणि वहाबभाईचं भातकं | बालपणीच्या आठवणींचा हळवा प्रवास”
Article

“गावचा आठवडी बाजार आणि वहाबभाईचं भातकं | बालपणीच्या आठवणींचा हळवा प्रवास”

"गावचा आठवडी बाजार आणि वहाबभाईचं भातकं | बालपणीच्या आठवणींचा हळवा प्रवास"गावच्या मारोतीच्या पाराजोळ पिंपळाच्या व वडाच्या झाडाच्या थंडगार सावलीत गावचा आठवडी बाजार भरायचा. पंचक्रोशीतील बाहेरगावची बेपारी मंडळी सायकलीवर कोणी मीनीडोर ऑटोवर कोणी गाढवावर तर कोणी घोड्यावर आपापलं दुकान,भाजीपाला, सामानसुमान लादून बाजाराला आवर्जून हजेरी लावायची. सोनखेड,भुईखेडचे भोई आपली पूर्णा नदीच्या पात्रातील पिकवलेले खरबूज टरबूज विकाले आणायची. चारदोन भाजीपाल्याचीआलू,कांद्याची व दोन तीन पान तंबाखू,गरम मसाल्याचे बेपारी,गावातला चपला शिवणाऱ्या जगदेव चांभार व घाण्याचं पिवर पिवळधम मद्रास तेलाचे पिपे घेऊन एक दोन तेल्यांची दुकाने, बाजुच्या खेड्यातला दाढी कटींगा करणारा शालीकराम म्हाली असायचा. त्याच्या दुकानात बंबाट गर्दी असायची.पैसे कमी म्हालपंचायतीच ज्यादा चालायच्या.बजाराच्या दिवशी आम्ही झोपेतून उठलेले वंग...