स्वाती…
भाजी विक्रेत्याच्या घरी
जन्माला आली स्वाती
आई बाबा भारावून गेले
तिनं नाव मोठं केलं किती
आई बापाच्या कष्टाला
तिनं आकाशी पोचवलं
गरीबी आणि दारिद्रयाचं
दुःख दैन्य तिनं पचवलं
आज तिच्या परिश्रमाची
पावतीच तिला मिळाली
मुलगी कुठे कमी नसते
जगाला बातमी कळाली
नको नको ती दुषणं तिला
काही लोकं म्हणतात नकोशी
अडचणीत पंख पसरून
बघा कशी उडाली आकाशी
खूप खूप शिकवा लेकीला
ती दोन कुटुंब करते सुखी
अशावेळी गौरवोद्गार येती
समाजात प्रत्येकाच्या मुखी
अडीअडचणी आणि समस्या
कधी तिनं वाचला नाही पाढा
पचवून सारे प्रश्न अडथळे
अगदी बनवला त्याचा काढा
चला तोंड भरून कौतुक करु
पाठीवर देऊ कौतुकाची थाप
अंतर असू दे किती आता
जिद्द आणि चिकाटीने काप
– के पवार (मुख्याध्यापक)
सोनाळा बुलढाणा
९४२१४९०७३१