पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड सेट परीक्षा उत्तीर्ण
अमरावती : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या सेट परीक्षेमध्ये नागरी हक्क संरक्षण अमरावती पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी दि. 26 मार्च 2023 रोजी मराठी या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. खुल्या प्रवर्गातून मराठी विषयामध्ये त्यांना 300 पैकी 158 गुण मिळवून प्रथम प्रयत्नात यश मिळाले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल पोलीस महासंचालक, मुंबई सुखविंदर सिंग,अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण अविनाश बारगळ व अपर अधीक्षक शशिकांत सातव यांनी अभिनंदन केले आहे.