पारनेरच्या मातीत यशस्वी होऊ शकते सौर शेती..!
जागतीक स्तरावर कार्बन उत्सर्जन कमी करण्याच जागतिक स्तरावर ठरवलं आहे. परंतु भारता सारख्या देशाला ते कसं साध्य करायच हा मोठा प्रश्न आहे. विकास करायचा असेल तर विजेचा प्रचंड वापर होणार. त्यात वाढलेली लोकसंख्या, वाढते शहरीकरण, ह्या मूळे विजेचा वापर कमी न होता वाढत जाणार. बर आपण वीज ही जास्तीत जास्त कोळशा पासून करतोय त्यातून होणार प्रदूषण बाहेर पडणारा कार्बन .कमी करायचा असेल तर ,शेती होय शेती.! पण ती कुठल्या पिकाची नव्हे तर सौरशेती करावी लागेल. त्या सौरशेती साठी पारनेर ची भौगोलिक परिस्थिती इथलं वातावरण खूप अनुकूल आहे .
पुणे, मुंबई ,औरंगाबाद, आणि नाशिक हा भाग . भारतात सर्वात जास्त विकसित असणारा भाग म्हणून ओळखला जातो. ह्या ठिकाणी मोठे शहरीकरण तर आहेच त्याच बरोबर खूप मोठ औद्योगिकरण देखील आहे. त्या मुळे विजेची मागणी प्रचंड आहे. त्याच्या जवळ पारनेर आहे. त्याच बरोबर पारनेरचा बराच भाग हा दुष्काळी असून शेती पावसावर अवलंबून असल्या मुळे शेती नफ्यात कमी आणि तोट्यात जास्त असते. त्याचा फटका शेतकरी आणि येथील नागरिक ह्यांच्या अर्थकारणा वर ही मोठा होतो. शिवाय रोजगाराच्या शोधत स्थलांतर ही होत. (सुपा औद्योगिक वसाहतीच्या आसपास चा भाग नव्हे)
पारनेरच्या अनेक भागात विस्तीर्ण माळरान असून वर्ष् भर मुबलक प्रमाणात सुर्य प्रकाश ही उपलब्ध आहे. शिवाय त्यातून निर्माण झालेली वीज वितरणासाठी ही विशेष कष्ट नसणार आहे. त्या मुळे पारणेरच्या अनेक भागात जर सरकार, शेतकरी आणि उद्योग पती यांच्या मदतीने सौर प्रकल्प उभे केले. काही अटी आणि शर्ती घालून जमिनीचा मालकी हक्क हा शेतकरी वर्गाकडे राहील ही तजवीज केली तर विरोध ही कमी होईल शेतकरी ही तयार होतील.
ह्या प्रकल्पा मूळे शेतकरी वर्गाला ज्या जमिनीतून काहीच मिळतं नाही तिथून ठराविक परंतु शाश्वत रक्कम मिळेल. गावातल्या गावात अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. दुसर म्हणजे आर्थिक स्तर उंचावत जाईल त्या मुळे
खेडी ही स्वयंपूर्ण होण्यास मदत ही होईल. शिवाय शहराकडे जाणारा तरुण वर्ग जाणार नाही.
सरकारने जर योग्य मध्यसती केली तर आज सौरऊर्जा निर्मितीत आघाडीवर असणाऱ्या अनेक सौरऊर्जा उत्पादक कंपन्या पारनेर मध्ये येऊ शकतात. फक्त शेतकरी वर्गाला विश्वास दिला तर नक्कीच हा प्रकल्प यशस्वी होईल. त्याच बरोबर आज अनेक शेतकरी पुण्या मुंबई वाल्या लोकांना जमिनी विकत आहेत त्या ही वाचतील.
– अशोक पवार
गटेवाडी, तालुका पारनेर,जिल्हा नगर
8369117148