जि. प. करजगाव शाळेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी
गौरव प्रकाशन दारव्हा (प्रतिनिधी) : जि. प. उच्च प्राथमिक मराठी शाळा करजगाव येथे राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शरद घोंगे तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक रमेश वरघट, दत्तात्रय राऊत, वर्षा ढवळे, नितीन भोयर, कु. रोकडे आदी शिक्षक मंचावर उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राधा राठोड, विशाखा बरडे ,दिशा राठोड, रसिका राठोड, सायली चव्हाण, अंकिता जाधव, ईश्वरी चिपडे, सोनाली चव्हाण, शर्वरी राठोड, प्रीती चव्हाण, कन्हैया खंदारे, आतिश चव्हाण,आणि अभिषेक राठोड या विद्यार्थ्यांची राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली. तसेच काही विद्यार्थीनींनी जिजाऊची वेशभूषा करून अभिनय केला. प्रमुख अतिथी रमेश वरघट तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक घोंगे सर यांचीही समयोचित भाषणे झालित.
याप्रसंगी कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना तसेच महादीप परीक्षेत तालुकास्तरावर यशस्वी झालेल्या कु. अर्पिता राठोड, कु. दिशा राठोड संस्कृती जाधव यांचा सत्कार करून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश सोनटक्के यांनी तर गोपाल राऊत यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.