आज १४ जानेवारीला शिदोडी येथे डॉ.नरेश शं.इंगळे यांचे व्याख्यान
कुऱ्हा (नितीन पवार) : शिदोडी येथे रविवार दि.१४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी तीन वाजता प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे यांचे “सकारात्मक विचार यशाची वाट” या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
श्रीक्षेत्र पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारा आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरात प्रा.डॉ.नरेश इंगळे यांचे व्याख्यान होणार आहे.या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.