ढोंग
नेताजी येतील
हसत तोंडाने
हात जोडून
जयभीम करतील
मी तुमचाच आहे
म्हणतील
पदरात घ्या
मायाबहीनीच्या
पाया लागतील
विहारात
बुद्धमूर्ती फुकटात
देतील
विहाराच्या
बांधकामाचे ही
पाहू म्हणतील
बेंबीच्या देठापासून
जयभीमचा नारा
देतील
एखादा आजा
मेला तर
चेला चपट्या सह
मैतीत जातीन
हजेरी लावतील
तुंबलेल्या नाल्याची
सफाई करतील
हातात झाडू ही
घेतील
खरचं तुम्हाला वाटेल
नेता किती सच्चा आहे
भोळी मन
हुरळून जातील
भाऊचा वाढदिवस
गर्दी होईल
दारू सह मटणाची
पार्टीत
गौतमी नाचील
एखादा भुस्कट
भाऊसाहब आगे बढो
हम तुम्हारे साथ है
म्हणतील
तुम्हीं ढुंगण फाटे स्तोर
जयजय कराल
भाऊचा झेंडा
हातात धराल
किराणा माल
घरात भराल
भाऊले भरघोस
मताने निवडून आणाल
भाऊच ढोंग मग
सगळ्यांना कळणार
जेंव्हा भाऊच्या
हातात हनुमान चालीसा
दिसणार
सविधान बगलित
अन्
हिंदू राष्ट्र असणार !
– राजेंद्र क. भटकर
बडनेरा