‘पाय आणि वाटा’ ललितसंग्रहास पुरस्कार
अमरावती : ल. र. फौउंडेशन लातूर यांच्यावतीने ललितगद्यासाठी देण्यात येणारा स्मृती पुरस्कार कर्नाळ, ता. मिरज येथील साहित्यिक सचिन वसंत पाटील यांच्या हर्मिस प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ‘पाय आणि वाटा’ या ललितसंग्रहास जाहीर झाला आहे.
ऐन तारुण्यात अपघातामध्ये पाय गमावलेल्या पाटील यांनी गतआयुष्यायातील वाटांविषयीच्या संवेदनशील आठवणी या संग्रहात शब्दांकित केल्या आहेत. २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या या संग्रहास वाचक, साहित्यिक, समीक्षक यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. यापूर्वी या संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान मुंबई, मातृस्मृती पुरस्कार कामेरी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार पुणे, माणगंगा साहित्य परिषद, कृतिशील शिक्षक महाराष्ट्र राज्य पुरस्कार, साहित्य प्रज्ञा मंच, पुणे इत्यादी पुरस्कार लाभले आहेत.