नवदुर्गा माझी माय
माझे दारी कल्पवृक्ष
गोठयात कपिला गाय
आदिशक्ति नऊ रूप
आहे गा माझीच माय !!
अन्नपूर्णा माय माझी
देई सर्वाना भोजन
महिषासुर मर्दिनी
होऊनी करी रक्षण !!
होऊनी माता पार्वती
करी प्रेमाचा वर्षाव
संकट समई घेई
कालिंका होऊनी धाव !!
धन धान्याचा सुकाय
घरा सदा सुख शांति
माह्या घराच्या देव्हारी
महालक्ष्मी रे नांदती !!
हात धरून शिकोल
मले लिहिन वाचन
माही माय सरस्वती
देल जगण्याच ज्ञान !!
ती अष्टभुजा होऊनी
वाही ओझे संसाराचे
शत्रुस दाखवी रूप
तिचे ते रंचण्डिकेचे !!
घट मांडून पूजिते
नवरात्रि माझी माय
आदिशक्ति नवदुर्गा
माय माझी दुर्गा माय !!
–वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनी)
अकोला 9923388556
सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनी)
अकोला 9923388556