नमो बुद्धाय (अभंग)
सम्यक बुद्धीने,करावा विचार
व्दैताचे ते सार,बुद्ध सांगे।।
नको कर्मकांड,नको अंधश्रद्धा
बौद्धिक संपदा,बुद्ध मार्ग।।
नको द्वेषबुद्धी,नको वैरभाव
सत्य प्रेमभाव,बुद्ध माझा।।
बुद्ध आदर्शता,बुद्ध मार्ग दाता
बुद्ध ज्ञानदाता,सर्वांसाठी।।
कर्म ते बरवे,वाईटाचा त्याग
अनैतिक रंग,दावो नये।।
अस्तेय,अहिंसा,ब्रह्मचर्य,सत्य
मादक ते त्याज्य,पंचशील।।
ज्ञानाचा प्रकाश,शांतीचा संदेश
सांगतो गौतम,जगालागी।।
– आबासाहेब कडू,
अमरावती
(९५११८४५८३७)
बुद्ध पौर्णिमा दि.२३ मे २०२४