साऊ
बा माझा ज्योतिबा
माय माझी साऊ
मायबापाचं मी
किती गुणं गाऊ !!
किती गुणं गाऊ
वंदू त्यांचे पाय
बाप कल्पवृक्ष
कामधेनू माय !!
कामधेनू माय
माय सरस्वती
पुस्तकं लेखनी
देली माह्या हाती !!
देली माह्या हाती
ज्ञानाची मशाल
शिकून मी झाली
कुटुंबाची ढाल !!
कुटुंबाची ढाल
शिक्षण शिक्षण
माय साऊ तुझे
कसे फेडू ऋण !!
कसे फेडू ऋण
होऊ उतराई
काय सांगू माये
स्त्रीची नवलाई !!
स्त्रीची नवलाई
नाही ती अबला
जगं घेई कवेत
सशक्त सबला !!
सशक्त सबला
भीमाई, जिजाऊ
बा माझा ज्योतिबा
माय माझी साऊ !!
–वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक (सेनि)
अकोला 9923488556.
Post Views: 72