* आमदार देवेंद्र भुयार यांची विविध आंदोलनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता
* आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह २५ जणांना मिळाला दिलासा
* आमदार देवेंद्र भुयार यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं केलं स्वागत
अमरावती (तालुका प्रतिनिधी) : शेतकरी चळवळीचे नेते मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांची मतदार संघात झालेल्या आंदोलनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहेत. अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे. सबळ पुराव्याअभावी गुन्हा सिद्ध होत नसल्याचे कारण देत न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्त केली.
मोर्शी वरूड तालुक्यात शेतकरी चळवळीच्या माध्यमातून आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी सेंट्रल बॅकेचे मॅनेजर मारहाण व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणात बेनोडा पोलिस स्टेशन येथे भादंविचे कलम ३५३, ३३२, १८६, ५०४, ३४ अन्वये दिनांक २०/०६/२०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बारगांव येथील दुधाचे टॅकर फोडुन जाळपोळ केल्याच्या प्रकरणात बेनोडा पोलिस स्टेशन येथे भादंविचे कलम १४३, १४७, १४९, ४३५, ४३७, ४३८, १८८ अन्वये, फौजदारी कायदा (दुसरी सुधारणा अधिनियम ) चे कलम ७, मुंबई पोलिस अधिनियम चे कलम व पर्यावरण अधिनियम चे कलम १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिनांक ०८/०७/२०१५ रोजी प्राथमीक आरोग्य केंद्र लोणी येथील तालाठोको ठिय्या आंदोलन व डॉक्टर व कर्मचाऱ्यांना बंदीस्त करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणात आमदार श्री देवेंद्र भुयार व वर नमुद आरोपी यांचे विरुध्द बेनोडा पोलिस स्टेशन येथे भादंविचे कलम १४३, ३४१, ३४२ व ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या सर्व प्रकरणात मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांची मतदार संघात झालेल्या आंदोलनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे. सबळ पुराव्याअभावी गुन्हा सिद्ध होत नसल्याचे कारण देत आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह २५ जणांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली.
बेनोडा शहीद येथील आरोग्य उपकेंद्रात कायमस्वरूपी डॉक्टरची नियुक्ती करण्यात यावी, मंजूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाला सुरुवात करण्यात यावी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाला हेतुपुरस्सर उशीर लावणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, या मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आलं होत.
शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे शासकीय कामात अरथडा निर्माण करणे इत्यादी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सर्व प्रकरणामध्ये एकूण २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालयाने याबाबत सुनावणी केली. या सुनावणीदरम्यान शेतकरी चळवळीचे नेते आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह २५ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यावेळी न्यायालयात सर्व आरोपींची बाजु ॲड परवेज खान, ॲड अनिल जयस्वाल, ॲड वसीम शेख, ॲड सहेजाद शेख, ॲड अजहर नवाज, ॲड रियाज सलाने यांनी मांडली.
——
२०१७- २०१८ मध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. ५ वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला आहे. बेनोडा शहीद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, केंद्राच्या बांधकामाला सुरुवात व्हावी आदी विविध मागण्यांसाठी केलेलं आंदोलन, शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन, दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी आंदोलन केलं. ते दडपण्यासाठी आमच्यावर राजकीय आकसापोटी खोटे गुन्हे दाखल केले, परंतु गुन्हे सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे सर्वांची निर्दोष मुक्तता केली त्याबद्दल न्यायालयाच्या निर्णयाच स्वागत करतो
-आमदार देवेंद्र भुयार
मोर्शी विधानसभा .