📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

मीरा रोडवर भीषण हिट अँड रन; कारने तरुणाला फरफटत नेले, जागीच मृत्यू, आरोपी फरार

On: July 11, 2026 3:11 PM
आम्हाला फॉलो करा:
मीरा रोडवरील ठाकूर मॉलजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, हिट अँड रन अपघात

मुंबई | प्रतिनिधी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मीरा रोड येथे पहाटेच्या सुमारास एक भीषण हिट अँड रनची घटना घडली. ठाकूर मॉलजवळ भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 35 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतर चालकाने वाहन न थांबवता तरुणाला काही अंतरापर्यंत फरफटत नेले आणि घटनास्थळावरून फरार झाला.

मृत तरुणाचे नाव जाकीर मोहम्मद शेख (वय 35) असे असून, ते पहाटे दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांच्या शरीराचे काही भाग रस्त्यावर विखुरले गेले.

घटनेची माहिती मिळताच काशिमीरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपी वाहनाचा शोध घेणे कठीण झाले आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, महामार्गावरील टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे मीरा रोड परिसरात हळहळ व्यक्त होत असून, राष्ट्रीय महामार्गांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

चेक बाऊन्स प्रकरणात 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर अभिनेता राजपाल यादव

राजपाल यादवला 3 महिन्यांचा तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबईच्या महापौर ऋतु तावडे विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना पत्रकार परिषदेत बोलताना

मी रील स्टार की रिअल स्टार? मुंबईकरच निर्णय घेतील; महापौर ऋतु तावडे यांचा विरोधकांना जोरदार टोला

रुग्णालयात आजारी चिमुकल्याला भेटताना अरिजित सिंग | Arijit Singh meets sick child in hospital

जीवन-मरणाच्या संघर्षातील चिमुकल्यासाठी अरिजित सिंग धावले; माणुसकीने जिंकली लाखोंची मनं

नाशिकच्या कळवण येथील आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी प्रकरणाबाबत प्रतीकात्मक छायाचित्र

नाशिक हादरलं! आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला दिला जन्म; नात्यातील अल्पवयीन मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

अमरावती येथे १८-१९ जुलै २०२६ रोजी आयोजित चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अधिकृत पोस्टर

अमरावतीत १८-१९ जुलैला चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन; साहित्य, गझल, कवी संमेलन आणि परिसंवादाची मेजवानी

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावतानाचे प्रतीकात्मक छायाचित्र

विधानसभेत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र, आता राज काय उत्तर देणार?