मेहनतीची फॉरच्युनर: मागून नव्हे, कमावलेली!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

मेहनतीची फॉरच्युनर: मागून नव्हे, कमावलेली!

सध्या ही गाडी पहिली होती त्या पेक्षा कितीतरी अधिक ट्रेंडिंग मध्ये आहे.नेमकं ट्रेंडिंगमध्ये असण्याचं कारण काय ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, असं मी म्हणार नाही.त्याच कारण म्हणजे, मराठी मीडियाला ज्याची हगवण सध्या लागली ते.! हगवने प्रकरण हे एक झालं. आणि दुसरं म्हणजे हॉटेल भाग्यश्री वाल्याने कष्टाने घेतलेली हीच ती गाडी. शिवाय नाद करती काय अस म्हणत  बनवलेली प्रचंड व्हायरल झालेली ती रील पाहून कष्ट केलं की, पाहिलेलं स्वप्न सत्यात  उतरू शकत. हे दाखवून जणू स्वप्नांचं प्रतीक ठरलेली गाडी.

एकाला फुकट मिळाली, परंतु त्याला ती सांभाळता आली नाही. सगळं काही असून देखील, हुंड्यात ही गाडी मागून घेऊन. खर तर स्वतःची तर इज्जत कमी केलीच परंतु त्या गाडीची ही सोशल मीडियावर पहिली कधीच झाली नव्हती इतकी बेइज्जती केली गेलेली.! आपण पाहिलं. हगवणे कुटुंबाच्या बातम्यारुपी हगवणीने व समाजमाध्यमांमध्ये देखील तिला नको तितकं बदनाम केलं गेलं.! परंतु शेवटी म्हणतात ना चांगल्याला किती ही बदनाम केलं तरी त्याच चांगुलपणा बदनाम होत नाही. तस ती गाडी परत चांगल्या कारणासाठी ट्रेंडिंगमध्ये आली. ते कारण म्हणजे हॉटेल भाग्यश्रीवाल्या तरुणाने आपल्या हॉटेलची जाहिरात न लाजता सोशल मीडियावर करून कमावलेले ग्राहक आणि त्या हॉटेल व्यवसायातून पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड. किती तरी टीका होत असताना त्याकडे दुर्लक्ष करून.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

यायला लागतय म्हणत ह्या तरुणाने नादच केला. आणि गाडी, ती ही फॉरचूनर दारात उभी करून दाखवली. मित्रानो गाडी तीच परंतु ट्रेंडिंगची कारण मात्र वेगवेगळी. मग तुम्ही कोणत्या कारणासाठी ती गाडी घेऊन ट्रेंडिंग मध्ये याल ते सांगायची गरज मला तरी वाटत नाही. कारण आवडत्या क्षेत्रात न लाजता काम केलं की भीक मागून काही घेण्याची गरज पडत नाही. कष्टातून फॉरचूनरच काय आहो हेलिकॉप्टर घेणारे सुद्धा ह्या जगात खूप आहेत.!

नोकरी नाही पैसा नाही अथवा कुणी तरी देईल ह्या आशेवर कुढत बसण्यापेक्षा  काहीतरी करून घडत जाऊ आणि ही गाडी आपण ही स्वकमाईवर घेऊ हा विचार करू. तर मग लागा कामाला  मी ही तयारी करतो तुम्ही ही करा….!

स्वप्न पाहिलीच नाही तर

ती सत्यात उतरणार कशी

म्हणून स्वप्नं जरूर पहा…

स्वप्नाच्या  वाटेवर चालत रहा……

अशोक पवार