बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया दिवस साजरा
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 25 एप्रिल 2025 जागतिक मलेरिया दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मलेरिया विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.
कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना मलेरिया हा आजार कशामुळे होतो, त्याची लक्षणे कोणती, तसेच त्यापासून बचावासाठी कोणती काळजी घ्यावी लागते याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी हिवताप प्रतिबंधासाठी “गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा” तसेच “क्लोरोकिनची गोळी, करी हिवतापाची होळी” अशी आकर्षक घोषवाक्य फलकांवर लावण्यात आली.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
यावर्षीच्या जागतिक मलेरिया दिनाचे घोषवाक्य होते — “चला हिवताप संपवूया – पुनर्विचार करा, योगदान द्या, पुन्हा सक्रिय व्हा.”
कार्यक्रमाच्या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. उईके मॅडम, आरोग्य सहाय्यक श्री. शेळके, आरोग्य सेवक श्री. चरपे, खडसे, भोपळे, काकडे, आरोग्य सेविका सौ. चिडे, आरोग्य सहाय्यिका सौ. चव्हाण, औषध निर्माण अधिकारी काकडे मॅडम व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी हिवताप निर्मूलनासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये मलेरिया विषयी जागरूकता निर्माण झाली असून, आरोग्य केंद्राचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे.