📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

वाशिममध्ये कांचन नदीला अचानक पूर; शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान, रिसोड-कोयाळी मार्ग ठप्प.!

On: June 28, 2026 6:13 PM
आम्हाला फॉलो करा:
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात कांचन नदीला आलेला पूर आणि पाण्यात बुडालेली शेती

वाशिम | प्रतिनिधी

मुसळधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातून वाहणाऱ्या कांचन नदीने रौद्ररूप धारण केले असून, अचानक आलेल्या पुरामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे रिसोड-कोयाळी मार्ग काही काळासाठी पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, तर नदीकाठावरील शेकडो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

राज्यात मान्सूनने उशिरा हजेरी लावली असली तरी आता पावसाने जोर धरला आहे. वाशिममध्ये सलग पडणाऱ्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येत असून, कांचन नदीच्या पुरामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात पूर आला त्या परिसरात अतिवृष्टी झाली नव्हती. बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी कांचन नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात आल्याने हा अचानक पूर आला.

पुराच्या तीव्र प्रवाहामुळे नदीकाठच्या अनेक शेतांमध्ये पाणी घुसले. अनेक ठिकाणी सुपीक माती वाहून गेली, तर काही शेतांच्या बांधांना तडे गेले आहेत. ऐन पेरणीच्या हंगामात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांपासून कांचन नदीला वारंवार पूर येत असून नदीचे खोलीकरण आणि पात्राची सुधारणा करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, प्रशासनाकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

वारंवार होणाऱ्या पूरस्थितीमुळे शेती, रस्ते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नदीचे खोलीकरण, तटबंदी आणि कायमस्वरूपी पूरनियंत्रण उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांकडून होत आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

मीरा रोडवरील ठाकूर मॉलजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, हिट अँड रन अपघात

मीरा रोडवर भीषण हिट अँड रन; कारने तरुणाला फरफटत नेले, जागीच मृत्यू, आरोपी फरार

मुंबईच्या महापौर ऋतु तावडे विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना पत्रकार परिषदेत बोलताना

मी रील स्टार की रिअल स्टार? मुंबईकरच निर्णय घेतील; महापौर ऋतु तावडे यांचा विरोधकांना जोरदार टोला

रुग्णालयात आजारी चिमुकल्याला भेटताना अरिजित सिंग | Arijit Singh meets sick child in hospital

जीवन-मरणाच्या संघर्षातील चिमुकल्यासाठी अरिजित सिंग धावले; माणुसकीने जिंकली लाखोंची मनं

नाशिकच्या कळवण येथील आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी प्रकरणाबाबत प्रतीकात्मक छायाचित्र

नाशिक हादरलं! आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला दिला जन्म; नात्यातील अल्पवयीन मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

अमरावती येथे १८-१९ जुलै २०२६ रोजी आयोजित चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अधिकृत पोस्टर

अमरावतीत १८-१९ जुलैला चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन; साहित्य, गझल, कवी संमेलन आणि परिसंवादाची मेजवानी

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावतानाचे प्रतीकात्मक छायाचित्र

विधानसभेत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र, आता राज काय उत्तर देणार?