मी”, गटेवाडी बोलतेय”…! स्वातंत्र्य मिळाल्या पासून तस मी”, दुर्लक्षित.किती तरी पंचवार्षिक आल्या आणि गेल्या.तश्या निवडणूका ही कितीतरी आल्या आणि गेल्या. खर तर आमदार किती झाले. आणि खासदार कोण झाले? हे कधी माझ्या नशिबी पाहण्याच सुख आलंच नाही. कारण मला थोडं न चालून तिथपर्यंत जाता येत होतं. त्यांना चालता येत असून
ते मात्र फिरकले नाही चुकूनही.
परंतु म्हणतात ना
इंतजार का फल
मीठा होता है
अगदी तस झालं.
इथून मागे ही सत्ता बदलत गेल्या. सत्तांतर होत गेली .परंतु ह्या वेळी झालेलं सत्तांतर मात्र जणू माझा वनवास संपवण्यासाठी झालं अस मला का कुणास टाऊक वाटू लागलं.हळू हळू माझ्या अंगा खांद्यावर खेळणारी लेकर(ग्रामस्थ) कधी नव्हे इतकी आनंदी झाली होती कारण एक तरुण लोकप्रतिनिधी निवडून आला होता. तो ही दिगग्ज राजकीय घराण्यांना चारीमुंड्या चित करत. तो म्हणजे निलेश लकें. तस त्याच आणि माझे ऋणानुबंध जुने बर का? कारन त्याचे वडील. गुरुजी माझ्या लेकरांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत होते.
काळ सरकत होता. तस तशी विकासगंगा निलेश लकेंह्या आमदाराच्या रूपाने गावात पोहचू लागली होती. आणि आमदार कसा असतो? हे न पाहिलेल्या मला तो किती तरी वेळा भेटायला देखील आला. विकास कामाची यादी खूप मोठी आहे. जवळ जवळ साडे नऊ कोटी रु. इतका मोठा निधी देऊन ,फक्त जाहीर नव्हे .माझा कायापालट ह्या आमदाराने केला. आणि एक वेगळी ओळख मला करून दिली त्या बद्दल मी” गटेवाडी आणि माझी सारी लेकर सदैव
ऋणी राहतील….!.