विद्यमान समाज कसा असावा
माणसामाणसातील बंधुत्व कायम राहण्यासाठी आणि स्वतंत्र अबाधित राहून देशाची उन्नती ,प्रगती ,विज्ञान ,वाणिज्य ,या मधून प्रगती व्हावी ,स्वतंत्र्याचे मुक्तागंण सर्वांसाठी प्रकाशमान व्हावे यासाठी भारताने संविधानाची निर्मिती केली आहे.आज संविधानरूपी माणसाला पंख मिळाले ,विज्ञानाच्या रूपाने आलेले पंख पसरून त्यांने चंद्रावर झेप घेतली तरी चंद्रावर जाण्याची शक्ती गोमुत्राने दिली असे म्हणणारे काही कमी नाही.
माणूस जागी करून माणसामधील युटोपिया अधिकाअधिक प्रखर प्रकाशात नेत आहे तरी का संविधानालाच विरोध होतो,कारण फक्त १५%लोक ८५%टक्केलोकांची मुक्तशाही बघू शकत नाही म्हणून विद्यमान समाजव्यवस्था सडते आहे आणि तिला दुर्धर आजाराचे रूप येते आहे.तेव्हा अनेक माणसांना या खाजगीकरणनांची लाज वाटावी तशी या व्यवस्थेची वाटत आहे.
आजचा विद्यमान समाज नव्या बद्लाची अपेक्षा करतो आहे. हजारोवर्षापासून धर्म आणि जातीजाती मध्ये पडून पडुन त्याला दैववादी परपंराचा वीट आला आहे.तो नाविन्यपूर्ण जीवनजगणार् या सूर्याकडे पाहत आहे.त्याला मुक्तगगणाचे पंख फुटले आहेत तो मुक्त उडू पाहतो आहे..तो चाकोरीबद्ध मधून माणसात विलीन होण्यासाठी तडफडून जात आहे.परंतु मनुवादी अवस्था त्यांच्या मुक्तपणाचे पंख छाटून टाकण्यासाठी पूढे सरकावत आहे .जाती धर्माच्या नावाने त्याला प्रकाशातून अंधारात नेत आहे .त्या अंधाराला चिरून संविधानाचे महत्व अंगीकारून त्यांचे मुल्य त्याची महानता ,त्यांची व्यापता सांगत आहे तो ठरवित आहे.
आजचा विद्यामान समाज कसा असावा ?
या विद्यामान समाजाने कोणते तत्व पाळायला पाहिजे ,विद्यमान समाजाने भगिनीत्व.आणि बंधुत्व पाळायला पाहिजे. विद्यमान समाजाने कोणत्याही माणसाचे शोषण करू नये ,कोणत्याही स्त्रीचे शोषण करू नये जाती जातीचे शोषण जातीनेच करू नये, माणसाने यालाच बंधुत्वामय समाज असे म्हटले आहे असा समाज असेल तर आपण या सामाजिक संस्काराला आदर्श समाज म्हणतो .मग इथे कुणीही कुणाला दुय्यमच्या भावनेने पाहत नाही ,मी श्रेष्ठ आहे असा दावा कोणीही करत नाही, भेदभाव न करता कोणालाही दुय्यम न ठरवता माणूसपणाने माणूससत्व अंगीकारून जगू शकतो असा समातेचा ,एकात्मतेचा सेतू या लोकांना मध्ये असतो वर्ण विहिन ,जाती विहिन , पोटजातीविहिन समाजाला आदर्श समाज म्हटल्या गेले आहे असा विद्यमान समाज डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना हवा होता.
भारताचा ,महाराष्ट्राचा समाज हा निष्ठाशुन्य तत्वज्ञानशुन्य मुल्यशुन्य असा झाला आहे .हा परपंरावादी जातीवादी धर्मवादी धर्मांद समाज झालेला आहे .राजकारणाशिवाय या समाजाला दुसर काहीही वेळ उरलेला नाही. माणूस आता गौण आणि राजकारण आता प्रधान झालेल आहे.मुख्य झालेलं आहे अशा समाजात सत्ताकारणात राजकारण आल की निवडणूक महत्वाची ठरते या निवडणूकीसाठी जातीना प्राधान्य दिलं जातं ,पोटजातींना विशेष म्हणजे जातींजातींना प्राधान्य दिल जात ,या जाती तीव्र होत जातात .भाल्यासारखी अणुकचीदार होतात ,धर्माबद्लची अंधकता स्फोटकता अधिकच प्रज्वलवनशील होत जाते. अश्या या काळामध्ये माणसे सुरक्षित राहत नाही.
स्त्रीया सुरक्षित राहत नाही. दुर्बलघटक म्हणजे मुसलमान असो बुध्द असो आणखी कोणते आदीवासी असो.या समाजातील लोकांवर खुप अत्याचार वाढतात खुप अत्याचारी यासाठी वाढतात कारण हे लोक वेगळे मार्ग अनुसरतात, सत्तेला वाटते की जे आम्ही सांगतो ते या लोकांनी ऐकावं.ते लोक असे ऐकत नाही तेव्हा ते अद्ल घडवितात माठातील पाणी प्याला म्हणून शाळेतील मास्तर खुप मारतो त्याच वेळी त्या मुलांचा जीव जातो.एकाद्याला जोड्यामधून पाणी पाजल जात एखाद्या दलित माणसाला.आदीवासी माणसाला मारल जात स्त्रीयांची नग्न धिंड काढली जाते ,बलात्कार होतात ,सामुहिक बलात्कार होतात अस सगळ वातावरण तयार केल जातं, दहशत निर्माण केली जाते .जो पक्ष शाशन करता आहे.तो इतर लोंकांना दहशतीत ठेवण्याचा प्रयत्न करतो.आणि ते आपल्यासारखे वागले नाहीतर हे सगळे.तर त्यांच्यावर वेगवेगळ्या तर् हेचे आरोप केले जातात कुंपण हे शेताच्या सरंक्षणासाठी असते.पण जेव्हा कुंपणच शेत खायला उठले तर शेत अनाथ होऊन जातं कोणी वाली उरत नाही शेताला ?
एका सिनेमातील एक वाक्य आहे
पारो..जिस दिये मै तेल नही है उस दिये को बुझ जाना चाहिये I
बिजीपीमध्ये आरोपी गेले तर त्यांचे आरोप धुतल्या जातात नगरसेवक ,असो वा आमदार खासदार , कि मंत्री असो .ते हजारो कोटीचा मालक होतात. मुद्दा असा आहे की हा पैसा कोणाचा असतो.जनतेचा पैसा आपल्या खिशात घालणारे लोक सत्तेमध्ये राहणारे लोक आपल्या घरी घेऊन जातात.
अशा प्रकारच राजकारण अशा प्रकारच भष्टकारण अशा प्रकारच शोषण ज्याला आपण म्हणतो की कुंपण हे शेताच्या संरक्षणासाठी असते तेच कुंपण शेत खायाला निघाले आहे. आपल्यादेशामध्ये सरजांमदार भांडवलदार यांची ब्राह्मणवाद्याची संख्या १५℅टक्के फक्त आहे.आणि उरलेले ८५%ते शुद्र ,अतिशुद्र ,मुस्लिम ,आदीवासी ख़िर्चन ,विमुक्त ,जैन असे सगळे लोक या ८५%मध्ये आहेत असे असले तरीही या देशावरती आदावाशी , तेली , माळी , राजकारणात माणूस गौण झाला आहे. शाळेतील मुलाने तहान लागली म्हणून शाळेत ठेवलेल्या मटक्यातील पाणी प्याला म्हणून बेदम मारलं ही माणूसहिनत्वता या देशाला काळीमा लावण्याचे काम करत आहे हा चेहरा आपल्याला बदलण्याची गरज आहे. म्हणजे ८5%लोकांचे हे शोषण करतात ,यांची उत्पती मंदीरातून होते ,दैववादी पूराणावादी मधून होतो. हे एवढे अमानुष अन्याय केवळ जातीमुल्य स्थापीत करण्यासाठी सत्तेसाठी पेटणारा हा मुल्यहीन विचाराचा समाज होत आहे.
ज्यांच्या मध्ये मुल्य नाही माणुसकी नाही .परस्पराविषयी कळवळा नाही असा समाज माणूसकी शुन्य झालेला आहे. अल्पसंख्याक लोक कधीही एकत्र येऊ शकत नाही .जाती एकत्र येऊ शकत नाही. गट एकत्र येऊ शकत आणि सत्तेत जाऊ शकत नाही त्या साठीच या पंधराटक्कानीच यांना जातीमध्ये वाटून दिलं आहे ही एकत्र येऊ नयेत म्हणून यांना वेगवेगळ्या धर्मामध्ये टाकले आहे धर्माचे अभिमान शिकवले जातात ते एकत्र येऊ नये म्हणून, पोटजातीचे अभिमान शिकवले जातात ते एकत्र येऊ नये म्हणून, स्त्रीयांना परपंरामध्ये गुंतवल्या जातं मंदीरामध्ये अर्थवशिर्षक वाचण्यामध्ये आणि हनुमान चालीसा वाचण्यामध्ये स्त्रियांना गुंतवल्या जांत. म्हणजे या ८५%लोंकाना तोडून मोडून तुकडे करून त्यांना गुलाम ठेवलं जातं स्त्रियांसगट सगळ्या जातीधर्मामधल्या आणि वर्णामधल्या पुरूषांना या प्रकारे तोडल्या जातं ब्रोकन केल्या जात म्हणून ही मंडळी एकत्र येत नाही त्यांची सत्ता प्रस्थापित होत नाही ते कायम प्रजा राहतात ते राजे होत नाही.
बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते माझ्या संविधानाने तुम्हा सगळ्या लोकांना ८५% लोकांना तत्वःता या देशाचे मालक केले आहे फक्त तुम्ही एकत्र या आणि सत्तेच्या किल्या आपल्या हातात घ्या.म्हणून या संगळ्यानी एकत्र यायाला पाहिजे , डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले तसेच इतरही समाजीक कार्यात स्वतःला झोकून दिलेल्या लोकांनी सुध्दा सांगितले की तुम्ही एकत्र या .पण हे लोक काही एकत्र येत नाही त्यांच्या जाती पोटजातीचा धर्म एकच आहे तो म्हणजे या लोकांची गुलामी त्यांच्या जातीनं संभाळली आहे.पोटजातीने पथांने आणि संभाळली आहे या लोकांना ही गुलामी तोडून बाहेर येता येत नाही आणि सत्तेत जाता येत नाही मुक्तीकोण पथे असे डाँ बाबासाहेबांनी लिहला मोठा लेख .तसेच जेष्ठ साहित्यिक आंबेडकरी विचारवंत यशवंत मनोहर यांनी सुध्दा मुक्ती कोण पथे यावर लेख लिहला आहे.या मुद्दयावर भाष्य केले आहे.
हा सत्तेचा मार्ग आहे हा मुक्तीचा मार्ग आहे.पण तुम्ही गुलाम होण का पत्करता? एकत्र येण मान्य करत नाही सत्तेसाठी !! .तुम्हाला तुमची गुलामी सत्तेपेक्षा महत्वाची वाटते काय ?? तुम्हाला तुमच्या धर्मांनी सांगितले तुम्हाला तुमच्या परंपरंनी सांगितले आहे तुम्हाला संतांनी सुध्दा सांगितले आहे.गुलामी देव देव करून जातीजातीचा गर्व अभिमान तोडून माणूस व्हा आणि या सगळ्या विषमतावरती भष्टाचारावरती एकच उपाय आहे तो म्हणजे तुमचे सर्व ८५% लोक एकत्र येणे फुले शाहू आंबेडकरांच्या संविधानाच्या नुसार जे प्रकासन संभाळतात त्यांनी विद्यमान समाज म्हणजे काय ,या अनुशाशनाला प्रारंभ करणे अस झाल तर हे सगळे प्रश्न भारतातले सगळ्या समस्याभारतातल्या सगळे सगळे भष्टाचार भारतातले संपू शकतात हे पध्दती शास्त्र आहे..
जर ८५%टक्के लोकांनी अंगीकारले तर हे सर्वच लोकांच्या कल्याणाच पध्दतीशास्त्र आहे म्हणजे लोकशाही ,यालाच लोकसत्ताक ,वा गणतंंत्र ,.नीतीशाशन म्हटल्या जातं सुसंस्कृतीचे न्यायाचे प्रज्ञेच एकच व्याकरण म्हणजे विद्यामान समाज होय.!
-सुनीता इंगळे
मुर्तिजापूर 7218694305
ReplyForward |