
घटस्फोट : गुन्हा की यल्गार? आधुनिक वैवाहिक वास्तव
आज बर्याच आत्महत्या होत आहेत. काही घटस्फोटातून आहेत व वाटायला लागलं आहे की घटस्फोट हा गुन्हा आहे की यल्गार? खरं तर घटस्फोट व्हायला हवेत. पती पत्नीचं जर एकमेकांशी पटत नसेल तर….. परंतु कधीकधी घटस्फोट हे वेगळ्याच कारणानं होतात. जेव्हा कधीकधी विवाहाचा वापर हा खावटी म्हणून पैसा कमवून ऐषआरामात जीवन जगण्यासाठी केल्या जातो. काही वेळेस विवाह हे खावटी मिळवून ऐषआरामाचं आयुष्य जगण्यासाठी केले जात असल्याचं निदर्शनास येतं. अशाच कारणातून कधीकधी आत्महत्या वा खुनासारखे कृत्य घडून येतात. ज्यातून स्वतः जन्मास घातलेली मुलंही सुटत नाहीत.
आज बर्याच आत्महत्या होत आहेत. कधी शेती पिकली नाही म्हणून. कधी परीक्षेत नापास झाले म्हणून. कधी प्रेमभंग झाला म्हणून तर कधी कोणी कोणाला छळलं म्हणून. परंतु पती पत्नी वितुष्टातून आत्महत्या झालेल्या जास्त करुन कोणी ऐकलेल्या नाहीत. ज्या बऱ्याच प्रमाणात होतात. परंतु त्याचा गाजावाजा होत नाही नव्हे तर केल्या जात नाही. मग काय यात कोणी डिप्रेशन मध्ये जावून अधिक दारु पिणं सुरु करतात. ज्यातून दारु पिवून मरण येत असतं व लोकं त्या मृत्यूला आत्महत्या न समजता दारु पिवून मेला. असं समजतात.
घटस्फोट……. घटस्फोट होतात. तशी त्याची बरीच कारणं आहेत. परंतु सर्वात महत्वपुर्ण कारण असतं संबंधीत पती असलेल्या व्यक्तीचं दारु पिणं. पती दारु पितो, हेच त्याचं चुकतं आणि त्यांचा पत्नीवर्ग त्यांना सोडून जातो. म्हटलं जातं की पती जर दारु पितो, तर पत्नी दारु का पिवू शकत नाही आणि एखाद्यावेळेस पत्नीनं दारु पिल्यास तिला नावबोटं ठेवली जातात. तसं पाहिल्यास आज बर्याच स्रियाही दारु प्यायला लागलेल्या आहेत.
घटस्फोट. घटस्फोट घेणं हा कायदेशीर मार्ग. जर पती पत्नी दोघांचं पटत नसेल तर….. कधी पतीचं चुकतं तर कधी पत्नीचं चुकतं. कधी पतीचं नव्वद प्रतिशत चुकतं तर कधी पत्नीचं नव्वद प्रतिशत चुकतं. परंतु नेहमीच्या सवयीप्रमाणे दोष हा दुसऱ्यांवरच लावला जातो. खासकरुन पती हा पुरुष असल्यानं त्याचेवरच जास्त करुन दोष लावला जातो.
दोघांच्या स्वभावाचं वर्णन करतांना असं म्हणावं लागेल की दोघांचाही स्वभाव ससा आणि कासवाच्या शर्यतीसारखा आहे. जशी सशाला टुणकन उड्या मारायची सवय असते. तशीच सवय पतीलाही असते. जो टुणकन सशासारखी उडी मारल्यागत बोलतो. त्या बोलण्यावर विचारच करीत नाही की पुढे काय घडणार आहे? त्याचा विचार न करता तो बोलतो. तसं त्याच्या मनात काहीही नसतं. तो पत्नीवर निरतिशय प्रेम करीत असतो. ज्याचा परिणाम पत्नीवर होतो. परंतु पतीच्या मनात त्याबद्दल काही राग नसतोच. तो फक्त बोलतो व विसरुन जातो. पत्नी मात्र कासवासारखी असते. ती बोलत नाही. असं वाटते सर्वांना. परंतु तिची कुरकूर सतत सुरु असते हळूहळू कासवाच्या चालीसारखी. ज्याचा राग धुमसतो व त्या रागाचे रुपांतर मोठ्या वादळात अर्थात स्फोटात होते. ज्याला घटस्फोट असं म्हणता येईल. त्यानंतर त्या दोघांचीही अवस्था कुत्रा व गाढवाच्या कथेसारखी होते. कुत्रा आणि गाढव जेव्हा जिंकायची शर्यत लावतात. तेव्हा गाढव जिंकतं. कारण त्याला त्याच्या बिरादरीतील लोकं अडवीत नाहीत. परंतु कुत्रा शर्यतीत धावायला लागला की त्याचेवर एवढी गल्लीतील कुत्री भूंकत असतात की त्याचा सामना करता करता कुत्रा शर्यतीत मागे पडतो. ज्याला गाढवापेक्षा जास्त जोराने धावता येतं. तसा घटस्फोट झाला किंवा वाद वाढलाच तर त्या पुरुषांच्याच बिरादरीतील लोकंच त्याचेवर कुत्र्याच्या कथेतील कुत्र्यासारखे ओरडत असतात. ते त्यालाच नावबोटं ठेवत असतात. ते दोष कोणाचा आहे, याचाही विचार करीत नाही. ज्यातून गाढवाच्या रुपकासारखे मुर्ख विचार अग्रगण्य ठरतात. ज्यातून पत्नीवर्गाला कोणीही दोष देत नाही. दोष तिचा जरी असला तरी तिचं भागत असतं.
हे एक उदाहरण आहे. ज्यात गाढव व कुत्रा वा ससा व कासव. याशी काही एक संबंध नाही. अन् ही वास्तविकताही नाही. वास्तविकतेनुसार ससा व कुत्र्याला दोषी समजलं जातं. अन् त्यांना न्यायापासून वंचीत केलं जातं. न्याय मिळतो कासव वा गर्दभाला. तेच राज करतात. कारण दोघंही स्वतःचा दोष नाही हेच दाखवतात. ते दैवयोगानं व परिस्थितीनं घडतं की दोघंही शर्यंत जिंकतात व विजयी ठरतात, तेवढे हुशार नसुनही. तसंच घटस्फोटाच्याही बाबतीत घडतं. घटस्फोटात पती पत्नी दोघंही भांडणातून घटस्फोट घेत असली तरी संसारचक्रात व्यत्यय आणत पत्नी कासव व गर्दभासारखी घटस्फोटाची शर्यंत जिंकते. तिला मानधन म्हणून बरेचसे पैसेही खावटी म्हणून मिळतात. तसं पाहिल्यास ती सायलेंट किलर असते. पतीरुपाला तीळ तीळ मारण्यासाठी. ज्या घटस्फोटातून पतीच्या मनावर परिणाम होतो हळूहळू व पती नावाचा पुरुष त्या धक्क्यानं हळूहळू नेस्तनाबूत होत असतो. त्याचं सुंदर व्यक्तीमत्वही त्याच घटस्फोटाच्या डागानं डागाळलं जातं. दोष त्याचा तेवढ्या प्रमाणात नसतांना. तिचा मात्र गुन्हा हा दिसूनच येत नाही. कारण संसाररुपी घटस्फोटाची शर्यंत जिंकत असतांना ती स्रीवर्ग असल्यानं तिच्या वाट्याला कोणीही जात नाही. उलट पती असलेले पुरुष. त्यांना त्यांचीच बिरादरी बोलून मोकळी होते.
सृष्टीचा नियमच आहे की जो झिजतो. तो तेवढ्याच लवकर समाप्त होतो. चंदन ही वनस्पती घासली तर तिचा सुगंध परिसरात दरवळतो. परंतु त्याचक्षणी तिची झीज होत असते. तसंच पतीचंही आहे नव्हे तर संपुर्ण पुरुषजातीचं. पती हा पत्नीसाठी झीज झीज झीजतो. परंतु त्याला तेवढं करुनही काहीच मिळत नाही. उलट शुल्लकशा कारणावरुन जेव्हा घटस्फोट होतो. तेव्हा त्याला सारंच संपल्यासारखं वाटतं. महत्वपुर्ण बाब ही की जर पत्नी चांगली लाभली तर घराचं नंदनवनच होतं. ज्याला स्वर्गसुख म्हणता येईल आणि पत्नी जर चांगली लाभली नाही तर घरादारात नरकयातना सुरु होतात. ज्याला नरकवास असं म्हणता येईल.
विशेष सांगायचं झाल्यास घटस्फोट होवूच नये. कारण त्यातून पुरुषजात खचते. स्रीवर्ग तेवढा खचत नाही. पुरुष स्वतः दुसरा विवाहही करु शकत नाही. सतरा वेळा विचार करतो. त्याला ती सतत आठवत असते. स्री मात्र सर्व विसरते. तिला कोण पती व कोणता टुरुष आपल्या जीवनात होता. तेही आठवत नाही. तशीच दुसरी बाब सांगायची झाल्यास हुंडा घेणे देणे हा आज न्यायीक प्रक्रियेनुसार गुन्हा मानला जातो. मग ज्यावेळेस खावटी न्यायालयीन प्रक्रियेनुसार मंजूर केली जाते. तेव्हा तिही रक्कम ही हुंडा म्हणून ग्राह्य धरली जायलाच हवी. अन् ती रक्कम वधूपक्षाला देणं म्हणजे गुन्हाच. परंतु तसं घडत नाही. खुद्द न्यायालयच वधूपक्षाला खावटी म्हणून रक्कम मंजूर करते. ज्या रकमेची राशी ही एवढी विशाल असते की ती राशी सर्वसाधारण माणसाच्या देय कर्तृत्वाच्या कितीतरी दूरची असते. परंतु अडकून असलेला व्यक्ती, धड तिही नांदायला न येत असल्यानं न्यायालयातील प्रक्रियेनुसार ती राशी न्यायालया माध्यमातून तिला मिळावी व आपला खटला तुटावा. यासाठी भरते. ज्यातून खटला तुटतो. परंतु तीच राशी कर्ज घेवून काढल्यानं व त्याच राशीचे व्याजावर व्याज चढत गेल्यानं प्रसंगी त्या व्यक्तीला टेंशन येतं व एक दिवस तो आत्महत्या करुन मोकळा होतो.
अशी आत्महत्येची बरीच प्रकरणं घडलेली आहेत. कधीकधी पत्नी जेव्हा पतीच्या रागावरुन बाहेर अर्थात माहेरी जाते व येत नाही. तेव्हाही बऱ्याच आत्महत्या होतात. परंतु त्या आत्महत्या पत्नी निघून गेल्यानं केल्या गेली. याची नोंद पुरुष करीत नाहीत. कारण कोणताच पुरुष महिलांना फसवायचं पाहात नाही. तिच्यावर निरतिशय प्रेम करतो. मात्र पत्नी असलेली महिला ही नेहमी पुरुष असलेल्या पतीला फसवायचाच विचार करीत असते. ती प्रसंगी मुलंही हिसकावून घेते पतीपासून. त्यांना भेटूही देत नाही. त्यांचं तोंडही पाहू देत नाही. उलट त्याचेकडून त्याच मुलांचे पालनपोषण व्हावे यासाठी खावटी म्हणून पैसा घेत असते आणि तो देत असतो. कारण तो आपल्या पत्नीवर व मुलाबाळावर प्रेम करीत असतो निरतिशय. ते त्याचं खरं प्रेम असते. परंतु ती समजून घेत नाही. मुलाबाळांनाही समजून घ्यायला लावत नाही. ती मुलंही आणि तीही खावटी घेत त्याच्याच पैशावर जगतात आणि तो दुरुन दिसताच त्याची हेळसांड करतात. अशातच त्याला कधी राग येतो व तो आपलं जीवन समाप्त करतो. परंतु आपलं जीवन समाप्त करण्यापुर्वी विचार करतो कधीकधी की आपलं जीवन संपविण्यापुर्वी जर पत्नी आणि मुलांनाच संपवलं तर. असाच विचार करीत तो संधी शोधत असतो व ज्यावेळेस त्याला संधी चालून येते. त्या दिवशी तो आपली पत्नी व कधीकधी आपल्या पोटच्या मुवामुलींचाही खुन करतो व स्वतःही आत्महत्या करुन मोकळा होतो.
महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या कुशीत घडलेली दोन जुळ्या मुलीची आत्महत्या. ज्यात त्या बापाने आपल्या दोन जुळ्या मुलींना जःगलात नेलं व मारुन टाकलं. ही क्रूर घटना आहे. ज्याचा सर्वस्तरावरुन निषेधच व्हायला पाहिजे. या घटनेत काय घडलं नेमकं ते माहीत नाही. परंतु काही प्रकरणं निश्चीतच वर सांगीतलेल्या प्रकारानं घडत असतात. काही ठिकाणी स्वतः पती मरतो तर काही ठिकाणी मुलं तर काही ठिकाणी पत्नी. तसं आज कलियुग आहे. कोण कोणाचा जीव घेऊन मोकळा होईल, ते सांगता येणं कठीण आहे. परंतु घटस्फोटाच्या माध्यमातून असे प्रकार घडणे वा होणे ही चिंतेची बाबच आहे. असं जर घडत असेल वा घडवायचं असेल तर त्यापेक्षा विवाह न करणे तेवढेच गरजेचे आहे आणि विवाह जर केल्या गेला तर घटस्फोट न घेणे हे तेवढेच महत्वाचे आहे. कारण असा घटस्फोट नसावा की ज्यातून कुणाचा जीव जाईल व तो पृथ्वीवरील परेमेश्वराच्या जन्म देण्याच्या कृतीला बाधक ठरेल व परमेश्वरालाही स्वतःची लाज वाटेल व तो म्हणेल की काश! मी त्यांना जन्म दिला नसता तर बरे झाले असते.
अंकुश शिंगाडे
नागपूर
९३७३३५९४५०