![](https://www.gauravprakashan.com/wp-content/uploads/2024/03/400.jpeg)
४०० विधवा महिलांना रोजगार उपलब्ध
गौरव प्रकाशन अमरावती(प्रतिनिधी) महानगरपालिका अमरावती महिला व बालविकास विभाग द्वारा संचालित स्वयं आधार प्रकल्प अंतर्गत अमरावती शहरातील विधवा, घटस्फोटित, पारीतक्त्या महिलांकरिता कौशल्यावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असून या प्रशिक्षणा दरम्यान नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरात Technocrat Industres India ltd. Amravati येथे इंडस्ट्रियल विजिट आयोजित करण्यात आली होती.या कंपनी मध्ये कापसाच्या रुई पासून धागा व धाग्यांपासून कापड आणि कापडापासून विविध प्रकारची ड्रेसेस तयार करण्यात येतात .
या ठिकाणी ट्रेन महिलांकरिता 400 च्या वर जॉब उपलब्ध असून सर्व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे. अमरावती शहरातील विधवा,घटस्फोटित, व परिटक्त्या महिलांना महानगरपालिकेच्या वतीने नवसंजीवनी मिळत आहे.अद्याप 300 महिलांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन महिला आत्मनिर्भर बनत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव अमरावती महानगरपालिका आहे की जो हा प्रकल्प राबवित आहे.
या कंपनी मध्ये गेलो असता येथील कंपनीचे सिनियर उपाध्यक्ष श्री रवींद्र कुमार , यांनी संपूर्ण कंपनीतील व्यवस्थापन व त्यांच्या कार्यपद्धती समजाऊन सांगितली या वेळी महानगरपालिकेचे महिला व बाल विकास अधिकारी नरेंद्र वानखेडे साहेब, श्री अमोल साकूरे, प्रियंका चव्हाण प्रिती बामनोटे, तसेच संस्थेचे संचालक ज्योती राठोड राजीव बसवनाथे , श्रीअतुल काळे. व 40 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.