उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी केली झोन क्र.३ व ४ हॉस्पीटलची पाहणी
अमरावती (प्रतिनिधी) : उपायुक्त (प्रशासन) डॉ.मेघना वासनकर यांनी गुरुवार दिनांक १३ एप्रिल,२०२३ रोजी आयसोलेशन दवाखाना, मोदी हॉस्पीटल, दक्षिण झोन क्र.४ बडनेरा, पुर्व झोन क्र.३ दस्तुरनगर ची पाहणी केली. या पाहणी दरम्यान सहाय्यक आयुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे उपस्थित होते.
उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी आयसोलेशन दवाखाना व मोदी हॉस्पीटल या दवाखान्याची पाहणी केली. उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी पाहणी करतांना सांगितले की, या दवाखान्याचे नियोजन अत्यंत उत्कृष्टरित्या करण्यात आले आहे. सदर काम गतीमान व दर्जेदार करण्यात आले आहे.
येणा-या अडचणी त्वरीत सोडवून सदर काम पूर्णत्वास नेले आहे. या परिसरातील नागरिकांसाठी मोठी सुविधा उपलब्ध असून उपायुक्तांनी सदर कामाबाबत समाधान व्यक्त करतांना महानगरपालिकेचे खरे दायित्व पुर्ण होत आहे. रूग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी, सर्व सुविधा मिळण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सक्षम असल्याचा विश्वास उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी व्यक्त केला. सदर दवाखान्यातील स्टाफ रूम, डॉक्टर्स रूम, लेबॉरटरी, ओपीडी, औषधालयात जाऊन पाहणी केली. सदर दवाखान्यातील कामकाज बघून उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी समाधान व्यक्त केले.
उपायुक्त (प्रशासन) डॉ.मेघना वासनकर यांनी दक्षिण झोन क्र.४ बडनेरा, पुर्व झोन क्र.३ दस्तुरनगर पाहणी केली. यावेळी उपायुक्त डॉ.मेघना वासनकर सदर झोनला भेट देत प्रत्यक्ष पाहणी करून सदर झोन कार्यालयाची रचना व विभागांची व्यवस्था जाणून घेतली. सदर झोनमध्ये विभागप्रमुखांची दालने, अधिका-यांची दालने, कर्मचारी बैठक व्यवस्था यांची पाहणी करत उपायुक्तांनी याबाबतची माहिती जाणून घेतली.