Monday, March 2

News

नागपूर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जल्लोष; विक्रमी गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
News

नागपूर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जल्लोष; विक्रमी गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नागपूर : नागपूरची ऐतिहासिक दीक्षाभूमी पुन्हा एकदा लाखो अनुयायांच्या उपस्थितीने गजबजून गेली आहे. यंदा ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा होत आहे. दरवर्षी साधारण पाच ते सहा लाख अनुयायी दाखल होतात; मात्र यंदा विक्रमी गर्दी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने या पार्श्वभूमीवर व्यापक तयारी केली आहे.विक्रमी गर्दीची शक्यताडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून बौद्ध अनुयायांचा ओघ सुरू झाला असून, यंदा १२ ते १५ लाख अनुयायी नागपूरात दाखल होण्याची शक्यता आहे.पोलिसांचा चोख बंदोबस्तगर्दी नियंत्रणासाठी नागपूर पोलिसांनी विशेष योजना आखली आहे. १२०० पोलीस कर्मचारी व अधिकारी, एसआरपीच्या दोन तुकड्या, २ डीसीपी, ४ एसीपी आणि १०० अधिकारी या ठिकाणी...
पैठणच्या शेतकऱ्याचा KBC मधील पराक्रम : ५० लाखांची कमाई
News

पैठणच्या शेतकऱ्याचा KBC मधील पराक्रम : ५० लाखांची कमाई

पैठणच्या शेतकऱ्याचा KBC मधील पराक्रम : ५० लाखांची कमाईमुंबई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील शेतकरी कैलास कुंटेवाड यांनी कौन बनेगा करोडपती (KBC) या कार्यक्रमात मोठा पराक्रम केला आहे. कैलास यांनी एकही लाईफलाईन न वापरता तब्बल ५० लाख रुपये जिंकले.सोमवारी प्रसारित झालेल्या भागात कैलास यांनी सलग १४ प्रश्नांची बरोबर उत्तरे देत सर्वांना थक्क केले. शेवटी १ कोटी रुपयांसाठी १५ वा प्रश्न समोर आला. त्यांनी लाईफलाईन वापरूनही खात्री न पटल्याने ५० लाखांच्या रकमेसह गेम क्विट केला.कैलास हे व्यवसायाने शेतकरी असून महिन्याला फक्त ३-४ हजार रुपयांचीच कमाई होते. मात्र, त्यांच्या डोळ्यात क्रिकेटचं स्वप्न आहे. स्वतःला क्रिकेटपटू होण्याची संधी न मिळाल्याने आता आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षण देऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार आहे.अमिताभ बच्...
ओला दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक सवाल
News

ओला दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक सवाल

मुंबई : राज्यभर पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारकडून अद्याप 'ओला दुष्काळ' जाहीर करण्यात आलेला नाही. या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.“विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे दु:ख पाहून वेदना होत आहेत, असं फडणवीस म्हणाले होते. पण विरोधी पक्षनेते असताना वेदना होतात आणि मुख्यमंत्री असताना त्या वेदना होत नाहीत का? मी सत्तेत असताना शेतकऱ्यांचे दु:ख पाहून कर्जमाफी दिली होती. मग आता मात्र शब्दांचा खेळ करून मदत नाकारली जातेय का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.ठाकरेंनी यावेळी 16 ऑक्टोबर 2020 रोजीचे पत्र दाखवत फडणवीसांना चिमटा काढला. “तेव्हा फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यांनीच मला 'ओला दुष्काळ जाहीर करा' असं पत्र पाठवलं होतं. आज मात्र मुख्यमंत्री झाल्यावर तेच फडणवीस वेगळं बोलतायत. एखादा श...
ओला दुष्काळ जाहीर करण्यास उशीर का? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला थेट सवाल
News

ओला दुष्काळ जाहीर करण्यास उशीर का? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला थेट सवाल

अकोला : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जिल्ह्यांतील पिके वाहून गेली आहेत. उभ्या पिकांवर पाणी साचल्याने शेतकऱ्यांची दिवाळं जवळ आलं आहे. अशा संकटाच्या काळात सरकारकडून तातडीची मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु अजूनही "ओला दुष्काळ" जाहीर करण्यात राज्य सरकारकडून टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल करत सरकारवर जोरदार टीका केली.सरकारचा नियम आणि शेतकऱ्यांचे प्रश्नआंबेडकर म्हणाले, "ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शासन कोणत्याही मदतीला परवानगी देऊ शकत नाही. पण नियम असा आहे की, पूर ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही. म्हणजेच शेतकऱ्यांना मदत मिळावी...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : लाभार्थ्यांसाठी नवी सक्तीची अट
News

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : लाभार्थ्यांसाठी नवी सक्तीची अट

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : लाभार्थ्यांसाठी नवी सक्तीची अटमुंबई : राज्यातील महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना गेल्या वर्षी जुलै 2024 मध्ये सुरु झाली आणि अल्पावधीतच राज्यातील २ कोटींपेक्षा अधिक महिलांनी तिचा लाभ घेतला. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १,५०० रुपयांची थेट आर्थिक मदत जमा केली जाते. गरजू महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात हा योजनेचा मुख्य हेतू आहे.मात्र, गेल्या काही दिवसांत या योजनेत अनेक गैरप्रकार उघड झाले. नुकत्याच झालेल्या ऑडिटमध्ये तब्बल २६.३४ लाख अपात्र लाभार्थी या योजनेत असल्याचे आढळले. त्यात अनेक पुरुषांचाही समावेश आहे. महिलांसाठी असलेल्या या योजनेत काहींनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याने शासनाने आता कठोर पावले उचलली आहेत.नवी अपडेट : e-KYC अनिवार्यसरकारने सर्व पात्र महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) बंधनका...
चंद्रपूरचे कवी एम. ए. रहीम बंदी यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५
News

चंद्रपूरचे कवी एम. ए. रहीम बंदी यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५

चंद्रपूरचे कवी एम. ए. रहीम बंदी यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५जळगाव : दिनांक २८ सप्टेंबर २०२५, रविवार रोजी जळगाव येथील अल्पबचत भवन, कलेक्टर ऑफिस येथे सकाळी ११ वाजता पार पडलेल्या कार्यक्रमात चंद्रपूरचे ज्येष्ठ कवी एम. ए. रहीम बंदी यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. हा सोहळा राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, प्रशासकीय व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सन्मानित करते. या पार्श्वभूमीवर, कवी एम. ए. रहीम बंदी यांच्या साहित्य क्षेत्रातील उपक्रमशील आणि बहुआयामी कार्याची दखल घेत, त्यांना यंदाचा साहित्यभूषण पुरस्कार देण्यात आला आहे.यापूर्वीही बंदी यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले असून, नुकताच दिनांक २७ जुलै २०२५ रोजी म...
दसऱ्याच्या मेळाव्यात ठाकरे बंधूंची चर्चा; उद्धव-राज एकत्र येणार?
News

दसऱ्याच्या मेळाव्यात ठाकरे बंधूंची चर्चा; उद्धव-राज एकत्र येणार?

मुंबई: राज्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचा २ ऑक्टोबर रोजी होणारा दसरा मेळावा विशेष लक्ष वेधून घेत आहे. या मेळाव्यासंदर्भात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यास उपस्थित राहणार का? आणि युती संदर्भात निर्णय जाहीर केला जाईल का?मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर आयोजित मेळाव्यांमुळे या दोन भावांची भेट आधीच झालेली आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीवर भेट देऊन शुभेच्छा दिल्या, तर गणेशोत्सवात उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन राज ठाकरे यांच्या गणपती दर्शन घेतले. याशिवाय, मावशी भेटीसुद्धा पार पडली, ज्यामुळे राजकीय वर्तुळांत युतीच्या शक्यतांवर चर्चा पुन्हा गतीने सुरू झाली.सद्यस्थितीत प्राथमिक चर्चा झाल्याचे संकेत असूनही युतीसंबंधी अंतिम निर्णय अ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नांदेड–नागपूर विशेष रेल्वे सेवा सुरु
News

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नांदेड–नागपूर विशेष रेल्वे सेवा सुरु

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नांदेड–नागपूर विशेष रेल्वे सेवा सुरुनांदेड : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नांदेड रेल्वे विभागातून नांदेड ते नागपूर दरम्यान विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. नागपूर येथील दीक्षाभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमाला जाणाऱ्या अनुयायांना या विशेष गाड्यांचा मोठा लाभ होणार आहे.नांदेड रेल्वेस्थानकावरून १ ऑक्टोबर रोजी रात्री ८.२० वाजता नांदेड–नागपूर (गाडी क्र. ०७०८५) ही विशेष गाडी सुटेल. ही गाडी मुदखेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद, पिंपळकुट्टी मार्गे धावेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२५ वाजता नागपूर पोहोचेल.त्याचप्रमाणे, २ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५५ वाजता नागपूर–नांदेड विशेष गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता नांदेड पोहोचेल. दुसरी विशेष गाडी नांदेड–नागपूर–नांदेड मार्गावर पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे धावेल. ही गाडी १ ऑक्टोबर ...
सोन्या-चांदीच्या भावाला पंख; सणासुदीत नवा उच्चांक
News

सोन्या-चांदीच्या भावाला पंख; सणासुदीत नवा उच्चांक

सोन्या-चांदीच्या भावाला पंख; सणासुदीत नवा उच्चांकमुंबई : सणासुदीच्या दिवसांत सोनं-चांदीचे भाव अक्षरशः आकाशाला भिडले आहेत. भारतीय बाजारात दररोज नवे विक्रम प्रस्थापित होत असून, गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सराफा बाजाराकडे आकर्षित होत आहेत. जागतिक आर्थिक अनिश्चितता, डॉलरची कमकुवत स्थिती आणि व्याजदर कपातीची अपेक्षा या घटकांमुळे सोनं-चांदीच्या किमतींमध्ये जोरदार वाढ झाली आहे.मंगळवारी, 30 सप्टेंबर रोजी सोन्याचे दर पुन्हा एकदा विक्रमी उच्चांकावर पोहोचले. MCX वरील ऑक्टोबर फ्युचर्स सकाळी 9.30 वाजता तब्बल 1,252 रुपयांनी उसळले आणि प्रति 10 ग्रॅम 1,16,700 रुपयांवर स्थिरावले. दिवसाच्या सुरुवातीला सोनं 1,16,410 रुपयांवर उघडलं होतं. मागील सोमवारी ते 1,14,940 रुपयांवर बंद झालं होतं. म्हणजे एका दिवसात जवळपास 1,470 रुपयांची झपाट्याने वाढ झाली आहे.सोन्याबरोबरच चांदीनेही जोरदार उसळी घेतली....
शेगाव हादरलं! गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर वारंवार अत्याचार; आरोपीच्या बहिणीचाही सहभाग
News

शेगाव हादरलं! गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर वारंवार अत्याचार; आरोपीच्या बहिणीचाही सहभाग

शेगाव : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातून संतापजनक व अंगावर काटा आणणारे प्रकरण उघडकीस आले आहे. विवाहित महिलेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले असून या प्रकरणात आरोपीसोबत त्याची बहीणही सामील असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या घटनेमुळे शेगाव शहर हादरले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.फिर्यादी विवाहित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सचिन ज्ञानेश्वर चोपडे याने तिला आपल्या घरी बोलावले. तिला चहा देत त्यामध्ये गुंगी आणणारे औषध मिसळले आणि ती शुद्ध हरपल्यावर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. इतक्यावरच तो थांबला नाही तर पीडितेचे नग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. या भीतीमुळे पीडिता दीर्घकाळ आरोपीच्या अत्याचाराला बळी पडत राहिली.या गुन्ह्यात आरोपीच्या बहिणीचीह...