Monday, December 8

News

धनगर समाजाने आता ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व घ्यावे – प्रकाश आंबेडकर
News

धनगर समाजाने आता ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व घ्यावे – प्रकाश आंबेडकर

धनगर समाजाने आता ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व घ्यावे – प्रकाश आंबेडकरजालना : महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी आता निर्णायक लढ्याची वेळ आली आहे आणि या लढ्याचे नेतृत्व धनगर समाजाने करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे महत्वाचे विधान केले असून, राज्याच्या राजकारणात या वक्तव्यामुळे नवा राजकीय भूचाल निर्माण झाला आहे.प्रकाश आंबेडकर म्हणाले, “ओबीसींना सध्या २७ टक्के आरक्षण आहे. मात्र तेलंगणा राज्यात हेच आरक्षण ६२ टक्क्यांपर्यंत नेले गेले आहे. तसाच प्रयोग महाराष्ट्रातही होऊ शकतो. पण त्यासाठी ओबीसी समाजाने सत्ता हाती घेतली पाहिजे. धनगर समाजाने आता पुढे येऊन ओबीसींच्या हक्कासाठी नेतृत्व घ्यावे आणि विधानसभेवर सत्ता मिळवून आरक्षण वाढवावे.”ते पुढे म्हणाले, “ओबी...
भर रस्त्यात नवऱ्याची धुलाई! बायकोनं दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, Video व्हायरल
News

भर रस्त्यात नवऱ्याची धुलाई! बायकोनं दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, Video व्हायरल

भर रस्त्यात नवऱ्याची धुलाई! बायकोनं दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, Video व्हायरलमुंबई :“भर रस्त्यात नवऱ्याची धुलाई!” हे ऐकून कुणालाही थोडं आश्चर्य वाटेल, पण सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका संतापलेल्या बायकोनं आपल्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं आणि अक्षरशः भर रस्त्यात त्याची चांगलीच धुलाई केली!@Gharkekalesh या एक्स (माजी ट्विटर) अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओत दिसतं की, एक पुरुष एका अनोळखी महिलेसोबत रस्त्यावर गप्पा मारत असतो. त्याचवेळी त्याची पत्नी तिथे पोहोचते आणि थेट त्या महिलेला कानशिलात लगावते. नवरा मध्ये पडून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण बायकोचा संताप इतका वाढतो की तिनं नवऱ्यालाही भर रस्त्यात चोप दिला.क्षणातच हा प्रकार पाहायला आ...
कफ सिरप मृत्यू: 12 लहान मुलांचा बळी, 4 राज्यांमध्ये औषधावर बंदी
News

कफ सिरप मृत्यू: 12 लहान मुलांचा बळी, 4 राज्यांमध्ये औषधावर बंदी

कफ सिरप मृत्यू: 12 लहान मुलांचा बळी, 4 राज्यांमध्ये औषधावर बंदीराजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भेसळयुक्त कफ सिरपमुळे 12 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, या मुलांनी विशिष्ट कफ सिरप घेतल्यानंतर त्यांचे मूत्रपिंड निकामी झाले आणि मृत्यू झाला.केंद्रीय सरकारने या घटनेनंतर सर्व राज्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत की दोन वर्षांखालील मुलांना कोणतेही कफ सिरप देऊ नये. मृत्यूमुखी पडलेल्या बालकांना दिलेल्या कफ सिरपमध्ये इथिलीन ग्लायकॉल आणि डायथिलीन ग्लायकॉल हे औद्योगिक वापरासाठी असलेले धोकादायक घटक आढळले आहेत. तज्ज्ञांच्या मते, हे घटक मूत्रपिंड आणि मेंदूला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात.सध्या कोल्ड्रफ आणि नेक्सा डीएस या दोन औषधांवर तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रातही 26 हजार लिटर कफ सिरपचा साठा नष्ट करण्...
फक्त ‘दलित’ असल्याने रूम नाकारली? अकोल्यात वंचित नेत्या डॉ. स्नेहल सोहनी यांचा गंभीर आरोप!
News

फक्त ‘दलित’ असल्याने रूम नाकारली? अकोल्यात वंचित नेत्या डॉ. स्नेहल सोहनी यांचा गंभीर आरोप!

फक्त ‘दलित’ असल्याने रूम नाकारली? अकोल्यात वंचित नेत्या डॉ. स्नेहल सोहनी यांचा गंभीर आरोप!अकोला (प्रतिनिधी) : अकोल्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित सभेसाठी आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्षा डॉ. स्नेहल सोहनी यांना एका हॉटेलमध्ये ‘जात’ आणि ‘पक्षीय चिन्ह’ पाहून रूम देण्यास नकार देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी हॉटेलच्या मॅनेजरविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.नेमके काय घडले?वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेसाठी डॉ. स्नेहल सोहनी या मुंबईतून अकोल्यात दाखल झाल्या होत्या. मुक्कामासाठी त्यांनी रायझिंगसन हॉटेलमध्ये जाण्याचे ठरवले. सुरुवातीला त्यांना हॉटेलमध्ये रूम दाखवण्यात आली. मात्र, त्यांचे सामान उघडल्य...
सुनांचे दागिने गेले, आजी गेली प्रेमात! झांसीत आजीचा भन्नाट कारनामा
News

सुनांचे दागिने गेले, आजी गेली प्रेमात! झांसीत आजीचा भन्नाट कारनामा

सुनांचे दागिने गेले, आजी गेली प्रेमात! झांसीत आजीचा भन्नाट कारनामाझांसी : सुनांचे दागिने गेले, आजी गेली प्रेमात! – हे वाक्य ऐकायला जरी विनोदी वाटत असलं तरी यामागची कहाणी एका कुटुंबाला उद्ध्वस्त करून गेली आहे. झांसी जिल्ह्यातील सायवारी गावात एक ४० वर्षीय आजी आपल्या प्रियकरासोबत रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळून गेली, अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.ही आजी दोन मुलांची आई आणि दोन नातवंडांची आजी असून, तिच्या ‘प्रेमाच्या उड्या’मुळे गावात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. कुटुंबातील सर्वजण या घटनेमुळे हादरले असून, घरातील सुनांचे दागिने आणि ४० हजार रुपये रोख गायब झाल्याची माहिती मिळाली आहे.घटनेचा तपशील:महिला ही कामता प्रसाद यांची पत्नी असून, ती गेल्या अडीच वर्षांपासून वीटभट्टीवर काम करत होती. त्याच ठिकाणी तिची ओळख अमर सिंह प्रजापती नावाच्या पुरुषाशी झाली. ओळख प्रेमात बदलली आणि दोघां...
महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरे
News

महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरेपुणे : “निवडणुकीच्या आधी जशा महिलांच्या खात्यात दोन-तीन महिन्यांचे हप्ते जमा केले, तसेच आता पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते द्या, कारण सध्या गरज आहे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना,” अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पुण्यात झालेल्या अजित नागरी पतसंस्थेच्या महिला बचत गट कर्जदार भगिनींना कर्जमुक्ती प्रमाणपत्र वाटप व कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.ठाकरे म्हणाले, “लोकशाहीची ही दुर्दैवी अवस्था आहे की, कोर्टात न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. हातात दांडूका घेतल्यावरच न्याय मिळतो हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयात आमची केस सुरू आहे. आता आठ-दहा दिवसांत तारीख आहे, पण न्याय मिळायला २०४५–२०५० पर्यंत वाट पाहावी लागेल अशी आ...
मटण खाल्लं पण उधारी गिळली!  कोल्हापूरच्या दुकानदाराची भन्नाट उधारी वसुली शक्कल!
News

मटण खाल्लं पण उधारी गिळली! कोल्हापूरच्या दुकानदाराची भन्नाट उधारी वसुली शक्कल!

मटण खाल्लं पण उधारी गिळली! कोल्हापूरच्या दुकानदाराची भन्नाट उधारी वसुली शक्कल!कोल्हापूर : “मटण खाल्लं पण उधारी गिळली!” हे वाक्य सध्या कोल्हापूर जिल्ह्यात अक्षरशः हेडलाईन बनलं आहे. बहिरेश्वर गावातील चिकन-मटण विक्रेता सदल्या काशिद यांनी उधारी वसुलीसाठी घेतलेली हटके शक्कल आता चर्चेचा विषय ठरली आहे.ग्राहकांकडून उधारी वसूल होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या सदल्या काशिद यांनी थेट गावाच्या चौकात डिजिटल बोर्ड लावून सर्वांना इशारा दिला आहे. या बोर्डवर मोठ्या अक्षरात लिहिलं आहे —“उधारी लवकरात लवकर जमा करा, अन्यथा दिवाळीमध्ये उधारीवाल्यांची नावं बोर्डवर झळकतील!”या इशाऱ्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. ज्यांनी कधी ‘फक्त थोडीशी उधारी’ केली होती, त्यांनाही आता आपलं नाव बोर्डावर येईल की काय, अशी धास्ती वाटू लागली आहे.कोल्हापूर हा रस्सा आणि मटणासाठी प्रसिद्ध जिल्हा. पण आता इ...
प्रकाश आंबेडकरांचा घणाघाती आरोप: “विश्वगुरू की चपराशी?
News

प्रकाश आंबेडकरांचा घणाघाती आरोप: “विश्वगुरू की चपराशी?

प्रकाश आंबेडकरांचा घणाघाती आरोप: “विश्वगुरू की चपराशी?अकोला: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांच्या जागतिक ‘विश्वगुरू’ भूमिकेविरुद्ध तीव्र टीका केली. त्यांनी आरोप केला की, “जागतिक पातळीवरील अनेक देश पंतप्रधानांना मित्र मानत नाहीत, उलट भारतीयांची हकालपट्टी केली जाते. हा सर्व प्रयत्न दाखवण्यासाठी केला जातो की भारत ‘विश्वगुरू’ आहे की फक्त चपराशी?”भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवातील धम्म मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. जी. वानखडे उपस्थित होते. यावेळी वंचित आघाडीच्या प्रा. अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, माजी आमदार नातिकोद्दिन खतिब, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, बालमुकुंद भिरड आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.ॲड. प्रकाश आंबेडकर म्ह...
‘कांतारा’ने पहिल्याच दिवशी केली 60 कोटींची कमाई
News

‘कांतारा’ने पहिल्याच दिवशी केली 60 कोटींची कमाई

‘कांतारा’ने पहिल्याच दिवशी केली 60 कोटींची कमाईबंगळुरू, : रिषभ शेट्टीच्या बहुप्रतिक्षित ‘कांतारा चॅप्टर 1’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तब्बल ६० कोटी रुपयांची कमाई करत २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.चित्रपटाचे बजेट सुमारे १२५ कोटी रुपये असले तरी, पहिल्या दिवशीच मिळालेल्या या विक्रमी प्रतिसादामुळे निर्माते आणि टीम उत्साहित आहेत. देशभरात ‘कांतारा’चे विकेंडचे जवळपास सर्व शो हाऊसफुल झाले आहेत. अनेक शहरांमध्ये थिएटरसमोर चाहत्यांची गर्दी उसळली असून, सोशल मीडियावर चित्रपटाचे कौतुकांचा वर्षाव सुरू आहे.‘कांतारा चॅप्टर 1’ने पहिल्या दिवशी केलेल्या कमाईमुळे तो थेट सुपरस्टार्सच्या यादीत पोहोचला आहे. २०२५ मधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये —पहिल...
आजपासून RBI चा मोठा निर्णय : चेक क्लिअरन्स त्याच दिवशी, ग्राहकांना थेट फायदा
News

आजपासून RBI चा मोठा निर्णय : चेक क्लिअरन्स त्याच दिवशी, ग्राहकांना थेट फायदा

आजपासून RBI चा मोठा निर्णय : चेक क्लिअरन्स त्याच दिवशी, ग्राहकांना थेट फायदामुंबई : बँकिंग सिस्टिममध्ये आजपासून मोठा बदल झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) फास्ट चेक क्लिअरन्स सिस्टिम लागू केली असून यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत चेक क्लिअर होण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत असे. पण आता ही प्रतिक्षा संपली आहे.नव्या प्रणालीत कॉन्टिन्युअस चेक क्लिअरिंग मोड सुरू करण्यात आला आहे. यानुसार सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बँकेत जमा झालेले सर्व चेक तात्काळ स्कॅन करून त्यांची इमेज आणि डेटा क्लिअरिंग हाउसकडे पाठवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संबंधित बँकेने त्या चेकची पुष्टी करणे आवश्यक असेल. मात्र वेळेत उत्तर दिले नाही तर तो चेक आपोआप क्लिअर झालेला मानला जाईल.या बदलामुळे ग्राहकांना चेक जमा केल्यानंतर पैसे त्याच दिवशी खात्यात जमा होत...