Tuesday, November 11

News

‘मनाचे श्लोक’चा झाला ‘तू बोल ना’! वाद मावळला, सिनेमा उजळला!
News

‘मनाचे श्लोक’चा झाला ‘तू बोल ना’! वाद मावळला, सिनेमा उजळला!

मनाचे श्लोक'चा झाला 'तू बोल ना'! वाद मावळला, सिनेमा उजळला!मुंबई : मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा नावाच्या वादावरून चर्चा रंगली होती. अभिनेत्री व दिग्दर्शक मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित “मनाचे श्लोक” या चित्रपटाच्या नावावरून धार्मिक संघटनांनी आक्षेप घेतला होता. संत समर्थ रामदास स्वामींच्या ग्रंथाशी साधर्म्य असल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होत होता. परिणामी पुण्यातील काही चित्रपटगृहांमध्ये शो थांबवण्यात आले आणि आंदोलनही झालं.परंतु, अखेर सर्व वाद मिटवत चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला महत्वाचा निर्णय आता हा चित्रपट “तू बोल ना” या नव्या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.10 ऑक्टोबर रोजी “मनाचे श्लोक” या नावाने रिलीज झालेल्या चित्रपटाचा प्रवास सुरुवातीला खडतर ठरला होता. परंतु, आता सर्व गैरसमज दूर करून 16 ऑक्टोबर रोजी “तू बोल ना” या नव्या नावाखाली चित्रपट पुन्हा प्रदर्शित ह...
एसटी कर्मचाऱ्यांना ६,००० रुपये दिवाळी भेट आणि १२,५०० रुपयांची सण उचल; चक्का जाम आंदोलन स्थगित
News

एसटी कर्मचाऱ्यांना ६,००० रुपये दिवाळी भेट आणि १२,५०० रुपयांची सण उचल; चक्का जाम आंदोलन स्थगित

एसटी कर्मचाऱ्यांना ६,००० रुपये दिवाळी भेट आणि १२,५०० रुपयांची सण उचल; चक्का जाम आंदोलन स्थगितमुंबई : महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना ६,००० रुपये दिवाळी भेट (सानुग्रह अनुदान) देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपयांची दिवाळी अग्रीम सण उचल देखील मिळणार आहे.राज्यातील ८५ हजाराहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. यासोबतच, वेतनवाढ फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दर महिन्याला ६५ कोटी रुपये देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला होता, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होऊ शकला असता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत कामगार संघटनांची बै...
नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टचा थैमान! सायबर ठगांनी ज्येष्ठांना लुटलं तब्बल 6 कोटी आणि 72 लाख
News

नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टचा थैमान! सायबर ठगांनी ज्येष्ठांना लुटलं तब्बल 6 कोटी आणि 72 लाख

नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टचा थैमान! सायबर ठगांनी ज्येष्ठांना लुटलं तब्बल 6 कोटी आणि 72 लाखनाशिक : नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्ट या नवनवीन पद्धतीने दोन ज्येष्ठ नागरिकांना तब्बल 6 कोटी आणि 72 लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठगांनी सर्वोच्च न्यायालय आणि सीबीआयच्या नावाचा वापर करून नागरिकांना धमकावले आणि भीती दाखवून पैसे उकळले.गंगापूर रोड परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाला अचानक व्हिडीओ कॉल आला. त्याला सांगण्यात आलं की, त्याच्या सिमकार्डवरून अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत आणि त्याला सर्वोच्च न्यायालयात हजर व्हावं लागणार आहे.भीतीमुळे तो नागरिक घाबरला आणि सायबर ठगांच्या दबावाखाली येऊन आरटीजीएसद्वारे तब्बल 6 कोटी रुपये ट्रान्सफर केले. ही संपूर्ण कारवाई नंतर बनावट असल्याचं समोर आलं.दुसऱ्या प्रकरणात, नाशिकमधील अनिल लालसरे यांना ठगांनी कॉल करून सांग...
धुळेकराचा ‘मंकी पॉक्स’ रिपोर्ट पॉझिटिव्ह; महाराष्ट्रात पहिली केस नोंद! प्रशासन अलर्टवर
News

धुळेकराचा ‘मंकी पॉक्स’ रिपोर्ट पॉझिटिव्ह; महाराष्ट्रात पहिली केस नोंद! प्रशासन अलर्टवर

धुळे : जगभर थैमान घालणाऱ्या ‘मंकी पॉक्स’ आजाराने अखेर महाराष्ट्रातही प्रवेश केला आहे. धुळ्यातील गरीब नवाज नगर परिसरात राहणाऱ्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, ही राज्यातील पहिलीच मंकी पॉक्सची केस असल्याचे पुण्यातील एनआयव्ही (NIV) प्रयोगशाळेने स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आहे.माहितीनुसार, हा बाधित रुग्ण 2 ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियाहून धुळ्यात आला होता. तो गेल्या चार वर्षांपासून सौदी अरेबियात वास्तव्यास होता आणि मुलीच्या लग्नासाठी भारतात आला होता. मात्र, आगमनानंतर काही दिवसांतच त्वचेवर पुरळ आणि त्रासाची लक्षणे दिसू लागल्याने त्याने 3 ऑक्टोबर रोजी हिरे रुग्णालयात तपासणी करून घेतली.तेथे डॉक्टरांना मंकी पॉक्सची लक्षणे दिसल्याने तातडीने नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. दोन्ही अहवाल पॉझिटिव्ह आल्याची पुष्टी झाली...
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाखाची मदत द्या-उद्धव ठाकरे
News

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाखाची मदत द्या-उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाखाची मदत द्या-उद्धव ठाकरेछत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची जमीन खरडून गेल्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे की, मनरेगाच्या माध्यमातून जाहीर केलेल्या साडेतीन लाख रुपयांच्या मदतीतून दिवाळीपूर्वी १ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत.उद्धव ठाकरे यांनी हे विधान क्रांती चौकातून सुरू झालेल्या मोर्चा आणि नंतरच्या जाहीर सभेत केले. यावेळी पक्ष नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, ओमराजे निंबाळकर, अरविंद सावंत, आमदार अनिल परब, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि इतर नेते उपस्थित होते.ते म्हणाले, “अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये मदत मिळावी आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. राज्य सरकारच्या पॅकेजमधील मदत ही ‘सर्वात मोठी म...
बँक मॅनेजरचा पबमध्ये मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह, कुटुंबात हाहाकार!
News

बँक मॅनेजरचा पबमध्ये मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह, कुटुंबात हाहाकार!

बँक मॅनेजरचा पबमध्ये मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह, कुटुंबात हाहाकार!३१ वर्षीय बँक मॅनेजर मेघराज यांचा मृतदेह एका पबच्या बाथरूममध्ये आढळला. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मेघराज आपल्या तीन मित्रांसह जेवण आणि ड्रिंक घेण्यासाठी पबमध्ये गेले होते. मित्रांच्या मते, जेवण दरम्यान सर्व काही सामान्य होते; हसत-खेळत जेवण झाल्यानंतर बिल भरून ते बाहेर निघण्याची तयारी करत होते.मात्र, अचानक मेघराज म्हणाले, “मला थोडी चक्कर येत आहे, मी बाथरूमला जात आहे.” मित्रांनी बाहेर थांबून त्यांची वाट पाहिली, मात्र मेघराज बाहेर आले नाहीत.काही वेळाने मित्रांनी पबमध्ये शोध घेतला. बाथरूमचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. पबच्या व्यवस्थापकाला बोलावल्यावर दरवाजा तोडल्यावर मेघराज फरशीवर पडलेले आढळले. जवळ त्यांचा मोबाइल आणि सिंकखाली तुटलेला ग्लास होता.पोलिसांनी घटनास्थळी येऊन सीन ऑफ क्राइम टीमला बोलाव...
सुहागरातची गेली शान; वरानं मिटले डोळे, गेला प्राण!
News

सुहागरातची गेली शान; वरानं मिटले डोळे, गेला प्राण!

सुहागरातची गेली शान; वरानं मिटले डोळे, गेला प्राण!जौनपूर (उत्तर प्रदेश): प्रेमाचं वय नसतं, पण त्याला ‘प्राणाचा भाव’ जरूर असतो हे जौनपूर जिल्ह्यातील या घटनेनं ठळकपणे दाखवून दिलं आहे. ७५ वर्षीय संगरू राम नावाच्या वृद्धानं आपल्या वयाच्या निम्म्या ३५ वर्षीय मनभावतीशी लग्न केलं, आणि गावात नव्या आयुष्याचा जल्लोष सुरू झाला. मात्र आनंदाचं हे क्षणक्षणात दु:खात रूपांतर झालं. सुहागरातच्या दुसऱ्याच सकाळी संगरू राम यांचा मृत्यू झाला, आणि संपूर्ण गावात हळहळ व कुजबुज सुरू झाली.संगरू राम हे गौराबादशाहपूर तालुक्यातील कुच्छमुछ गावातील शेतकरी होते. एक वर्षापूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. लेकरं नव्हती; शेती, जनावरं आणि एकटेपण हेच त्यांच्या आयुष्याचं साथीदार झालं होतं. घरच्यांनी सांगितलं, “अहो आता वय झालं, लग्नाचं काय?” पण संगरू म्हणाले, “वय वाढलं तरी मन म्हातारं झालं नाही!” आणि मग त्...
बदाम-काजूवर जगणारा ८ कोटींचा विधायक!
News

बदाम-काजूवर जगणारा ८ कोटींचा विधायक!

बदाम-काजूवर जगणारा ८ कोटींचा विधायक!मुंबई: उत्तर प्रदेश मेरठच्या किसान मेळ्यात चर्चेचा विषय बनला तो ना मंत्री, ना अभिनेता, तर ‘विधायक’ नावाचा मुर्रा जातीचा रेडा! या रेड्याची किंमत ऐकून उपस्थित शेतकरी आणि पशुपालक थक्क झाले ८ कोटी रुपये!हरियाणाचे पद्मश्री पुरस्कार विजेते शेतकरी नरेंद्र सिंह यांचा हा रेडा आपल्या आकर्षक शरीरयष्टीमुळे आणि दमदार लुकमुळे सगळ्यांचे लक्ष वेधतो. त्याला पाहण्यासाठी लोक दूरदूरहून मेळ्यात आले आणि मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा स्पर्धा सुरू झाली.विधायकची खासियत नरेंद्र सिंह सांगतात, “आमचा विधायक रोज बदाम, काजू, देशी तूप, सरसोंचे तेल खातो आणि ८ ते १० लीटर दूध पितो.” याच आहारामुळे तो मेळ्यात सलग दोन वर्षे ओव्हरऑल चॅम्पियन ठरला आहे.मालक नरेंद्र सिंह यांनी सांगितले की, ‘विधायक’ला विकायचा नाही, पण त्याच्या वीर्य विक्रीतून (Semen Sale) ते दरवर्षी लाखोंची कमाई करत...
कुस्तीचा रंग की कुर्त्याविना संग? प्रशिक्षकाच्या ‘नग्न’ कारनाम्याने महाराष्ट्र दंग!
News

कुस्तीचा रंग की कुर्त्याविना संग? प्रशिक्षकाच्या ‘नग्न’ कारनाम्याने महाराष्ट्र दंग!

नग्नकुस्तीचा रंग की कुर्त्याविना संग? प्रशिक्षकाच्या ‘नग्न’ कारनाम्याने महाराष्ट्र दंग!अकोला : जिल्ह्यातील आंतरशालेय कुस्ती स्पर्धेत घडलेला एक विकृत प्रकार सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडत आहे. कुस्तीच्या रिंगणात घाम गाळायचा, पण इथे तर संस्कारच गाळले गेले! चौदा वर्षांच्या अल्पवयीन कुस्तीपटूचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या प्रशिक्षकाच्या कारनाम्याने पालक, शिक्षक आणि क्रीडाप्रेमी थक्क झाले आहेत.अकोला पोलिस हॉलमध्ये जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्यावतीने ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी आंतरशालेय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नेहमीप्रमाणे कुस्तीपटूंचं वजन घेण्याची प्रक्रिया सुरू होती. तेव्हा उपस्थित असलेल्या प्रशिक्षक कुणाल माधवे यांनी चौदा वर्षांच्या विद्यार्थ्याला विवस्त्र अवस्थेत उभं करून त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपला. एवढ्...
शेतकऱ्यांची शेती गेली वाहून, सरकार गेलं झोपून ! बँका मात्र उठल्या आहे तगादा लावून !
News

शेतकऱ्यांची शेती गेली वाहून, सरकार गेलं झोपून ! बँका मात्र उठल्या आहे तगादा लावून !

शेतकऱ्यांची शेती गेली वाहून, सरकार गेलं झोपून ! बँका मात्र उठल्या तगादा आहे सुरू!औरंगाबाद : मराठवाड्याच्या मातीने पुन्हा एकदा रक्त गाळलं आहे… पण सरकारकडे अजूनही झोपेचे डोळे आहेत. घरदार, शेती, संसार सगळं वाहून गेलं; पण ‘मदत’ मात्र अद्याप कागदावरच. अतिवृष्टीने हजारो शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला, पण बँकांचे नोटीस पाठवणारे फोन अजूनही थांबलेले नाहीत.“घरदार गेलं, शिवार गेलं… पण बँका आमच्या जिवाला लागल्या!” हा मराठवाड्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा आक्रोश आहे. शिवार हेल्पलाईनवर आलेले ५४४६ फोन सांगतात की, ही केवळ आपत्ती नाही, तर ‘मानसिक दुष्काळ’ आहे. सरकारचे आश्वासन ओघळलेल्या पावसासारखे आणि बँकांचा तगादा वीज कोसळावी तसे सुरू आहे.अजूनही १७०० शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. हातात काहीच नाही, अंगावर कपडे तेवढे शिल्लक. “साहेब, थोडा आधार द्या, नाहीतर आम्ही नकोच जगायला…” या विनवणीतही ...