Thursday, December 11

Editorial

हेळवी; आपल्या वंशाची जिवंत परंपरा!
Editorial

हेळवी; आपल्या वंशाची जिवंत परंपरा!

हेळवी; आपल्या वंशाची जिवंत परंपरा!आपल्यापैकी बरेचजण आपल्या आजोबांपर्यंतचा वंश सांगू शकतात. पण त्या पुढे गेलं की आठवण धूसर होते. कोण होते आपल्या पणजोबा, त्यांचे वडील, त्यांच्या आधीचे पूर्वज — ही सगळी माहिती कालांतराने हरवत जाते. पण काही लोक असे आहेत जे शेकडो वर्षांपासून हे सगळं जतन करून ठेवत आले आहेत. त्यांना आपण हेळवी म्हणतो. हेळवी म्हणजे फक्त वंश सांगणारे नव्हेत, ते आपल्या संस्कृतीचा, आपल्या इतिहासाचा जिवंत दस्तऐवज आहेत.हेळवी हे पारंपरिक वंशावळ सांगणारे आणि वंशाची माहिती लिहून ठेवणारे लोक आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र सीमाभाग, विशेषतः धारवाड, बेलगाव, बिदर, विजापूर, करवार या भागात हेळवी समाजाचे वास्तव्य आहे. काही ठिकाणी त्यांना भाट असेही संबोधले जाते. त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे कुटुंबांची वंशावळ लिहून ठेवणे आणि ती पुढील पिढ्यांना सांगणे. पूर्वी जेव्हा लग्नसमारंभ व्हायचे, तेव्हा हेळवी...
‘लघवीची सुटी’ आणि हरवलेलं बालपण.!
Editorial

‘लघवीची सुटी’ आणि हरवलेलं बालपण.!

लहानपणी शाळेचं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास होता. त्या काळात प्रत्येक गोष्ट नवीन, निरागस आणि गंमतीशीर वाटायची. त्यातलीच एक मजेशीर आठवण म्हणजे “लघवीची सुटी”. ही सुटी खूपच छोटी असायची मधल्या सुटीच्या आधी काही मिनिटांची. पण आमच्यासाठी ती मोठी घटना असायची. त्या वेळी शाळांमध्ये शौचालयं नव्हती. शिक्षक वर्गात सांगायचे, “लघवीची सुटी झाली!” आणि सगळी मुलं धावत सुटायची. कुणी झाडामागे, कुणी शाळेच्या कुंपणाबाहेर. आम्ही मुलं त्यातही मजा शोधायचो. कुणी म्हणायचं, “पहा माझी लघवी किती लांब गेली!” तर कुणी तिचा रंग बघून टिप्पणी करायचं. त्या क्षणांत कोणतंही दडपण नव्हतं, लाज नव्हती, फक्त खेळ आणि कुतूहल होतं.लहानपणी प्रत्येक गोष्ट आम्हाला उत्सुकतेनं बघायला भाग पाडायची. आपण कसे जन्मलो, वडिलांना दाढी-मिशा आहेत पण आईला का नाहीत, आई-वडिलांच्या लग्नात आपण का नव्हतो असे प्रश्न सतत मनात यायचे. तेव्हा कोणी हसत हसत...
‘त्या सायकलच्या घंटीत दडलेलं प्रेम ; पोस्टमन काकांच्या आठवणींतून!’
Editorial

‘त्या सायकलच्या घंटीत दडलेलं प्रेम ; पोस्टमन काकांच्या आठवणींतून!’

'त्या सायकलच्या घंटीत दडलेलं प्रेम ; पोस्टमन काकांच्या आठवणींतून!'आजच्या डिजिटल युगात एक क्लिक पुरेसं असतं संदेश पोहोचवण्यासाठी, फोटो शेअर करण्यासाठी, किंवा कोणाचं हसतंय का रुसलंय हे जाणून घेण्यासाठी. पण कधी विचार केला आहे का, त्या एका क्लिकमुळे आपण काय गमावलंय? आपण हरवलोय त्या सायकलच्या छोट्याशा घंटेचा आवाज, जो ऐकला की अंगावर रोमांच उभे राहायचे कारण तो आवाज असायचा पोस्टमन काकांचा!तेच पोस्टमन काका… भर उन्हात, मुसळधार पावसात, वाऱ्याच्या झंझावातातही आपली जबाबदारी निभावणारे. त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याची एक रेष सुद्धा नसायची. हातात बॅग, खांद्यावर पत्रांची गाठडी आणि सायकलला लटकलेली लहानशी घंटी पण ती घंटी म्हणजे एखाद्या घरासाठी आनंदाची वर्दी!त्या काळात पत्र म्हणजे फक्त एक कागद नव्हता. ती असायची भावना, प्रेम, आपुलकी आणि आठवणींचं मूर्त रूप. त्या कागदावर उमटलेले शाईचे ठिपके म्हणजे को...
सोनं आणि संघर्ष: एका पानविक्री कुटुंबाचा संघर्ष.!
Editorial

सोनं आणि संघर्ष: एका पानविक्री कुटुंबाचा संघर्ष.!

सोनं आणि संघर्ष: एका पानविक्री कुटुंबाचा संघर्ष.!दसरा म्हणजे शहरात सोनं, दागिने, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि आनंदाचा सण. लोक खरेदी करतात, घर सजवतात आणि नवे कपडे घालतात. पण बडनेरच्या चावडी चौकात बसलेलं जनूना गावचं एक कुटुंब या चमकत्या आनंदापासून दूर, एका वेगळ्या संघर्षात दिसून आले. हे कुटुंब जंगलात तीन-चार दिवस राबून, काटेरी झुडपांतून आपट्याची पानं बाजारात आणतात. शहरातील लोक ती पानं सोन्याचे प्रतीक म्हणून घेतात, शुभेच्छांसाठी जपतात. पण जनूना गावातील कुटुंबासाठी ती पानं म्हणजे जीवनाचा आधार. ह्या मेहनतीतून त्यांना मिळतो थोडासा पैसा, घरसाठा, मुलांची शाळेची फी, औषधे आणि कपडे.सोनं विकलं… हा शब्द ऐकताना शहरातल्या लोकांच्या डोळ्यासमोर संपत्ती, चमचमणारे दागिने, सुवर्णमयी वस्तू उभी राहतात. पण या कुटुंबासाठी हे “सोनं” नाही; हा फक्त पोटाच्या तोंडभराईसाठी, मुलांच्या शाळेसाठी, घराच्या गरजांस...
आरक्षणाचा मूलभूत हेतू समजून घेण्याची वेळ.!
Editorial

आरक्षणाचा मूलभूत हेतू समजून घेण्याची वेळ.!

आरक्षणाचा मूलभूत हेतू समजून घेण्याची वेळ.!गेल्या काही दिवसांत खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत आरक्षणासंबंधी केलेले विधान समाजात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. "उद्या जर माझ्या मुलाने आरक्षण मागितले तर मला लाज वाटली पाहिजे" असे त्या म्हणाल्या आणि लगेचच या विधानावर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्या. सुळे या संसदेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खासदार म्हणून ओळखल्या जातात, त्यांचा राजकीय व सामाजिक वावर नेहमीच परिपक्व भासतो, पण आरक्षणावरील त्यांचे मत हे अर्धवट सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवणारे आहे असे म्हणावे लागेल.आरक्षण हा विषय केवळ राजकारणापुरता मर्यादित नाही. तो आपल्या समाजाच्या असमान रचनेशी जोडलेला आहे. शेकडो वर्षांपासून जातीच्या नावाखाली लाखो लोकांना शिक्षण, व्यवसाय, जमीन, प्रतिष्ठा, समाजातील समान स्थान या सर्व हक्कांपासून दूर ठेवले गेले. गावकुसाबाहेर झोपड्या...
‘जनतेची झळ, सत्तेचा खेळ’
Editorial

‘जनतेची झळ, सत्तेचा खेळ’

'जनतेची झळ, सत्तेचा खेळ'सध्याचा महाराष्ट्र पाहिला, तर मनात अनेक प्रश्न उभे राहतात. शहरं वाढतायत, पण शेतामधून पाणी ओसरतंय. राजकारण गडबडलंय, पण जनतेच्या प्रश्नांची उत्तरं मात्र अद्याप धूसरच आहेत. महागाईच्या दरांनी सामान्यांचे बजेट कोलमडले आहे, तर शेतकरी आकाशाकडे पाहून पावसाच्या आल्या-न आल्याच्या बातम्या ऐकत हातात माती चोळतो आहे. एका बाजूला सत्तेची समीकरणं बदलत आहेत, शिंदे-फडणवीस-पवार यांचे युती–वियोगाचे राजकारण जनतेला रोज नवा तमाशा दाखवत आहे. विधानसभेचे वातावरण रणांगणासारखे आहे, आणि गावपातळीवर प्रश्न अजूनही तसेच पिण्याच्या पाण्याचा अभाव, रस्त्यांची खडबडीत अवस्था, आरोग्य केंद्रांची उणीव, आणि रोजगाराच्या संधींचा अभाव.कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालंय, तर विदर्भात पाऊस फसला आणि शेतकरी पुन्हा नैराश्याच्या कडेलोटावर.मराठवाड्यात उन्हाळ्यात पाणीटंचाई, आता पाव...
१८ जुलै ; पहिल्या सुपरस्टारची आठवण
Editorial

१८ जुलै ; पहिल्या सुपरस्टारची आठवण

18 जुलै ; पहिल्या सुपरस्टारची आठवण१८ जुलै. ही तारीख जगाच्या दिनदर्शिकेत एक सामान्य दिवस असू शकते, पण लाखो हिंदी सिनेरसिकांच्या हृदयात ती एक हळवी जखम उलगडते. कारण या दिवशी, २०१२ साली, हिंदी सिनेसृष्टीचा पहिला सुपरस्टार, "काका" – राजेश खन्ना यांचा आपल्यातून कायमचा निरोप झाला. त्यांचे नुसते जाणे नव्हते, तर एका भावविश्वाचं, एका नजरेत बोलणाऱ्या अभिनेत्याचं, आणि असंख्य प्रेमकथा घडवणाऱ्या चेहऱ्याचं अस्त होतं.राजेश खन्ना म्हणजे केवळ एक अभिनेता नव्हता. तो एक भावना होता. त्यांच्या अभिनयात एक सहजतेची, हळवेपणाची, आणि प्रेमळ अशा शांत प्रकाशाची सरिता वाहायची. "बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं…", हा संवाद आजही ऐकला की अंगावर काटा येतो. कारण हा संवाद फक्त "आनंद" सिनेमातील नव्हता, तो त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार होता.६० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा राजेश खन्ना रुपेरी पडद्याव...
कमांडर : एक काळजीवाहू साथीदाराची संथ एक्झिट.!
Editorial

कमांडर : एक काळजीवाहू साथीदाराची संथ एक्झिट.!

कमांडर : एक काळजीवाहू साथीदाराची संथ एक्झिट.!आज गावात निळं रॉकेलसुद्धा येत नाही, आणि रॉकेलवर चालणारी कमांडर गाडी तर फार लांबच गेली आहे. एकेकाळी गावातल्या प्रत्येक रस्त्यावर, पायवाटांवर, घाटातून, नदीच्या पात्रातून गर्जना करत जाणारी महिंद्राची कमांडर आता जणू आठवणींच्या धुरळ्यात हरवून गेली आहे. ए.सी.च्या गाड्या, चकचकीत एस.यू.व्ही., आणि आधुनिक मोटारगाड्यांच्या गर्दीत कमांडर हा एक इतिहास होऊन बसली. पण हा इतिहास फक्त एका गाडीचा नाही, तो आहे ग्रामिण भारताच्या जीवनशैलीचा, स्वाभिमानाचा आणि जिद्दीचा.कमांडर ही गाडी म्हणजे फक्त एक वाहन नव्हतं, ती होती एक माणूस. गावातल्या प्रत्येक घराला या गाडीशी काहीतरी वैयक्तिक नातं होतं. कोणाचं लग्न, कोणाचा आजारी माणूस, कोणाचा बाजार कमांडरचं योगदान ठळकपणे दिसायचं. ती केवळ प्रवासासाठी नव्हती; ती होती गावाचे सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक व्यवहार जुळवणारी एक अ...
लग्नाची गाठ, पण खर्चाचा  फाट.!
Editorial

लग्नाची गाठ, पण खर्चाचा फाट.!

लग्नाची गाठ, पण खर्चाचा फाट.!लग्न  हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. दोन मनं, दोन कुटुंबं आणि दोन जीवनं एका गाठीत अडकतात. हे नातं विश्वासाचं, प्रेमाचं आणि समजुतीचं असावं अशीच प्रत्येकाची अपेक्षा असते. पण आजच्या घडीला लग्न म्हणजे प्रेमापेक्षा अधिक खर्चाचं प्रतीक बनत चाललं आहे.लग्न म्हणजे दोन जीवांचं एकत्र येणं, आयुष्यभरासाठीचं नातं. पण आजकाल लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचं नव्हे, तर एक मोठा खर्चाचा सोहळा बनलेला आहे. भपकेबाज मंडप, डोळे दिपवणारी रोषणाई, पाचपद्री जेवणं, डिझायनर कपडे, कर्णकर्कश आवाजातील डी जे, हळदी समारंभ आणि वधू वराची सेलिब्रिटीसारखी एंट्री या साऱ्यामागे लाखो रुपये खर्च केले जातात. हे सर्व खरंच आवश्यक आहे का?पूर्वी लग्न म्हणजे घरच्या घरी वऱ्हाडं जमवून, मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरं होणारं एक आनंदाचं कार्य होतं. आज मात्र लग्न म्हणजे शेक...
तरुणाईचे लग्न जुळे ना.!
Editorial

तरुणाईचे लग्न जुळे ना.!

तरुणाईचे लग्न जुळे ना.!तरुणाईचे लग्न जुळणे हा एक सामाजिक आणि मानसिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा विषय आहे. भारतीय समाजामध्ये लग्न हा एक पवित्र आणि महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. पूर्वीच्या काळी, विवाह हा कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे पालनपोषण करणारा एक आधारस्तंभ होता. तरुण वयात एकमेकांशी जुळणारे विवाह हे समाजाच्या नैतिकतेचे, संस्कृतीचे आणि परंपरेचे पालन करत होते. त्याचबरोबर प्रेमविवाह, जो आजच्या काळात स्वीकारला जातो, पूर्वी फारसा सामान्य नव्हता. प्रेम, मैत्री आणि भावना इत्यादी गोष्टी विवाहाच्या पारंपरिक संकल्पनांमध्ये येत नव्हत्या.आजच्या तरुणाईची जीवनशैली आणि विचारधारा पूर्वीच्या पिढीच्या तुलनेत खूप वेगळी आहे. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून साऱ्या जगाशी कनेक्ट होणे हे एका बाजूला सुविधा असले तरी दुसऱ्या बाजूला जीवनशैलीला प्रगल्भतेसाठी पुरेसा वेळ देणे आणि कुटुंबाशी...