वऱ्हाडाचा कुबेर राघोजी महार
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसाहत करून असणारा आजचा *बौद्ध व पूर्वीचा महार* गेली कित्येक हजार वर्षापासून दारिद्र्यात जीवन जगत होता. आधुनिक भारताच्या इतिहासात महारांच्या कहाण्या आपण ऐकले आहेत.पण विदर्भातील वाशिम जवळून १५ किलोमीटरच्या अंतरावर असणारे तोरणाळा गावचा* काही वेगळाच इतिहास आहे.या गावी राघोजी नावाचा सावकार होऊन गेला ज्याच्या गोष्टी आजही लोकांच्या तोंडी एकाला मिळतात राघो महार यांचा जन्म 1839 मध्ये झाला राघो स्वभावाने जिद्दी आणि मेहनती होता. असे सांगतात की एकदा काम करत असताना त्याला सोन्याने भरलेला हंडा सापडला. त्यातून त्याने मोह विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आपल्या मेहनतीने व चिकाटीने तो मोहविक्रेता म्हणून प्रसिद्ध झाला. ज्याच्या हजारो पिढया गरीबीच्या अंधारात खितपत पडल्या होत्या त्या समाजात सावकार म्हणून त्याची ख्याती व्हायला वेळ लागला नव्हता. लोकांना आलेल्या छोट्या छोट्या आर्थिक ...





