सज्ज स्वागतासाठी
काहीच तासांवर नववर्ष सुरू होण्याचे बाकी आहे.प्रत्येकजण नव्या संकल्पना घेऊन नव्या योजना, आखण्या करत नववर्षाची आतुरतेने वाट पाहत असतो. कुणाला करियर करायचे तर कोणाला छंद जोपासायचे असतात. मनसुबे रचत हरेकजण नव्या सालाचे स्वागत करतो.पण मनाला प्रश्न पडतो की प्रत्येकाचे इप्सित साध्य होते का? त्या दृष्टीने ते किती प्रयत्नशील असतात.तर अगदी बोटांवर मोजता येतील इतकेच लोक संकल्पना साक्षात उतरवण्यासाठी परिश्रम घेतात.इतरजण नववर्ष आले नि गेले याची पर्वाच करत नाहीत.
नववर्षाच्या संकल्पना मनात ठेवून जीवनाचा आराखडा तयार करण्यात गैर नाही पण आळशी वृत्तीने काहीच काम होत नाही. जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर लाथ मारीन तिथे पाणी काढता येते.नव्या पिढीला न मागताच सर्व गोष्टी मिळाल्या आहेत. त्यामुळे या समाजात राहताना समाजाशी आपणही काही देणं लागतो याचे सामाजिक भान नसते.तसेच सर्व गोष्टी सहज मिळाल्याने आपण काहीतरी करू...
