आमच्या प्रेरणास्थानातील अग्रस्थान – डॉ.श्रीकर परदेशी सर
* डॉ.श्रीकर परदेशी सरांसारखे पारदर्शक अधिकारी कुणी होणारच नाही..!
डॉ. श्रीकर परदेशी सरांचा जन्म सांगली शहरात झाला. त्यांचे वडील सांगलीला नोकरीला असल्यामुळे त्यांचे बालपण सांगली शहरातच गेले. अभ्यासात लहानपणापासूनच ते अतिशय हुशार होते. त्यामुळे शिक्षणाकरीता ते पुणेला गेले व पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस व एमडी पूर्ण केले. त्यादरम्यान यूपीएससीकडे वळले आणि पहिल्याच प्रयत्नात चांगली रॅंक घेत गृह केडर मिळवले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड आदी ठिकाणी काम केले. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कामाची छाप पडलेली आहे. आजही त्यांनी काम केलेल्या प्रत्येक जिल्ह्यात परदेशी साहेबांचं नाव घेतल्या जाते.
यवतमाळ जिल्हा परीषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन कार्य करतांना हजारो बेरोजगारांचे शासकीय नोकरीचे स्वप्न त्यांनी पूर्...