दलित पॅंथरचे यश आणि अपयश…!
(29 मे 2022 ला दलित पॅंथर ला स्थापन होऊन पन्नास वर्षे होतात, 29 मे 1972 ला दलित पँथरची स्थापना झाली)
पॅंथर म्हणजे चित्ता किंवा बिबट्या आणि पँथरचा कार्यकर्ता म्हणजे ज्याच्या अंगी चित्त्यासम आक्रमकपणा, लढाऊबाणा, निर्भीडपणा, जशास तसे उत्तर देण्याची धमक, अरे ला कारे म्हणण्याची तयारी, तारुण्य कुर्बान करण्यास सज्ज, बोलण्यात जोश आणि वागण्यात होश, कृतीमधील तळमळ, अन्याया विरोधातील एकजूट, समतेचा नारा, स्वातंत्र्याची पहाट, मानव मुक्तीचा संघर्ष, दबले आणि दाबले गेलेल्या लोकांचा आवाज, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, या त्रिसूत्री नुसार आचरण करणारा, भविष्य घडवण्यासाठी इतिहासापासून धडा घेऊन वर्तमानात लढा देणारा भीमसैनिक म्हणजे दलित पँथर.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणा नंतर 3 ऑक्टोबर 1957 ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना झाली. बी. सी. कांबळे आणि दादासाहेब गायकवाड यांच्या मतभेदानंतर...