अतिसामान्य कुटुंबातील प्रा. रमेश वरघट सर यांचे बहुरंगी कार्य
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात डोंगराळ भागातील करजगाव अत्यंत गरीब कुटुंबात प्रा. रमेश वरघट सरांचा जन्म झाला. आई बाबा दोघेही निरक्षर होते. पण आपला मुलगा शिकावा, चांगला मोठा व्हावा. असं राधा-कृष्ण या जोडप्याला मनातून वाटे. म्हणून राबराब राबून त्यांनी मुलाला शाळेत घातलं. त्यांचं सातवीपर्यंतचे शिक्षण अत्यंत हलाखीत गावातच झालं. हायस्कूलचे शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल दारव्हा येथे पूर्ण केले. त्यावेळी ते कोरे वसतिगृहात राहायचे. नववी पास झाल्यानंतर काही काळ त्यांच्या शिक्षणात खंड सुद्धा पडला होता. पण श्री एन. के. निमकर सर तसेच त्यांचा बालमित्र विष्णू तवकार यांच्यामुळे पुन्हा त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. आणि ते मॅट्रिक द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झालं .महाविद्यालयात शिक्षण घेत असताना अनेकदा त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. घरची गरिबी व अत्यल्...