व्हायरल आणि वास्तव…
परवा खोतवाडीच्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानिमित्ताने समाजात उमटलेले प्रतिबिंब न्याहाळताना... असे व्हिडिओ किंवा अशा बातम्याचे मथळे पाहिले की अंतर्मुख व्हायला होतं. आणि मग अनेक तर्क वितर्क, शिव्या शाप, पोलिसीखाकी, घराण्याची बदनामी, लेकासुनेवर कार्यवाही व्हावी इतपत सामाजिक दडपण, इ. असे एक ना अनेक चर्चा करत विविध समाजसुधारक जागे होतात आणि प्रत्येकजण आपल्या पद्धतीने शक्कल लढवतात. खरंतर अशा घटना घडायलाच नको हेही तितकच खरं आहे. परंतु घटनेची अगोदरची पार्श्वभूमी अथवा त्या घरातली वास्तव परिस्थिती कोणीही जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. ही एक पुढारलेल्या समाजातील शोकांतिका म्हणावी लागेल फार वर्षांपूर्वी सासुरवास नावाचा डंख समाजामध्ये खोलवर रुजला होता. त्याची पाळेमुळे एवढे खोलवर रुजले होते की अगदी अनेक समाजसुधारकांची आणि साधुसंतांची देखील या त्रासातून सुटका झाली नव्हती. अज्ञान, अंधश्रद्धा...
