शिक्षणाचे महत्त्व
दलित समाजातील लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकारांना परमपूज्य मानतात. त्या समाजाला डॉ भिमराव यांनी वाचा दिली. स्वाभिमान दिला, देवाचे असे वर्णन करतात की परमेश्वर मुक्या माणसाला वाचा देतो बोलायला शिकवतो व पंगु माणसाला ओलांडण्याची शक्ति देतो. शतकानुशतके भारतीयांना क्षुद्र समाजाला वाचा नव्हती, अन्याय सहन करावे लागत, चीड़ व्यक्त करता येत नव्हती, लाखोच्या या मूक समाजाला बोलके केले ते मूकनायक ठरले. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मधे महू येथे झाला. त्यांना आधुनिक मनु म्हणून ओळखले जाते कनिष्ठ जातीचे प्रतिनिधी म्हणून त्यांची प्रभावी ओळख प्रख्यात कायदेपंडीत, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जातात. त्यानी विद्यापीठाची पदवी घेतल्यानंतर अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी आपल्या विचारप्रणालीत लोकशाही विचाराला स्थान दिले त्यांच्या कार्याचा गौरव आजही संपूर्ण जगाला एक प्रकारची च...

