जागतिकीकरण आणि आंबेडकरवादी साहित्य
"शोषण विहीन मानवाचा विश्व समाज हे आंबेडकरवादी साहित्याचे ध्येय आहे. पुन्हा देवाच्या नावाने कुण्या धर्माच्या नावाने,आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही. असे प्रयत्न हे शोषण विहीन मानवाच्या विश्व समाजाच्या निर्मितीमध्ये केवळ अडथळे ठरू शकतात. जागतिक पातळीवरही भांडवली जागतिकीकरणाची बाजू घेणारे लोक आणि भांडवली जागतिकीकरणारा विरोध करणारे लोक आता एका सुरात बोलायला लागले आहेत. समाजवादाच्या आश्र्याला दुनियेला जावेच लागेल. भांडवली जागतिकीकरणाची एकच एक जागतिक बाजारपेठ जगातील प्रादेशिक संस्कृती आणि त्याच्या बाजारपेठा मान्य करणार नाहीत. या दृष्टीने जगात काही घडामोडी घडू लागल्या आहेत आणि या घडामोडीचा परिणाम असा होईल की या संस्कृती आणि त्याचा प्रादेशिक बाजारपेठा भांडवली जागतिकीकरणाची दादागिरी मान्य करणार नाहीत. जागतिककरणाला या प्रक्रियेतून नमाज समाजवादी चेहरा प्राप्त होईल आणि जगाच्या जगण्याला एक पूर्ण नवा ...