शिवबा तुम्ही आजही हवे होते.!
आज महाराष्ट्रातील तमाम जनता व संपूर्ण देश शिवजयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्याने साजरा करत आहे.. उर आनंदाने भरून आलाय. शिवबा, तुमच्या बद्दल असलेला जिव्हाळा थोरांपासून लहान पोरांमध्ये ही आढळतो. खूप खूप बरे वाटते.
पण शिवबा तुम्हाला जाऊन तीनशे वर्षाहुन अधिक काळ लोटला. त्याकाळची जनता (तुमची रयत) व आजची जनता ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. राजे तुम्ही 'जाणते राजे' होता. स्वतः सर्व कायदे पाळत होता व त्याच प्रमाणे जनतेला ही तसे वागण्यास लावत होता. शिवबा आता फारच बदल झालाय. राजेशाही गेली व नेतागिरी आली. आज जनता नेत्याच्या आश्वासनाला बळी पडून नेता निवडतात. पण त्या नेत्याला तुमच्या नखाची सुध्दा सर नसते. सर्व स्वार्थापोटी मतदाराला भूल देतात व सामान्य जनता फसते. स्वतः नेताच काळे धंदे व भ्रष्टाचाराने माखलेला असतो. (अपवाद सोडून) तो जनतेचे हित न पाहता स्वतःचाच उत्कर्ष व अफाट पैसा कमावण्याच्या फंदात पडतो. तुमच...