Thursday, March 5

Article

Article

स्वातंत्र्य कधी आम्हाला मिळेल काय ?

स्वातंत्र्य कधी आम्हाला मिळेल काय ?१५ ऑगस्ट राष्ट्रीय महोत्सव म्हणजे काय? या दिवसाचे महत्त्व कोणाला माहित नाही असे या भारतात तरी शोधून कोणीच सापडणार नाही.! ते तर सर्वांना माहीतच आहे १९४७ साली आपला भारत देश स्वतंत्र झाला, असे कोणीही नाही ज्या व्यक्तीला हे माहीत नसेल, परंतु तुम्हाला खरंच असे वाटते का, की आपला देश स्वतंत्र झाला आहे, आम्हा मुलींना तरी असे अजून तरी तसे अजिबातच वाटत नाही...!मुलींनी स्वप्न पाहणे वाईट आहे का? व ते स्वप्न अस्तित्वात आणणे हा गुन्हा आहे का ? स्वप्न पाहणे गुन्हा आहे असेच मला तरी वाटते, प्रत्येक मुलगी घराबाहेर पडण्या अगोदर सतरा वेळा विचार करते मग ती बाहेर पडते त्यात पण एखादा माणूस तिच्याकडे पाहत असला तर ती तिचा अवतार नीट आहे का ते पाहते, कपडे छोटे वाटत आहे का ? घातलेले कपडे खूप फिट आहे का? केस नीटनेटके आहेत का? कुठे काही लागलं आहे का? हे ती बघते परंतु तिच्या वेशभूष...
शोले चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रथम प्रदर्शित
Article

शोले चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रथम प्रदर्शित

शोले चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रथम प्रदर्शितआज ज्यांचं वय ६५-७० च्या घरात आहेत. त्या पिढीला “शोले” या हिंदी चित्रपटाने काय करामत करून दाखवली होती. हे नीट समजेल. हा शोले चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रथम प्रदर्शित झाला. तो पुढे एवढे विक्रम करेल. याची कल्पना कोणालाही नव्हती. निर्माता दिग्दर्शक शिप्पी यांच्यासह अनेकांना बुचकळ्यात टाकणारा हा चित्रपट इतका गाजला की, त्याने अनेक प्रकारचे “निखारे”, फुलविले, जागविले. मराठीत हिंदीत शोले शब्दाचा अर्थ मराठीत “निखारे” असा होतो. हिंदीतील “शोले” चित्रपटाने इतके निखारे विखरून सोडले आहेत की त्याची मोजदात करता येणार नाही. पण त्याची आठवण मात्र काढली पाहिजे .खरे तर उद्या या चित्रपट प्रदर्शित होऊन पन्नासावे वर्षे सुरू होईल. पण पन्नास वर्षाच्या चित्रपटाने जो मैलाचा दगड रोवून ठेवला. त्याला तोड नाही. त्याचे स्मरण व्हावे. आम्ही स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्य...
लोकशाहीर : अण्णाभाऊ साठे
Article

लोकशाहीर : अण्णाभाऊ साठे

लोकशाहीर : अण्णाभाऊ साठे ------------------------------------- आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस. अण्णाभाऊ साठे हे लोकशाहीर म्हणून जगप्रसिद्ध झाले. ते एक मराठी समाजसुधारक, कवीतेच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रूढी परंपरेवर आघात करणारे कवी आणि लेखक होते.त्यांचे लेखन हे सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या समजपयोगी होते. अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी विचारसरणी आचरण करणारे तत्ववेत्ते होते.सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे समाज परिवर्तनाला दिशा व चालना देणारे होते. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त...
आम्ही साखर केव्हाच सोडली.!
Article

आम्ही साखर केव्हाच सोडली.!

आम्ही साखर केव्हाच सोडली.!एक काळ होता साखर म्हणजे प्रतिष्ठेचा गोड पदार्थ. अशा आख्यायिका सुद्धा आहेत की, राजाला खूप मोठे यश मिळाले किंवा आनंद झाला की, हे राजे हत्ती वरून मिरवणूक काढून आपल्या राज्यात प्रजेला साखर वाटायचे. आपला आनंद व्यक्त करायचे. राजाने साखर वाटणे म्हणजे एक प्रतिष्ठा होती. एक काळ हा पण होता की, साखरेचा चहा पिणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण होतं. गुळाचा चहा पिणे म्हणजे दुय्यम लक्षण होतं. अगोदर, पाहुणे म्हणून बाहेर गावी गेले की, पाहुण्यांना चहाला बोलवायचे. त्यात साखरेचा चहा म्हणजे ज्याने आमंत्रण दिले तो म्हणजे खुप श्रीमंत किंवा प्रतिष्ठित व्यक्ती समजायचे. गुळाचा चहा ऑफर करणे म्हणजे गरीब असल्याचे समाजात समजायचे.तेव्हा ह्या दोन गोड पदार्थां मध्ये नकळत स्पर्धा आणि वरिष्ठ-कनिष्ठ असा दर्जा समजल्या जायचा. तेव्हा साखर ही गुळा पेक्षा श्रेष्ठ असल्याचे समजले जायचे. साखरेला सुद्धा खूप अभ...
महानायक : वसंतराव नाईक
Article

महानायक : वसंतराव नाईक

महानायक : वसंतराव नाईकज्या समाजाला इंग्रजाच्याच्या काळात एका ठिकाणी फार काळ थांबता येत नव्हतं. ज्या समाजात अंधश्रधा,वाईट रुढी,परंपरा यांचं साम्राज्य होतं.ज्या समाजात काला अक्षर भैंस बराबर होतं.पोटासाठी रानोमाळ भटकणारा समाज. कपाळावर चोर गुन्हेगार म्हणुन ठसा उमटवलेला समाज.ना नावाची ना गावाची ओळख असेलला समाज.नातलगांची एकदा ताटातूट झाली तर पुन्हा भेट होईल की नाही याची खात्री नसलेला समाज.त्यासाठी एकमेकांच्या गळ्यात पडून गाण्यातून रडणारा समाज म्हणजे गोरमाटी (बंजारा) समाज. शांततेच प्रतिक म्हणून पांढरा ध्वज स्विकारुन शांततेच्या काळात ,लढाईच्या काळात राजा महाराजांना धान्यांची रसद पुरविणारा गोरमाटी समाज तेवढाच शूर विर आहे.यांच्याकडे आदरातिथ्य आहे.दुसऱ्यांना सन्माने वागवण्याची वृत्ती आहे.दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती यांच्या नसानसात भिनलेली आहे ;पण समोरचा जर विश्वासघातकी निघाला तर त्याला तोडण्याची ह...
Neet : आधी ‘नीट’ला नीट समजून घ्या…
Article

Neet : आधी ‘नीट’ला नीट समजून घ्या…

आधी 'नीट'ला नीट समजून घ्या... मगच 'नीट'चा नीटपणे विचार करा !'नीट'ची स्वप्ने रंगवण्यापूर्वी एकत्र बसून'नीट'चे मृगजळ नीट समजून घ्या! नीट मध्ये  जेमतेम मार्क मिळालेल्या विद्यार्थी व पालकांपासून पाचशे मार्का पर्यंत पोहोचलेल्या अनेकांची घोर निराशा झालेली सापडते. तर 600 पेक्षा जास्त मार्क मिळालेल्या विद्यार्थी व पालकांची सरकारी एमबीबीएस कॉलेज मिळणार की नाही याची अस्वस्थता प्रचंड वाढली आहे. याच वेळी पाच जून पासून सर्वच वृत्तपत्रात विविध क्लासेसच्या जाहिराती ठळकपणे येत आहेत. टीव्हीवर नीट रिपीट करण्यासाठी वेगळ्या बॅचेसचे आवाहन सतत दाखवले जात आहे. या गदारोळात मूळ विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते. ते कोणते यावर सविस्तर माहिती जाणकार पालकांना मिळावी एवढाच या लेखाचा हेतू. यंदा दहावीचे निकाल लागले आहेत. अनेक पालकांनी नीट साठीचे क्लासेस सुरू केलेले आहेत. बारावीचे व नीट चे निकालानंतर पुन्हा नीट देण्य...
टिटवीचे ओरडणे अभद्र नव्हे..!
Article

टिटवीचे ओरडणे अभद्र नव्हे..!

टिटवीचे ओरडणे अभद्र नव्हे ! टिटवीबद्दलची पोस्ट टाकल्यावर त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया एक अंधश्रद्धा आहे हे पण अनेकांना पटले पण पर्यावरणामध्ये प्रत्येक प्राणी कीटक याचे जैव-वैविधतेच्या दृष्टीने स्थान महत्त्वाचे आहे.त्यामुळेच इथला नियम आहे जगा आणि जगू द्या.टिटव्या फक्त रात्रीच ओरडत नाहीत. त्या दिवसाही ओरडतात! फरक फक्त एवढाच की, दिवसभर सुरू असलेल्या कोलाहलामुळे टिटव्यांचे ओरडणे आपल्या कानी पडत नाही. तरीही टिटव्या प्रामुख्याने रात्रीच्याच कालवा करतात आणि यामागे मोठे कारण आहे. अगदी मध्यरात्रीही टिटव्या टीव... टीव... टीटीव... टीव...! असा टाहो फोडतात. टिटव्यांचे ओरडणे मात्र कोणत्याच अंगाने अशुभ नसते. ती केवळ एक अंधश्रद्धा आहे.खेड्यात जुने घर अगदी शेताला लागून होते. आमचा वाडा संपला की खारी सुरू व्हायची.शिवाय अनेकदा रात्री शेतावर राहिलो असल्याने मी टिटव्यांचे ओरडणे अगदी जवळून अनुभवले आहे. हा पक्षी न...
पिंडाला शिवलाय कावळा…
Article

पिंडाला शिवलाय कावळा…

पिंडाला शिवलाय कावळा.."माझी काळी आई मला द्यायची नाही मला इकायची नाय, मला इकायची नाय" असं जीवाचा आक्रोश करत सखाराम ओरडून ओरडून सांगत होता, हाता पाया पडत होता पण निगरगट अधिकारी मात्र त्याचे ऐकायला तयार नाही, चारी बाजूने शेतात पोलीस तैनात करण्यात आले होते, जसं मयताच्या चारी बाजूने नातेवाईक, मित्र परिवार असतात अगदी तसं, इतर वेळेस जमीन इकायची किंवा खरेदी करायची असल्यास तालुक्याच्या गावी तहसील ऑफिसला जावं लागत होते, पण सखाराम जमीन द्यायला तयार नव्हता बाकी शेतकऱ्यांनी काहींनी मनाने तर काहींनी त्यांच्या मनाविरुद्ध जमिनी सरकारला खरेदी करून दिल्या होत्या, त्यामुळे आज तहसील ऑफिस सखारामच्या शेतात शेती खरेदी करायला आले होते. सखारामची सही घ्यायला आले होते, महामार्गाचे कामही सुरू झाले होते तरीही सखाराम त्याची काळी आई द्यायला अजिबात तयार नव्हता, अख्ख आयुष्य सखारामने जमीन कसली होती त्याचा जीव त्या काळ्या...
नालंदाच्या इर्षेची धगधगती आग भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानानेच विझणार
Article

नालंदाच्या इर्षेची धगधगती आग भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानानेच विझणार

नालंदाच्या इर्षेची धगधगती आग भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानानेच विझणार मानवाकडे सर्वात मोठा अवगुणाचा घटक म्हणजे इर्षा होय. हा मानवतेला लागलेला कलंक आहे. ईर्षेपोटी माणसाने माणसाचे फार मोठे नुकसान केले आहे. एकदा का माणूस ईर्षेपोटी लागला की तो सर्वनाशच करतो. त्याला कुठलेही भान राहत नाही. अशा इतिहासात अनेक घटना ईर्षेपोटी घडल्या आहेत. मानवानेच मानवाचे नुकसान केले आहे. इर्षा म्हणजे आपल्याकडे नसलेल्या गोष्टीची ओढ होय. इर्षा म्हणजे कुणाचे चांगले पाहून होणारे दुःख होय. ह्याचा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये अनुभव येत असतो. ही इर्षा प्रत्येक ठिकाणी असते. ती कुटुंबात, समाजात, जाती-पातित, धर्मा-धर्मात व देशात-देशात सुद्धा असते आणि ह्या इर्षे पोटी मानवजातीचे फार मोठे नुकसान झाल्याचे इतिहासावरून आपल्याला बघायला मिळते. त्यातील एक मोठे उदाहरण म्हणजे विश्वख्यातीचे नालंदा विश्व विद्यापीठ आगीत भस्मसात झाले हे होय....
Dr. Sujay Patil : शेतकरी आत्महत्या विरोधी अभियानाचे प्रणेते डॉ.सुजय पाटील
Article

Dr. Sujay Patil : शेतकरी आत्महत्या विरोधी अभियानाचे प्रणेते डॉ.सुजय पाटील

Dr. Sujay Patil : शेतकरी आत्महत्या विरोधी अभियानाचे प्रणेते डॉ.सुजय पाटील                रूग्णसेवा हिच ईश्वरसेवा हे मानवी आयुष्यातील सेवाधर्माला एक उदात्त,अत्युच्च अस्थान प्राप्त करून एक पवित्र रहस्यमयी ब्रिदवाक्य आहे.त्याला अनुसरून आजही अनेक उच्चशिक्षित सेवाव्रती जीवनातील मानवतावादी तत्वज्ञानाचा अंगीकार करून वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत आहेत.            रूग्णांना व्याधीमुक्त आणि त्यांच्यासोबत परिवारातील सदस्यांनाही नव्या जीवनाचा उपहार प्राप्त करून देणे हे समाजातील काही डॉक्टरांचे प्रभावी मानवसेवी कार्य आजही सुरू आहे.याच तत्वप्रणालीने विधायक आणि विनम्र सेवाभावी वृत्तीची कसं धरून आपण अत्यंत जटील अशा मानसिक आजार निवारणाच्या निदान आणि उपचार क्षेत्रात एक सामाजिक आणि आध्यात्मिक सेवक म्हणून सक्रिय आहात. आयुष्यात प्राप्त या मौलिक उपलब्धींबध्दल आपणास अभिमानंदनासह सन्मानित करण्यात येत आहे. हे ...