Monday, March 9

Article

‘रामा कलेक्टर झाला : ध्येयासाठी झपाटलेली वाटचाल’
Article

‘रामा कलेक्टर झाला : ध्येयासाठी झपाटलेली वाटचाल’

'रामा कलेक्टर झाला : ध्येयासाठी झपाटलेली वाटचाल'युवा साहित्यिक अशोक पवार लिखित '…आणि रामा कलेक्टर झाला ' ही कादंबरी वाचण्यास नुकतीच हाती घेतली. सदर कादंबरीस आयकर उपायुक्त विष्णू औटी यांची आशयगर्भी प्रस्तावना मिळालेली असून ज्येष्ठ साहित्यिक, संजय पठाडे यांची वाचकांच्या काळजास हात घालणारी दमदार पाठराखण लाभलेली आहे. मुखपृष्ठ इतके बोलके आहे की, कादंबरीच्या अंतरंगात कोणकोणते सहस्य दडलेले आहे हे पाहण्यासाठी वाचकांचे मन क्षणात भरारी घेते.मनात असलेली जिद्द धगधगत्या मशालीसारखी सदैव पेटती ठेवल्यास आलेल्या कोणत्याही संकटावर मात करण्यास दहा हत्तींचे बळ देवून जाते. परिस्थिती माणसाला अनेकदा निराश करू शकते, परंतु पराजीत करू शकत नाही. हा या कादंबरीचा मूळ गाभा आहे. जर आपल्या डोळ्यांत स्वप्न असेल आणि काळजात जिद्द असेल, तर कोणतीही अडचण यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकत नाही. हा संदेश देण्यात ही ...
ग्रामीण भागातील जिद्दी तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरणारी कादंबरी…आणि रामा कलेक्टर झाला.!
Article

ग्रामीण भागातील जिद्दी तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरणारी कादंबरी…आणि रामा कलेक्टर झाला.!

ग्रामीण भागातील जिद्दी तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरणारी कादंबरी…आणि रामा कलेक्टर झाला.!ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना प्रेरणा देऊन त्यांच्यातील विजिगीषु वृत्ती जागृत करणारी ' आणि रामा कलेक्टर झाला ' ही कादंबरी नुकतीच माझ्या वाचनात आली.मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये क्लिअरिंग एजंट म्हणून काम करणाऱ्या अशोक पवार या हरहुन्नरी तरुणाने या प्रेरणादायी कादंबरीचे लेखन केलेले आहे.दुष्काळ पाचवीला पुजलेल्या पारनेर सारख्या दुष्काळी भागातील एका छोट्या गावातील एका जिद्दी तरुणाची ही कथा आहे.खरं तर स्पर्धा परीक्षा हे एक मृगजळ आहे.१०..१५ वर्षांपूर्वी शहरातील तरुणांचीच ती मक्तेदारी होती.पण हळूहळू ग्रामीण भागातील तरुणांना या परीक्षेने भुरळ घालायला सुरुवात केली.दुर्दम्य इच्छाशक्ती,जबर मेहनत करण्याची वृत्ती आणि ध्येयवेडे होऊन यशाला गवसणी घालणारा टोकाचा आत्मविश्वास या बळावर ग्रामीण भागातील तरुणांन...
साहित्यसूर्याला विनम्र अभिवादन.!
Article

साहित्यसूर्याला विनम्र अभिवादन.!

साहित्यसूर्याला विनम्र अभिवादन.!ज्यांच्या लेखणीने मराठी भाषेतील साहित्य सातासमुद्रापार अजरामर झाले. आपल्या झुंजार लेखणीने तळागाळातील कष्टकरी, शोषितांच्या व्यथा साहित्यातून मांडणाऱ्या जन नायकाचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगावी झाला. ते साहित्यसूर्य अण्णाभाऊ साठे होय. त्यांनी साहित्यातली सर्व प्रकार लिहिले आहेत. नवलाईची गोष्ट ही की, फक्त दिड दिवस शाळा शिकून वैश्विक,परिवर्तनवादी, सामाजिक, विचार आपल्या साहित्यातून व्यक्त केले.खरे तर अण्णाभाऊ साठे एक जागतिक कीर्तीचे साहित्यिक होते. परंतु इथल्या व्यवस्थेमुळे उपेक्षितच राहिले. फकिरा, वारणेचा वाघ, वैजयंती, माकडीचा माळ, आवडी, माझा रशियाचा प्रवास यासारख्या अनेक कथा, कादंबर्‍या, पोवाडे, नाटके, प्रवासवर्णन अण्णाभाऊंनी मराठी साहित्याला, महाराष्ट्राला दिलेली अनमोल भेट आहे.अशा या महान साहित्यिकाचा मृत्यू 18 जुलै 1969 रोजी झाला...
पंढरपूरची वारी म्हणजे अध्यात्मिक प्रवास…
Article

पंढरपूरची वारी म्हणजे अध्यात्मिक प्रवास…

पंढरपूरची वारी म्हणजे अध्यात्मिक प्रवास…पंढरपूर वारी ही मिरवणूक भक्तीचा एक मेळावा आहे, ज्यामध्ये लयबद्ध ढोलकी, झांझांचा आवाज आणि बासरीच्या मधुर स्वरांनी वातावरण दुमदुमून जाते.पंढरपूर वारी - ही मिरवणूक भक्तीचा एक मेळावा आहे, ज्यामध्ये लयबद्ध ढोलकी, झांझांचा आवाज आणि बासरीच्या मधुर स्वरांनी वातावरण दुमदुमून जाते.पंढरपूरची वारी ही केवळ एक यात्रा नाही; ती महाराष्ट्राच्या खोलवर रुजलेल्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा जिवंत पुरावा आहे. भगवान विठोबाच्या सन्मानार्थ लाखो लोक पवित्र मार्गांवर चालत असताना, ते शतकानुशतके जुन्या भक्तीच्या सामूहिक कृतीत सहभागी होतात. दंतकथा आणि विधींनी समृद्ध असलेले हे तीर्थस्थान, भक्तांना नम्रता, संगीत आणि श्रद्धेच्या सुसंवादी मिश्रणात एकत्र करते, भक्ती चळवळीचा चिरस्थायी वारसा आणि दैवी प्रेमाच्या परिवर्तनीय शक्तीचा उत्सव साजरा करते.पंढरपूरची वारी, एक अल...
मानलं माणसा तुला.!
Article

मानलं माणसा तुला.!

मानलं माणसा तुला.!एअर इंडियाचं एक फ्लाईट अहमदाबाद वरून लंडनसाठी २४२ प्रवासी घेऊन हवेत झेपावलं. खूप मोठ्या उम्मेदी घेऊन २४२ प्रवासी लंडनसाठी निघाले आणि काही सेकंदामध्ये ते कोसळले. आपला भारत देशच काय संपूर्ण विश्वच ह्या उडानाने स्तब्ध झाले.  आता ह्या घटनेची मीमांसा होते आहे. तर्क वितर्क होत आहेत, सांगितले जात आहे. जी काही घटना घडली ती खूपच वाईट घडली. फ्लाईटचे नाव होत ड्रीमलाइनर. आपण ह्याला आपल्या स्वप्नांची पूर्ती करणारा म्हणू. 'उंच झेप घेरे पा...
मेहनतीची फॉरच्युनर: मागून नव्हे, कमावलेली!
Article

मेहनतीची फॉरच्युनर: मागून नव्हे, कमावलेली!

मेहनतीची फॉरच्युनर: मागून नव्हे, कमावलेली!सध्या ही गाडी पहिली होती त्या पेक्षा कितीतरी अधिक ट्रेंडिंग मध्ये आहे.नेमकं ट्रेंडिंगमध्ये असण्याचं कारण काय ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, असं मी म्हणार नाही.त्याच कारण म्हणजे, मराठी मीडियाला ज्याची हगवण सध्या लागली ते.! हगवने प्रकरण हे एक झालं. आणि दुसरं म्हणजे हॉटेल भाग्यश्री वाल्याने कष्टाने घेतलेली हीच ती गाडी. शिवाय नाद करती काय अस म्हणत  बनवलेली प्रचंड व्हायरल झालेली ती रील पाहून कष्ट केलं की, पाहिलेलं स्वप्न सत्यात  उतरू शकत. हे दाखवून जणू स्वप्नांचं प्रतीक ठरलेली गाडी.एकाला फुकट मिळाली, परंतु त्याला ती सांभाळता आली नाही. सगळं काही असून देखील, हुंड्यात ही गाडी मागून घेऊन. खर तर स्वतःची तर इज्जत कमी केलीच परंतु त्या गाडीची ही सोशल मीडियावर पहिली कधीच झाली नव्हती इतकी बेइज्जती केली गेलेली.! आपण पाहिलं. हगवणे कुटुंबाच्या बातम्यारुप...
आणखी किती वैष्णवींचे बळी जाणार ?
Article

आणखी किती वैष्णवींचे बळी जाणार ?

आणखी किती वैष्णवींचे बळी जाणार ?पुण्यातील वैष्णवी हगवने आत्महत्या की हत्या ? प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असून प्रत्येकाला आपल्या घरातील मुलीबद्दल चिंता वाटायला लागली आहे.या प्रकरणातील जवळपास सर्व आरोपींना अटक झाली असून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहे.या दुःखद घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून भविष्यात यावर केवळ सरकारच नाही तर समाजाकडून सुद्धा काय प्रतिक्रिया येतात यावर या प्रकरणाचे गांभीर्य ठरणार आहे. प्रत्येक प्रकरणात सरकारला दोषी धरून चालणार नाही.जी काही कायदेशीर कारवाई करायची आहे ती सरकार करणारच आहे.परंतु समाज म्हणून ज्या गोष्टी आपण करायला पाहिजे त्यावर सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे.ज्या गोष्टी आपल्या हातात आह...
पाऊलवाटा
Article

पाऊलवाटा

पाऊलवाटातेव्हा २००० साली नुकतच एम.ए.मराठी सिताबाई कला महाविद्यालय अकोल्यातून झालो होतो. तेव्हा एम.ए ला फार कमी विद्यार्थ्यांना बी प्लस भेटायचं. तेव्हा एम.ए होऊन एकतर स्पर्धा परीक्षा नाही तर प्राध्यापक होण्यासाठी नेट+सेट पात्रता परिक्षा यु.जी.सी.नं ठेवली होती.परिक्षा काही साधी नव्हती.खुप कमी प्रमाणात निकाल लागायचा. मीही त्या इराद्याने अकोल्याच्या चिवचिव बाजारातून नेट+सेटच्या तयारीसाठी अर्ध्या किमतीत एक जाडजूड पुस्तक विकत घेतलं.जेमतेम २००३ ला काहीतरी करण्याच्या उर्मीनं  आम्ही गाव सोडलं. घरची परिस्थिती बेताचीच कोरडवाहू शेती कधी पिकणारी तर कधी न पिकणारी निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेली. शहरात आल्यानंतर सुरूवातीला भाड्याची खोली घेतली.भाडं फक्त दोनशे रुपये होतं पण तेही तेव्हा देण्यासाठी खुप कसरत व्हायची.सोबत तलवारे व खांडेकर नावाचा नालवाडयाचा मित्र होता. तो आपल्या पोट प्रपंच भागवण्यासाठी...
नाटकासाठी मातीशी जपलेलं नातं.!
Article

नाटकासाठी मातीशी जपलेलं नातं.!

हा माझा विदर्भातला जिगरी दोस्त. वर्ध्याचा. हरीश इथापे ! लै भारी माणूस. आम्हा दोघांच्या दोस्तीचा एकच धागा - 'नाटक' ! हरीशला शेती, घरच्या जबाबदार्‍या सोडून लांब पुन्यामुंबैला जाऊन 'नाटक' करणं शक्य नव्हतं आनि गांवाकडं शेती करता-करता नाटकाचा 'किडा' स्वस्थ बसू देईना ! काय करायचं?... मग त्यानं शेतातच शेतकरी मित्रांना सोबत घेऊन जगावेगळं 'ॲग्रो-थिएटर' सुरू केलं ! ...हरीशचं टॅलेंट एवढं जबरदस्त की नादखुळ्या, भन्नाट 'ॲग्रो थिएटर'ची ख्याती हळूहळू दूरवर पसरत गेली. आता महाराष्ट्रासहित आसपासच्या सहा-सात राज्यातून इथे नाटकाचे ग्रुप त्याच्या शेतात येतात. शेतात एक हाॅल बांधलाय. रहाण्या-जेवण्याची, रिहर्सलची सोय तिथंच आहे. पोरंपोरी महिना-महिना रहातात. नाटकाची वर्कशाॅप्स, लेखन, रिहर्सल्स करतात. बांधावर-विहीरीवर-तळ्याकाठी 'मोनोलाॅग्ज' पाठ करत बसतात... झाडांशी-पक्षांशी बोलायला शिकतात.. मग कलाकार बहर...
कदम मामा श्रद्धांजली.!
Article

कदम मामा श्रद्धांजली.!

परभणीच्या सकाळी एक खास ठिकाण असायचं संजीवनी पोहा सेंटर. कामावर धावणाऱ्या माणसांपासून ते शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांसाठी इथले पोहे म्हणजे सकाळची ऊर्जा होती. या सेंटरचा आत्मा म्हणजे परमेश्वर कदम, सर्वांच्याच आपुलकीने 'कदम मामा' म्हणून ओळखले जाणारे.दोन किलो पोह्यांनी सुरू झालेला त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत गेला. कामगार, विद्यार्थी, छोटे दुकानदार, मोठे व्यापारी, डॉक्टर, वकील, सरकारी अधिकारी सर्व थरांतले लोक संजीवनी सेंटरला भेट द्यायचे. केवळ पोहेच नाही, तर खिचडी, मुगवडा, भजी, मिरची भजी आणि त्यांच्या हातच्या चहाची चव लोकांच्या जिभेवर चढली होती.कदम मामांचं वैशिष्ट्य वेगळं होतं. गरजूंना पोहे देताना त्यांनी कधी पैसे मागितले नाहीत. कोण उपाशी आला तर मामा स्वतःहून त्याच्या प्लेटमध्ये भरभरून वाढायचे. त्यांच्या स्वभावात असलेली माया आणि आपुलकी माणसांना जास्त भावायची.व्यवसाय...