नवोदित कवियत्रिंनी गाजवले कवी संमेलन
राष्ट्रीय हिन्दी कवी संमेलनात श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयातील आकांक्षा कुमारी व कु. रेश्मा सदार यांच्या बहारदार कविता
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई आणि अखिल भारतीय हिंदी साहित्य सभा (अहिसास ), अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने ३० ऑक्टोबर रोजी स्थानिक चिंतामणी सभागृहात झालेल्या राष्ट्रीय हिन्दी कवी संमेलनात देशभरातील विविध राज्यातील कवींनी आपला सहभाग नोंदविला. सोबतच श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय, अमरावती येथील विद्यार्थ्यांनी आकांक्षा कुमारी व कु. रेश्मा सदार यांनी राष्ट्रीय हिन्दी कवी संमेलनात आपली रचना सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
आकांक्षा कुमारीने ‘ मुझमे खूबियाॅ तुम बेहिसाब पाओगे , मेरा चेहरा हमेशा बेनकाब पाओगे, लोग छुपाते है खुद की असलियत अक्सर , मुझमें तुम सच्चाई का रुबाब पाओगे ‘ ! ही हिन्दी रचना सादर केली तर कु. रेश्मा सदार हिने ‘ मै भारत की नारी हूॅ , किसी से नहीं कभी हारी हूॅ ,अकेली हर संकट पर भारी हूॅ , एक ही किरदार में छवियाॅ कही सारी हूॅ ‘ ! ही रचना सादर करून निमंत्रित राज्यातील कवींनी कु. रेश्मा सदार हिचे भरपूर कौतुक व स्वागत केले.
राष्ट्रीय हिन्दी कवी संमेलनात श्री सय्यद मुजीब आलम , मनोज दोन्ही , श्रीमती नर्गिस अली , श्री. अश्यपाक शाज, श्री संतोष शर्मा, डॉ. अनिता खेबूडकर ( सांगली), सौ. कल्पना विघे (अमरावती), डॉ.सुबोध निवाने (अमरावती), लाजपतराॅय गर्ग (हरियाणा), डॉ. पुरण सिंह ( दिल्ली ), डॉ. अनिला चव्हाण (भोपाल), रशीद अहमद रशीर (इंदोर),श्री. शशिधर त्रिपाठी (मुंबई), पंडित पुराणचंद शर्मा (दरिया), आकांक्षा कुमारी (बिहार), प्रमोद बियाला (मुंबई), अर्चना भटनागर (अजमेर), कु. रेश्मा सदार (अमरावती), श्री. विनय सक्सेना (दिल्ली), डॉ. मधुकांत बंसल (जयपुर), श्री. राजाभाऊ काकपुरे (अमरावती), नाना रमतकार (अमरावती) , हनुमान गुजर (अमरावती) आदि कवींनी आपल्या बहारदार रचना प्रस्तुत केल्या. कवी संमेलनाचे बहारदार संचालन श्री मनोज दोन्ती यांनी केले.
राष्ट्रीय हिन्दी कवी संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री. हंसराज अहिर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कर्नल केशव सिंह (दिल्ली), माजी जिल्हाधिकारी बी.जी. वाघ (नाशिक), मोहन कृष्ण भारद्वाज (दिल्ली), महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे सदस्य श्री. जगदीश थपलियाल, श्री श्याम शर्मा, श्री प्रमोद शुक्ला, अहिसास इंदोर शाखेचे अध्यक्ष डॉ. बनवारीलाल जाजोदिया, श्रीमती रेवती देशपांडे, माजी अबकारी आयुक्त श्री. बि.जे. डोंगरे , सामाजिक कार्यकर्ते डॉ. गोविंद कासट ,अहिसास च्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती शीला डोंगरे आदी मान्यवर विचारपिठावर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध सामाजिक,सांस्कृतिक व योग क्षेत्रात कार्यरत असणारे श्री चंद्रकांत जाजोदिया लप्पीसेठ हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अॅड.सतिश उपाध्याय यांनी तर आभार प्रदर्शन प्रोफेसर डॉ. संजय खडसे यांनी केले.
सायंकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.दिपाली राठोड हिने ‘ सत्यम शिवम सुंदरम ‘ व ‘आपकी नजरो ने समझा ‘ हे दोन हिंदी गीतं गाऊन उपस्थितांची वाहवा मिळविली.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध विधीज्ञ अॅड. प्रशांत देशपांडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून आकाशवाणी अमरावतीचे वरिष्ठ निवेदक श्री. संजय ठाकरे , संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे श्री रमेश जाधव , संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. संजय खडसे , अहिसासच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती शीला डोंगरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात नुपूर डान्स अकादमीचे संचालक श्री. प्रकाश मेश्राम, अनुराधा डान्स अकादमीच्या संचालिका श्रीमती मेघा चौधरी, स्टार ऑफ अमरावतीचे संचालक श्री संतोष सुरकर, आरडीए ग्रुप अमरावतीचे संचालक श्री. राहुल पारोडकर यांच्या कलाकारांनी आपल्या कला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे संचालन आकाशवाणीच्या अनिता काळे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. स्मिता इटनारे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री बि.जे. डोंगरे ,अॅड. विरेंद्र मिश्रा, श्रीमती शीला डोंगरे, डॉ. विलास मेश्राम , श्री. चेतन हंबर्डे , श्री वसंत पाटील, नर्गिस अली, जावेद अली, सौ. स्मिता इटनारे, श्री हनुमान गुजर, अनिता काळे, आकांक्षा कुमारी, आदींनी विशेष परिश्रम घेतले.