पित्तरपाठ
जित्तेपणी मायबाप
वृद्धाश्रमात ठेविले
पंचपकवान्नाचं ताट
आज दावितो हळ्याले !!
अरे पितृमोक्षासाठी
काहून जातो काशीले
कर्जबाजारी होऊन
दान घालतो भटाले !!
काशी तीर्थ घाटावर
भरला श्रद्धेचा बाजार
विकल्या जाते मुक्ती मोक्ष
धन, पैका भारोभार !!
कसं पित्राले भेटन
स्वर्गी केळी, मोहा पान
सोन्या चांदिचे तांदूय
देतो खोट्याले रे दानं!!
ओंजळीत पाणी बाप्पा
कसं स्वर्गामंदी जाते
पिंड तांदूय भाताचे
कसा पित्तर माह्या खाते !!
कपोल कल्पित सारा
स्वर्ग नरकाचा खेळ
सुख, दुःख,जन्म,मृत्यू
तुह्या कर्माचा रे मेळ !!
जित्तेपणी सेवा करं
मायबाप पितराची
पित्तरपाठात नको
वाट पाहू कावळ्याची !!
-वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक (सेनि)
अकोला 9923488556
सहा. पोलीस उपनिरीक्षक (सेनि)
अकोला 9923488556