* नवराष्ट्र मराठी अस्मिता पुरस्काराने अविनाश कोठाळे सन्मानित
* खा.डॉ. बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची विशेष उपस्थिती
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी : सेवानिवृत्त जलसंपदा विभागाचे सहायक अधीक्षक अभीयंता तथा विद्यमान जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बॅकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे हे एक बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. उत्तम प्रशासक, कर्तव्यदक्ष बॅकेचे अध्यक्ष म्हणून, त्यांना अनेकदा बहुमान मिळाला आहे. एमआयई सिव्हील, एलएलबी, एडीआयएम मॅनेजमें, डीएमएम पर्यंतचे उच्च शिक्षणही त्यांनी पूर्ण केले आहे.
अविनाश कोठाळे यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. जलसंपदा विभागात 1980 मध्ये कनिष्ठ अभीयंता म्हणून, ते रुजू झाले. तर, 2019 मध्ये कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकारी म्हणून, ते सहायक अधीक्षक अभीयंता पदावरून जलसंपदा खात्यातून सेवानिवृत्त झाले. उत्कृष्ट कामाबद्दल या विभागात त्यांना शासनाने दोन अतिरी वेतनवाढही दिली आहे. अप्पर वर्धा धरणाचे धामणगाव कार्यक्षेत्रात 4 हजार हेक्टर सिंचन क्षमता वाढविण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहीला आहे. स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात सर्वेक्षण, कालवे, बांधकाम, गुणनियंत्रण, जलसेतु बांधकाम, सिंचन व्यवस्थापन आदी क्षेत्रातही त्यांचा दाडंगा अनुभव आहे.
ते पदावर असताना, महाराष्ट्र शासनाचे सात दिवसात कुठलेही काम प्रलंबीत राहू नये, यासाठी ते नेहमी आग्रही असायचे. ही त्यांची जमेची बाजु होती. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी 2000 साली जिजाऊ बॅकेची स्थापना केली. ते जिजाऊ बॅकेचे संस्थापक अध्यक्ष ठरले आहेत. शुन्यातून विश्व निर्माण केलेल्या या बॅकेने 22.74 लाखांच्या भागभाडंवलातून बॅक सुरु केली. आज बॅकेची 380 कोटी ठेवी ,13.37 कोटी भागभांडवल आहे.जिजाऊ बँकेचा बीझीनेस मिक्स अल्पकाळात 650कोटी पर्यंत असुन अमरावती शहरातील ऊत्कृष्ठ व प्रथम क्रमांकावरील बँक आहे.ते अध्यक्ष असताना, त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची व त्यांनी घेतलेल्या निर्णयांची दखल वृत्तपत्र व सामाजिक संघटनेने घेतली असून, त्यांना महत्वाचे पुरस्कार मिळाले आहे.त्यांचा 1000 युवकांना ऊद्योगातुन ऊभे करण्याचा संकल्प युवकाना चालना देणारा ठरणार आहे. कर्मचार्यांना सातवे वेतन आयोग लागू करण्यासाठी त्यांनी व सकारात्मक संचालक यांनी अथक परिश्रम घेतले. सहकारी बॅकेत हा निर्णय प्रथमच लागु झाला.
त्यांच्या कामगिरीमुळे रिझर्व बॅकेचे फायनाशिअल साऊन्ड ॲन्ड वेल मॅनेज बॅंक ते करण्यात यशस्वी झाले . बँकेच्या 8500पेक्षा जास्त सभासदांचा 99%बँक सभासद यांचा त्यांच्या कार्यावर व प्रामाणिक पणावर विश्वास असुन 4हजार 500 पेक्षा जास्त लोकांना बॅकेने कर्ज देऊन, रोजगाराच्या दृष्ट्रीकोनातून उभे केले आहे. यामध्ये प्रामुख्याने पोल्ट्री, उदबत्ती व डेअरी,शेती विकास,बिल्डर्स,होटेल व्यावसायिक या उद्योगांना चालना मिळाली आहे. प्रत्येक व्यक्तीचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न झाले आहे. जिजाऊ बॅकेची देखणी तथा सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक इमारतीचा सोहळा याच वर्षी पूर्ण झाला असून, जिजाऊ बॅक सहकार क्षेत्रातील अत्याधुनिक सेवा देणारी बॅक ठरली असून, विदर्भातील बॅकेच्या 11 शाखा असून, या माध्यमातून 120 लोकांना रोजगारही मिळाला आहे.
त्याचा कार्याचा गौरव म्हणून, जिजाऊ बॅकेला बेस्ट चेअरमन परफार्मेन्स अवार्डनेही सन्मानित करण्यात आले. बँकेला सातत्याने ऑडीट अ श्रेणी असुन सभासदांना नफ्यातुन 10ते 15%लाभांश देणारी जिजाऊ बँक आहे.अविनाश कोठाळे यांनी 2013 ते 2018 दरम्यान मराठा सेवा संघाच्या प्रदेश कोषाध्यक्ष पदाची धुराही त्यांनी सांभाळली. त्यांच्या काळात सेवा संघाचे कोष सभासद सर्व सामान्यांच्या देणगीतून उभे करण्यात आले. अशा या व्यक्तिमत्वाचा खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलिस आयुक्त संजीव रेड्डी, हेमंत काळमेघ, डॉ. प्रसाद वडेगांवकर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.