Monday, March 2

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Article

तत्वनिष्ठ धम्मानुयायी : नारायणराव मुंद्रे

नारायणराव मुंद्रे यांचे जाणे दुःखद आहे. एक आदर्श शिक्षक , संस्कारी पिता आणि धम्मानुयायी अशी आपली ओळख आपल्या सादगीने त्यांनी समृद्ध केली. मीतभाषी कोणाच्याही अस्तित्वाचा स्वीकार करणे . ऐकून घेण्याची क्षमता फार थोड्या शिक्षकांना लाभते. आपले मुले आपण मोठ्या पदावर नेऊन पोहचवली याची दर्पोक्ती त्यांच्या स्वभावाला शिवली नाही. शुभ्र सदराआणि धोतर अशी निटनेटकी वेशभूषा. अनाग्रही व संतुष्ट व्यक्तीमत्व त्यांनी कमावले होते.  रविंद्र मुंद्रे यांची जडणघडण ज्या मुसीतून झाली तो पारदर्शीपणा स्पष्टपणा हे गुण त्यांच्या वडिलांचा वारसा आहे. मातीशी नाते जपून जगणे हे मातीच्या माणसाला मुश्किल होत चालले. तो संवाद आणि सौहार्द कसा टिकवून ठेवावा? हा कळीचा प्रश्न आहे. अशाही काळात व्यापक समाजहितास जाणीवेच्या केंद्रस्थानी ठेवणे भल्या भल्यांना जमत नाही.पण ही जाणीव आपल्या अवघ्या कुटुंबातील व्यक्तीच्या ठायी उतरवणे सोपे नसते...
Article

प्रगल्भ वैचारिक बैठकीची ‘अस्वस्थतेची डायरी’

डॉ.प्रतिभा जाधव या लेखिकेचे नाव महाराष्ट्राला एव्हाना चांगलेच परिचित झालेले आहे. नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावसारख्या ग्रामीण भागात वरिष्ठ महाविद्यालयात त्या प्राध्यापिका आहेत. नोकरीच्या निमित्ताने त्या छोट्याशा खेड्यात सध्या वास्तव्यास असल्या तरी त्यांची ख्याती महाराष्ट्रात सर्वदूर आहे॰ कविसंमेलने, एकपात्री प्रयोग, बोधपर व्याख्याने, साहित्य संमेलने, वृत्तपत्र स्तंभलेखन अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.पुणे येथील संवेदना प्रकाशनाने त्यांच्या दैनिक सकाळमध्ये प्रकाशित लेखांचा एकत्रित संग्रह ‘अस्वस्थतेची डायरी’ या नावाने प्रकाशित केला आहे. ‘अस्वस्थतेची डायरी’ च्या रूपात डॉ.प्रतिभा जाधव यांच्या वाचक वर्गाला एक अतिशय उच्च दर्जाचे वाचन मूल्य असणारे पुस्तक हाती दिले आहे असे मी म्हणेन. आजकाल अनेक पुस्तके अक्षरश: मिनिटात चाळून दूर ठेवली जातात; कारण वरवर चाळले तरी पुस्तकाचा अंदा...
Article

पोळा आणि पाऊस..!

ते रामपूर नावाचं गाव. त्या गावात महादेव नावाचा एक शेतकरी राहात होता. तो आपली पत्नी शिला व दोन लहान मुलासमवेत खुश होता. अगदी गुण्यागोविंदानं तो मुलांच्या व आपल्या पत्नीच्या इच्छा पुरवीत असे.            गाव तसं पाहिल्यास जंगलात होतं. सह्यांद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेलं ते गाव. सह्यांद्रीला वारे अडून दरवर्षी पाऊस यायचा. तो मोजता यायचा नाही. त्यातच दरड कोसळणे व ओढ्याला पूर येणे. त्यातच त्या ओढ्यातून माणसं वाहून जाणे  इत्यादी घटना नेहमी होत असायच्या.            आज पाऊस सुरु होता. पावसाची संततधार पाहून शिलाला विचार येत होता. दोन्ही मुलं तिच्या भोवताल तिला चिपकून बसली होती. त्यातच तिला काय करावं सुचत नव्हतं.           आज पोळ्याचा सण होता. सर्व गावातील मंडळी आनंदात होती. ते पोळ्याचा सण साजरा करीत ह...
Article

विनावेतन शिक्षकांची दैनावस्था

*५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त विशेष लेख*   ---------------------------------------------------   *विनावेतन शिक्षकासाठी नियमित वेतनाची तरतूद करता येत नसेल तर या शिक्षक दिनी सर्व विनावेतन शिक्षकांना शासन मान्य "वेठबिगारी"चे प्रमाणपत्र देऊन गौरव करावा अशी आर्त हाक या विनावेतन शिक्षकांची आहे !*   ---------------------------------------------------   व्यक्तिगत तसेच देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षणाचे अत्यंत मोलाचे असे स्थान आहे.देशासाठी आवश्यक तसेच योग्य आणि कुशल मनुष्यबळ विकसित करण्याची सोबतच संस्कारक्षम भावी पिढी घडविण्याची जबाबदारी ही शिक्षकाच्या खांद्यावर आहे. शिक्षकही असे आवाहन तितक्याच जबाबदारीने पेलतो. परंतु शासनाची शिक्षकाप्रति उदासीन नीती तसेच सोईस्कर आणि तकलाटू धोरणाने समाजातील एका जबाबदार घटकाला अर्थात शिक्षकालाच पंगू बनविले.वेठबिगारीचे जिने त्याच्या माथी मारलेत.समाजबांधणी ...
Article

मीच आहे विकसित भारताचा शिल्पकार……शिक्षक

तारी तो अज्ञान सागरातूनीशिकवी परंपरा आणि रूढी विद्यावान,  कलागुण संपन्न जो घडवितो राष्ट्राची पिढी......   इतिहास ग्वाही देतो विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अनामिक नात्याची, गुरु द्रोणाचार्य पासून ते साने गुरुजी पर्यंत ,आजतागायत शिक्षक या शब्दाला विशेष असे महत्त्व आहे.... शिक्षक म्हणजे सर्वगुणसंपन्न, कला पारंगत, सुस्वभावी व नीतिमत्ता जपणारा असा व्यक्ती डोळ्यासमोर उभा राहतो... मास्तर ,गुरुवर्य, गुरु, शिक्षक, अशा विविध उपाध्या उराशी बाळगून ज्ञानार्जन करणारा या व्यक्तीला समाजशील असे कार्य दिले आहे, त्यानुसार त्याला ते मानाचे स्थान प्राप्त झाले. कालानूपरत्वे त्याच्यामध्ये आधुनिकता आली असेल, बदलत्या जीवनशैलीने औद्योगीकरणाने  त्याला बदलवले असेलही, पण शिक्षकाची नीतिमत्ता व निष्ठा अजूनही कायम आहे. भारतातील शिक्षण प्रणालीचा विचार करता शिक्षक  शिस्तप्रिय ,नियोजन बद्ध , शीलवान असा असावा.. पूर्वी गुरु...
Gerenal

नेत्रदान…. काळाची गरज…!

नेत्रदान पंधरवडा विशेष लेखपरिवार व स्वास्थ कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे गेल्या 22 वर्षांपासून 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून राबविला जात आहे यानिमित्त हा विशेष लेख. भारतीय संस्कृतीत दानास खूप महत्व आहे. दानास अध्यात्माची, धर्माची, प्रतिष्ठेची जोड दिल्याने अन्नदान, गोदान, धनदान करण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. अवयव रोपणाची कल्पना प्रत्यक्ष आणण्यास 16 व्या शतकात इ.स. 1668 मध्ये मिनरल या तज्ज्ञाने कुत्र्याच्या हाडाचे रोपण मानवाच्या कवटीवर केले होते. इ.स. 1900-1920 या काळात याबाबत भरपूर प्रयत्न झाले, यातूनच नेत्ररोपणाची अभिनव कल्पना जन्माला आली. इ.स. 1906 मध्ये मिर्झा या नेत्रतज्ज्ञाने नेत्ररोपणाची पहिली शस्त्रक्रिया केली. मात्र यशस्वी नेत्रतज्ज्ञाने नेत्ररोपणाची पहिली शस्त्रक्रिया केली. मात्र यशस्वी नेत्ररोपणाचे श्रेय डॉ. मॅक्स फाईन...
Article

डेल्टा प्लस

कोविड दुसरी लाट संपलेली आहे असे मानायला आता हरकत नाही. रुग्णसंख्या कमी झालेली आहे. गंभीर रुग्ण येण्याचे तसेच सारीचे रुग्ण सुद्धा कमी झाले आहेत. याचा अर्थ कोरोना संपला असा नाही. आणि तो एवढ्या लवकर संपेल असेही नाही. त्याचे जागतिक स्वरूप संपेल परंतु तुरळक ठिकाणी तो त्याचे अस्तित्व कायम ठेवेल हे नक्की. सार्स किंवा मर्स या आजाराच्या साथीची लाट यापूर्वी येऊन गेली परंतु आताही या आजारांचे रुग्ण निघत आहेत. याचाच अर्थ या आजाराचे विषाणू वातावरणात असून ते मनुष्याला संसर्गित करत आहेत. असाच प्रकार कोरोनाच्या बाबतीत राहील असे शास्त्रज्ञाचे मत आहे. आणि त्यामुळे या सर्व विषाणूच्या सहवासात मानवजातीला राहायचं आहे. हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज विषाणूच्या बदलाच्या संदर्भात आपल्याला म्युटेशन, स्त्रेन आणि व्हेरीएंट या तीन शब्दांचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. म्युटेशन हा विषाणूचा एक गुणधर्म आहे. विषाणू स्वतःपासून ...
Gerenal

दुचाकी वाहनांचेच जास्त अपघात का..?

दुचाकी वाहनांपेक्षा इतर वाहने जास्त प्रमाणात रस्त्यावर धावत असताना दुचाकी वाहनांचे जास्त अपघात होण्याची कारणे खालील प्रमाणे असावीत.* कमी वयातील तरूण मुलांना दुचाकी परवाना दिला जातो,तर काहीकडे परवाना सुध्दा नसतो अशी मुले काॅलेजला जाताना व पिकनिकसाठी दुचाकी वाहनांचा शर्यतीची मजा म्हणून एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघाताला सामोरे जातात.शक्यतो 20 वर्ष वयातील व्यक्तिलाच परवाना देण्यात यावा व ओव्हरटेक करणार्याला कडक शिक्षा असावी.* दुचाकी वाहनावर बसण्यास दोन व्यक्तिंना परवानगी असताना फक्त एकाच व्यक्तिला हेल्मेटची सक्ती आहे,अपघाताच्या वेळी दुसर्याच्या डोक्यात हेल्मेट नसल्याने त्याच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्यासाठी वाहतूक प्राधिकरणाने(आर.टि.ओ) दोघांसाठीही हेल्मेट सक्तीची करावी.* पावसाळा सुरू झाला की रस्ता ओला होतो अशावेळी अचानक ब्रेक लावल्यास वाहन तात्काल रस्त्यावर आडवे होते,याचे...
Article

‘ओसीडी’वर मात करताना

ओसीडी अर्थात ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर या मानसिक आजाराविषयी काही जाणून ‘ओसीडी’चा विकार असलेली व्यक्ती अनावर व अवास्तव विचारांनी सतत त्रस्त असते. - डॉ. मकरंद ठोंबरे ओसीडी अर्थात ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर या मानसिक आजाराविषयी काही जाणून ‘ओसीडी’चा विकार असलेली व्यक्ती अनावर व अवास्तव विचारांनी सतत त्रस्त असते. त्याचबरोबर मन व्यापून टाकणाऱ्या निरनिराळ्या कल्पना व त्यासाठी करावीशी वाटणारी अनिवार्य कृती, हे प्रामुख्याने ‘ओसीडी’ या आजाराचे मुख्य स्वरूप असते. ‘ओसीडी’ या मनोविकाराची कारणमीमांसा करताना हा विकार बऱ्याचदा अनुवांशिक असल्याचे आढळून आले आहे. अनुवंशिकतेबरोबरच लहानपणी घरात असलेली अतिरिक्त शिस्त, धाक, पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा अतिरिक्त दबाव, लहानपणापासून पडलेली अतिरिक्त कौटुंबिक जबाबदारी, लहानपणापासून मनावर झालेले आघात, आलेले कटू अनुभव आणि या सर्व कारणांमुळे आयुष्यात यशस्व...
Article

स्मशानातील सोनं – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली. त्याला समाधानाचं भरत आलं. आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला. त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली. सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबड धोबड दिसत होते. त्या आक्राळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता.वारा मंद वाहत होता. त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात बसलेली ती पन्नास झोपडी भेदरलेली होती. जुने पत्रे, चटया, फळ्या, पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला नि त्या घरात मानसं राहात होती. बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवर च्या धरली होती. दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती. सर्वत्र चुली पेटल्या होत्या. हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता. पोर खेळत होती. एका प्रचंड चिंचेखा...