महात्मा फुले ; क्रांतीचे आधारस्तंभ
सध्या आम्हाला सर्वत्र सुधारणा झालेली दिसते.महिलाही शिक्षणात आघाडीवर गेलेल्या दिसतात.दलितही सुधारलेले दिसतात.विधवाही ब-याच पुढे गेलेल्या दिसतात.केशवेपन प्रथा राहिलेली नाही.सतीप्रथा तर नाहीच नाही.सतीप्रथेचा कायदा लार्ड विल्यम बेंटिकने बनवुन सतीप्रथेला तिलींजली दिली होती.ही सती प्रथा राजा राममोहन रायच्या प्रयत्नातुन बंद झाली होती.लार्ड विल्यम बेंटिकच नाही तर पुर्ण इंग्रज अधिकारी वर्गाच्या लक्षात सतीप्रथा वाईट गोष्ट आहे,हे राजा राममोहन रायने लक्षात आणुन दिले होते.सतीप्रथा बंद झाली असली तरी समाजात बाकी सा-याच प्रथा जोमात सुरु होत्या.विधवा झाल्यानंतर तिचा श्रुंगार नष्ट करुन तिने पांढरी साडी घालावी.तसेच तिला पुन्हा विवाह करण्याचा हक्क नसुन तिच्याकडे कोणी पाहु नये म्हणुन तिचा चेहरा विद्रुप केला जात असे.अँसीड टाकुन नाही तर तिच्या डोक्यावरचे केस काढुन.त्या स्रियांनी आवाज उठवु नये,त्या स्रियांना य...
