Thursday, December 11

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Gerenal

हटके दिसायचे तर..!

आता लवकरच लग्नसराई सुरू होत आहे. त्यादृष्टीने लग्न समारंभात हटके पोषाखाच्या ानवडीबाबत विचार करायला हवा. खरं तर नेहमीच्या जीन्स-टी शर्ट, फॉर्मल्सपेक्षा काही तरी वेगळं ट्राय करायची संधी या निमित्ताने मिळत असते. त्यादृष्टीने तुम्ही बंदगळा हा प्रकार ट्राय करू शकता. हा वेगवेगळ्या पद्धतीने कसा कॅरी करायचा याविषयी..थोडा मोकळाढाकळा लूक हवा असेल तर फिटिंगवाल्या ट्राउर्जससोबत बंदगळा कॅरी करा. त्यावर डबल माँक ट्रॅप्स ट्राय करता येतील. हँडवर्कवाला बंदगळा ट्राय करता येईल. ब्लॅक किंवा इतर मॅचिंग ट्राउर्जससोबत तो कॅरी करा.सोबत लेदरचे शूज आहेतच. प्लेन कुर्ता पायजमा आणि त्यावर बंदगळा नेहरू ज्ॉकेट असं कॉम्बिनेशन करता येईल. यासोबत माँक स्ट्रॅप्स किंवा मोजडी ट्राय करता येईल. सकाळच्या वेळी गॉगलही घालता येईल. अगदी लांब आकाराचा बंदगळा कॅरी करण्यापेक्षा थोडा शॉर्ट बंदगळा घ्या. सोबत योग्य फिटिंगची जोधपुरी पँट ...
Article

जयंती: संत्या ते संतोष चा मार्ग

"जयंती" हा अनलॉक नंतर सिनेमागृहात आलेला पहिलाच मराठी चित्रपट. चित्रपटाविषयी फारच उत्सुकता होती. जेवढी उत्सुकता होती त्यापेक्षा खूप जास्त या चित्रपटाने विचार दिला. हा चित्रपट बघतांना सुमार चित्रपट आहे असे अजिबात वाटले नाही. अतिशय दर्जेदार चित्रपट. सर्वांगाने दर्जेदार. या पूर्वी फँड्री, सैराट हे चित्रपट आलेत मात्र ते वेगळ्या धर्तीवर आधारित होते. हा चित्रपट कोणत्याही एक महामानवर आधारित नाही तर समस्त महापुरुषांवर आहे. सर्व महापुरुषांची जयंती अगदी थाटामाटात साजरी केली जाते. मात्र त्यांचे विचार काय, कार्य काय हे जाणून न घेता. जयंती भावनिक होऊन, डोक्यावर घेऊन साजरी करण्यापेक्षा डोक्यात घेऊन साजरी करावी असा मोलाचा संदेश या चित्रपटातून दिला आहे. त्यांचे विचार आचरणात आणून त्यांची जयंती साजरी करावी. कित्येक लोक दारू पिऊन डीजे वाजवून जयंती साजरी करतात. अनेक ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमात डीजे नाही म्हणू...
Gerenal

दातावर घाला दागिने..!

हल्ली कशाकशाची फॅशन निघेल हे सांगणे कठीन आहे. आता दाताचेच घ्याना. आजकाल दातांवर फॅशन म्हणून वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. दात चांगले, चमकदार स्वच्छ दिसावे याकरीता दातांवर कव्हरींग करण्यासाठी जो धातू निवडता आहात, तशा पद्धतीने तुम्हाला यासाठी पैसे मोजावे लागतात.आता जर कोणी हसल्यावर तुम्हाला त्याचे दात चमकताना दिसले, तर त्याचे दात किती स्वच्छ, चमकदार असं म्हणून आश्‍चर्यचकीत होऊ नका. कारण ही चमक त्याच्या दातांची नसून त्याच्या दातांवर बसविलेल्या दागिन्यांची असू शकते. हो.. हे खरं आहे. आता जसे तुम्ही कानात, गळ्यात, नाकात दागिने घालता ना, तसेच आता तुमच्या दातांवरही तुम्ही दागिने घालू शकता. दातांसाठी खूप वेगवेगळे दागिने असून या दागिन्यांची फॅशन करणार्‍यांचीही काही कमी नाही.१. दातांवर हिरे.. दातांवर हिरे लावण्याची फॅशन विदेशात अतिशय लोकप्रिय आहे. डेंटिस्ट आणि आर्टिस्ट या दोघांच्या मदतीने दा...
Gerenal

तापाची समस्या..!

ऋतूबदल तसंच अन्य कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तापाची समस्या निर्माण होते. यावर काही घरगुती उपचारांसोबत डॉक्टरांचा सल्लाही घेतला जातो. परंतु ताप हा आजार नसून आजाराचं लक्षण आहे हे समजून घ्यायला हवं. आजारावर इलाज झाल्याशिवाय ताप बरा होत नाही. त्यामुळेच अंगावर ताप काढण्याची सवय योग्य नाही.    नवजात बालकांच्या शरीराचं तापमान १00 डिग्रीपेक्षा जास्त आणि पाच ते सहा वयोगटातील मुलांच्या शरीराचं तापमान १0१ डिग्रीपेक्षा जास्त असेल तर ताप आहे असं समजलं जातं. बरेचदा स्पर्शाच्या आधारे शरीराच्या वाढलेल्या तापमानाचा अंदाज घेऊन ताप आहे अथवा नाही हे ठरवलं जातं. पण ही चुकीची पद्धत आहे. ताप मोजण्यासाठी थर्मामीटरचाच वापर करावा. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या काखेत तीन ते पाच मिनिटे थर्मामीटर ठेवून वाढलेल्या तापमानाची नोंद घ्यावी. पाच वर्षांपुढील मुलांच्या तोंडात थर्मामीटर ठेवून तापमानाची नोंद घ्यावी.   ताप आल्य...
Gerenal

गोल्ड फेशियलची चमक आता घरीच मिळवा.!

गोल्ड फेशियल करण्यासाठी पार्लरमध्येच गेलं पाहिजे, असं काही नाही. पार्लरमध्ये जायला वेळ नसेल, तर ३ गोष्टी वापरा आणि घरीच गोल्ड फेशियलची चमक मिळवा.फेशियल करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी पर्ल फेशियल, गोल्ड फेशियल असे काही प्रकार एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या आधी किंवा काही खास प्रसंगी केले जातात. फेशियलच्या इतर प्रकारांपेक्षा हे दोन प्रकार जरा जास्त महागडेही असतात. त्यातही पर्ल फेशियलपेक्षा गोल्ड फेशिअल करणे तर खूपच महाग जाते. म्हणून पार्लरमध्ये जाऊन गोल्ड फेशियल करण्यावर पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल आणि तेवढा वेळही नसेल, तर घरच्या घरी गोल्ड फेशियलचा लूक तुम्हाला निश्‍चितच मिळू शकतो.गोल्ड फेशियल करण्यासाठी सगळ्यात आधी तुमचे केस पुर्णपणे मागे घ्या आणि बेल्टने बांधून टाका.यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या.आता फेशियल करण्याची पहिली पायरी म्हणजे चेहर्‍याचं क्लिंझिंग करणे.यासाठी तुमच्याकडे...
देवदासी….
Story

देवदासी….

सुनंदा व मी शाळेतल्या मैत्रिणी. एके दिवशी शाळा सुटल्यावर तिला घेऊन मी माझ्या घरी आले. पण ती आमच्याकडे आलेली माझ्या घरच्यांना आवडले नाही. ती घरी गेल्यावर आई मला म्हणाली, "क्षमा, त्या सुनंदाशी जास्त मैत्री नको करू हं". "का गं आई? तिचं गणित खूप चांगलं आहे आणि ती नेहमी मला मदत करते". "सांगीतलं ना, जास्त जवळीक नको."मी हो म्हटले, पण आईचे म्हणणे मनावर घेतले नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघी तिच्या घरी गेलो. तिथे ओट्यावर एक साडी नेसलेली बाई बसली होती. सुनंदाने 'ही माझी ताई' अशी ओळख करून दिली. आमचा आवाज ऐकुन सुनंदाची आई बाहेर आली. मला पाहून तिला फार आनंद झाला नाही आणि इशाऱ्याने तिने सुनंदाला आत बोलावून घेतले. मी मात्र वेंधळ्यासारखी तिच्या ताईकडे पाहतच राहिले.ओठावर लिपस्टिक, लांबलचक केसांवर माळलेले गजरे, कपाळावर ठसठशीत कुंकू आणि डोळ्यात घातलेले काजळ ह्यामुळे तिची ताई फारच सुंदर दिसत होती. कुणाची तर...
Gerenal

लट्ठपणा कमी करण्यासाठी..

लट्ठपणा विविध व्याधींना निमंत्रण देतो. आयुर्वेदात स्थूलपणावर काही उपाय सांगण्यात आले आहेत. संतुलत आहार आणि व्यायाम यांची योग्य सांगड घातली तर आयुर्वेदिक उपायांनी बरेच लाभ होऊ शकतात.शरीरात आमामुळे स्थूलपणा वाढतो. चुकीची जीवनशैली, प्रदूषण आणि अन्नपचन योग्य पद्धतीने न झाल्यामुळे शरीरात आम या विषारी घटकाची निर्मिती होते. आमामुळे शरीराच्या विविध कार्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे स्थूलपणा कमी करण्यासाठी आमाचं निर्मूलन करण्यावर आयुर्वेदाचा भर असतो. शरीरात आम असताना वजन कमी करणं जवळपास अशक्य होऊन बसतं, असं तज्ज्ञ सांगतात. म्हणूनच आहारावर नियंत्रण आणूनही अनेकांचं वजन कमी होत नाही. त्यामुळे आमाचं प्रमाण कमी केल्यानंतरच वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरू करायला हवी.काही आयुर्वेदिक औषधी आमावर प्रभावी ठरतात. त्यात हळद, त्रिकातू, दारूहळद (बार्बेरी), त्रिपबला आणि गुग्गुळ यांचा समावेश करावा लागे...
Gerenal

गरोदरपणात त्वचा जपा

गरोदरपणातले नऊ महिने हा महिलांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. आई होण्याचा आनंद अनुभवत असतानाच स्त्रियांना विविध शारीरिक बदलांनाही सामोरं जावं लागतं. गरोदरपणात शारीरिक बदल होतातच शिवाय महिलांच्या त्वचेवरही परिणाम होतो. जवळपास ९0 टक्के महिलांना बाळंतपणानंतर त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतं. नवा जीव जन्माला घालणं कोणत्याही महिलेसाठी सोपं नसतं. तिला बरीच भावनिक, मानसिक आणि शारीरिक स्थित्यंतरं अनुभवावी लागतात. या काळात काही महिलांचं वजन वाढतं. काही गुंतागुंत निर्माण होते. त्यातही गरोदरपणात आणि त्यानंतर त्वचा तसंच केसांच्या संरचनेत बरेच बदल झाल्याचं दिसून येतं.बाळंतपणानंतर त्वचेचा पोत टिकवून ठेवणं खूप आव्हानात्मक असलं तरी हे बदल कायमस्वरुपी टिकणारे नसतात, ही त्यातल्या त्यात समाधानकारक बाब म्हणता येईल. थोडी काळजी आणि उपायांनी तुम्ही पुन्हा उजळ त्वचा प्राप्त करू शकता. गरोद...
Gerenal

महिलांना फायब्रोमायल्जयाचा धोका

फायब्रोमायल्जया नावाचा एक विकार आहे. हा विकार पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक प्रमाणात होतो. ३0 ते ५0 या वयोगटातल्या महिलांना हा विकार जडण्याचा धोका बराच जास्त असतो. ब्रिटनमधल्या एका संशोधनानुसार २५ पैकी एक व्यक्तीला हा विकार होऊ शकतो. ब्रिटनमध्ये १५ ते २0 लाख लोकांना हा विकार झाल्याचं एका आकडेवारीवरून समोर आलं आहे. या विकाराविषयी जाणून घेऊ.    फायब्रोमायल्जया या विकारात स्नायूंमध्ये प्रचंड वेदना जाणवतात. या अस वेदनांमुळे माणूस अक्षरश कळवळतो. आपल्या मानसिक स्थितीवर याचा परिणाम होतो. या विकारामुळे मेंदूच्या कार्यपद्धतीवरही परिणाम होण्याची शक्यता असते. दुखापत, शस्त्रक्रिया, जंतूसंसर्ग आणि नैराश्यामुळेही ही व्याधी जडू शकते. या विकारात रुग्ण स्वत:वरचं नियंत्रण हरवून बसतो. त्यामुळे अत्यंत धोकादायक असा हा विकार आहे. ही व्याधी पूर्ण बरी होऊ शकत नसली तरी त्यावर औषधांद्वारे नियंत्रण मिळवता येतं.  ...
Article

थंडीतली स्टाईल

आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. साहजिक ऊबदार कपड्यांची तयारी सुरू करावी लागेल. सर्वसाधारणपणे थंडीत स्वेटर, ज्ॉकेट कॅरी केले जातात. प्रसंगी शालीला पसंती असते. पण प्रत्येक वेळी शाल गुंडाळणं, स्वेटर घालणं शक्य नसतं. वेगळं ट्राय करायचं तर पोंचोचा पर्याय आहे. हा कॅज्युअल, पार्टी वेअर म्हणून कॅरी करू शकता.'टी शर्ट, स्वेट शर्टवर केप स्टाईल पोंचो घालता येईल. गाऊ न किंवा लाँग स्कर्टवर हा प्रकार शोभून दिसेल. फ्लोरल, प्लेन, चेक्स, स्ट्राईप्स या प्रकारांमधून तुम्ही केप स्टाईल पोंचोची निवड करू शकता. ' जीन्स किंवा एथनिक्सवर फुल लेंथ किंवा फ्लोअर लेंथ पोंचो वापरावा. ' आवड आणि गरजेनुसार व्ही, राउंड किंवा हाय नेकवाले पोंचो घेता येतील. ' समारंभासाठी लोकरीवर थ्रेड, मरर वर्क तसंच नक्षीकाम केलेले पोंचो खरेदी करू शकता. ' आजकाल फेदर किंवा फिं्रज पोंचोचा ट्रेंड आहे. ही स्टाईलही छान दिसते. ' नेहमीच्या हुडीपेक्षा...