संवेदनशील भावनांची शब्दरूपी साठवण :पिवशी
कवयित्री शितल राऊत यांच्या नुकताच 'पिवशी' हा पहिला काव्यसंग्रह गौरव प्रकाशन, अमरावती द्वारा प्रकाशित झाला. मुळात 'पिवशी' हे शीर्षक वाचताक्षणी डोळ्यांपुढे बालपणीचा काळ तरळतो. प्रत्येकाच्या आजीच्या कमरेला मोठ्या दिमाखात विराजमान झालेली ती पिवशी आठवते. त्या पिवशीमध्ये ठेवलेल्या वस्तूचे जसे प्रचंड आकर्षण प्रत्येकाला होते अगदी तसेच या कविता संग्रहातील प्रत्येक कविता वाचतांना वैविध्यपूर्ण विषयाच्या आशयघन कविता वाचकाच्या अंतर्मनाला सुखाणाऱ्या आहेत.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य तथा युवा कादंबरीकार मा. पुष्पराज गावंडे यांची लाभलेली प्रस्तावना व राठोड सरांनी तयार केलेले सुबक व सुंदर मुखपृष्ठाने पिवशीला सोन्याची झालर चढविण्याचे काम केले आहे.
कवयित्री शितल राऊत ह्या व्यवसायाने शिक्षक आहेत. गेले दहा वर्ष त्या आपल्या पेशा सांभाळून साहित्यक्षेत्राची निष्ठेने सेवा करत आहेत. अगदी याच...