समतेचे खंदे पुरस्कर्ते – प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय राज्यघटनेने शिल्पकार, आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते समतेचे खंदे पुरस्कर्ते, तुम्हां आम्हाला सर्व भारतवासीयांना देशभक्ती अन् राष्ट्रप्रेमाची शिकवण देणारे युगप्रवर्तक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर. यांची आज १३१ वी जयंती जगभरात साजरी होत आहे.आभाळ होतं फाटलेलं..!
दु:खाच्या अश्रुंनी दाटलेलं..!!
उजेडास नव्हता कधी थारा..!
अंधार झाला होता मानवात सारा..!!कवीच्या कवितेतील काव्यपंक्ती प्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माआधी साऱ्या समाजाची अशी अवस्था झाली होती.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाल्यावर ...!'उध्दरली कोटी कोटी कुळे,भीमा जन्मामुळे..!खरंच एका कवीच्या या कवितेच्या ओळीमध्ये किती अर्थ दडलेला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मामुळे हजारो वर्षांपासून गुलामगिरीच्या गर्तेत सापडलेल्या समाजाला बाहेर काढुन त्यांना स्वाभिमानाचं जीवन दिलं आहे. हजारो वर्षांपासून मृताचं जीव...