धोका वाढत्या तापमानाचा…
* वाढत्या उष्णतेचा आरोग्य, शेती, अर्थकारणा वर परिणाम
गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून उन्हाच्या वाढत्या उन्हाच्या झळा ह्या दुपारनंतरच नाही तर दिवसा उजाडताच सुरु होत आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला असून सध्या सूर्य उजाडताच आग ओकतोय अशी अवस्था झाली आहे. १२१ वर्षात यंदाचा मार्च महिना हा ऐतिहासिक ठरलेला आहे. उन्हाळ्याला सुरवात होताच हा महिना सर्वाधिक उष्ण ठरलेला आहे. शिवाय मे महिन्यातही अशीच अवस्था राहणार असल्याचा अंदाज आहे
हवामानात वेगाने होत असलेले हे बदल म्हणजे जलवायू परिवर्तनाचा परिणाम आहेत. येणार्या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. धोका आपल्या अगदी जवळ आल्याचे संकेत परिस्थिती आपल्याला देतेय. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या द़ृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही.
मार्च महिन्यातल्या उकाड्याने १२१ वर्षांचा विक्...
